मागील एका लेखामध्ये मी लिहिले होते कि एकलकोंडेपणा हा काहींना हानिकारक असू शकतो. त्या लेखावरून एक प्रश्न मला आलेला कि एकांतामध्ये राहण्याचे काही मानसशास्त्रीय चांगले कारणे असू शकतात का?
सामाजिक संपर्कामुळे अनेक फायदे आपण पहिले होते जसे कि रोग प्रतिकारशक्ती वाढणे, तणावाची कमी जाणवणे आणि दीर्घ आयुष्याशी निगडित असणं. परंतु काही संशोधनात असे दिसून आले की समाजापासून अलिप्त राहणं आणि एकाकीपणामुळे हृदयरोग, लठ्ठपणा, चिंता, नैराश्य, अल्झायमर रोग, उच्च रक्तदाब आणि अगदी लवकर मृत्यूचा धोका वाढतो.
तिसरी बाजू एक आहे कि स्वतः होऊन काही कारणास्तव अलिप्त राहणं. या मध्ये मात्र गफलत होता कामा नये. एकटे राहणे व एकटेपणा जाणवणे दोन्ही गोष्टी काही अर्थाने वेगळ्या आहेत. जेंव्हा स्वतः होऊन एकटे राहण्याचा प्रयत्न करता तेंव्हा काही फायदे होतात. जसे कि,
१. हे ऐच्छिक आहे.
२. तुम्ही सकारात्मक संबंधही टिकवता.
३. आपण इच्छित असल्यास सामाजिक गटात परत येऊ शकता.
४. एकटा वेळ घालवण्याबद्दल तुम्हाला चांगले वाटते.
५. कुणाचे हि निर्बंध नसताना तुम्हाला हवे ते करण्यात बाधा येत नाही. बऱ्याचदा चित्रकार, लेखक, ध्यानसाधना करणारी, इत्यादी व्यक्ती या गटात मोडतात.
६. गर्दीपासून दूर राहून एकांतपणाचा अनुभव घेणे आजकाल महत्वाचे झाले आहे. ताणतणाव दूर होण्यास मदत होते.
७. हा एकांत आपण ठरवू तोपर्यंत ठेऊ शकतो, ठरवू त्या व्यक्तींशी बोलू शकतो.
८. या एकांताला समाज नावे ठेवत नाही.
९. मानसिक शांती साठी अत्यंत उपयोगी. शांत राहिल्याने बऱ्याच व्याधी दूर होण्यास मदत होते.
१०. एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारू शकते.
११. आपली क्रिएटिव्हिटी वाढवते.
१२. आपल्या नात्यांमध्ये सुधारणा करते. एकांतात राहिल्याने आपल्या बऱ्या वाईट सवयी समजतात. त्यातून शिकून आपल्या मध्ये सुधार करण्यात मदत होते.
१३. आपल्याला अधिक उत्पादनक्षम आणि सामर्थ्यवान बनवते. लक्ष विचलित होत नाही आणि आपल्याला पाहिजे तसे काम पूर्ण होते.
१४. आपल्यामधील नवीन पैलूंचे आणि नसलेल्या स्किलचे दर्शन होते.
एकांतामध्ये राहण्याचे मानसिक तसेच शारीरिक फायदे आहेत हे अनेक मानसशास्त्रीय संशोधकांनी सिद्ध केले आहे. मनाने घेतलेला हा निर्णय अत्यंत योग्य आहे आणि त्यात आपल्याला तोटा हा अगदी नगण्य असतो. हा निर्णय जर तुम्ही परस्पर घेतलेला असेल आणि जोडीदाराला मान्य नसेल तर मात्र तापदायक ठरू शकतो. त्यासाठी आवश्यक ती तयारी करून निर्णय घेतलेला बरा.
एकाकीपण काही कालावधी साठी नक्कीच हितकारक आहे. कुठलीही गोष्ट आपल्या लिमिट मध्ये असेल तर गोड लागते नाहीतर त्याला आंबटपणा यायला वेळ लागत नाही.
श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ञ्
खूप छान।
एकांतात स्वैछे ने राहण्याने स्वतः चे विचार चाचपडण्यात मदत होते।