सध्या मी म्यानमार येथील समुद्रात काम करतोय आणि बरेच भूमिपुत्र आमच्या कडे कामावर आहेत. सध्या ते त्यांच्या देशातील घडामोडीमुळे अत्यंत त्रासलेल्या अवस्थेमध्ये असून त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसून येत आहे. अशा वेळी जेंव्हा हे कामगार आमच्या कडे कामाला येतात तेंव्हा त्यांचे मानसिक आरोग्य तपासून त्यांना समुपदेशन करणे मला भाग पडले. त्यामध्ये भरपूर केसेस अशा होत्या कि त्या “आत्म्द्वेषाने” परिपूर्ण आहेत. कारणे विविध आहेत. परंतु अशा केसेस जगभर सर्वत्र आढळतात.
“मी माझा तिरस्कार करतो” असा विचार तुमच्या मनात अनेकदा येतात का? जर आपण स्वत:च्या द्वेष भावनांनी त्रासलेले असाल तर हे निराशाजनक असते. आत्म-द्वेषामुळे आपल्या विचारांच्या मर्यादा सीमित राहतात आणि चिंता / नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या धोकादायक स्थितीत येऊन आपण थांबतो.
आत्म-द्वेषाच्या भावनांवर मात करण्यासाठी, काही चिन्हे आणि लक्षणे ओळखणे, त्यामागील मूळ कारणे आणि ट्रिगर समजून घेणे, आपल्या जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव करून घेणे आणि शेवटी त्या मनावरील भावनांवर विजय मिळवण्याची योजना बनविणे -त्यासाठी काही कौशल्य माहित करून घेणे गरजेचे. पण आत्मद्वेषाची चिन्हे काय आहेत?
१. सर्व-किंवा-काहीही विचार न करणे..
२. जरी तुमचा दिवस चांगला गेला असला तरीही, आपण ज्या वाईट गोष्टी घडल्या त्याचा विचार करतो.
३. भावनिक तर्क: आपण आपल्या भावनांना तथ्य म्हणून स्वीकारतो.
४. आत्मविश्वासाची कमी आणि दररोजच्या जीवनात स्वत: ची तुलना नेहमी इतरांशी करतो.
५. स्वतः ची मते राहत नाहीत. नेहमी इतरांकडून सहमती विचारने.
६. प्रशंसा स्वीकारू शकत नाही: धन्यवाद म्हणायच्या ऐवजी नाकारणे किंवा प्रतिक्रिया न देणे.
७. तुम्हाला असे वाटते कि तुम्ही लोकांना आवडत नाही.
८. टीकांना वैयक्तिक स्वरूपात घेणे. राग येणे.
९. इतरांबद्दल मत्सर वाटतो आणि आपल्या आयुष्यातल्या परिस्थितीबद्दल स्वत: ला बरे वाटत नाही.
१०. चांगल्या मित्रांना दूर ढकलणे.
११. मोठी स्वप्न पाहायची भीती वाटणं.
१२. चूक झाल्यास स्वतः ला माफ न करणे.
१३. काहीही चांगले वाटाण्याच्या पलीकडील मनस्थिती.
मग काय कारणे असावीत वरील चिन्हे असण्यामागे हे पाहणे महत्वाचे आहे. आपल्या या भूमिकेला आपणच उत्तर शोधले तर पुढील प्रश्न जागेवर सुटतात.
१. नकारात्मक विचार पद्धती. नेहमीच उलटे विचार आणि शंका मनात असणे.
२. नकारात्मक जीवन अनुभव.
३. लहानपणाचे अनुभव जे रागाने, द्वेषाने भरलेले आहेत.
४. सहकाऱ्या बरोबर वाईट संबंध.
५. इतरांकडून गुंडगिरी होणे, छळ कपट यांची शिकार.
६. जीवनात घडलेल्या क्लेशकारक घटना.
७. मागील घटनांची पुनरावृत्ती होणे.
८. स्वतः बाबत नकारात्मक असणे. आपली किंमत आपणच कमी करणे.
९. मानसिक आरोग्याच्या स्थिती.
या द्वेष करण्याच्या कारणांपलीकडे, जेव्हा आपण सतत स्वतःचा तिरस्कार करता तेंव्हा उद्भवणारे परिणाम समजून घेणे महत्वाचे आहे. खाली काही संभाव्य परिणाम आहेतः
१. आपण कदाचित गोष्टी करण्याचा प्रयत्न करणे थांबवू शकता. शास्वती राहणार नाही.
२. आपण स्वत: ची विध्वंसात्मक वर्तनामध्ये गुंतू शकता जसे की मादक पदार्थांचा वापर करणे, जास्त प्रमाणात खाणे किंवा स्वत: ला अलग ठेवणे.
३. आपण स्वत: ची काळजी घेण्यात अयशस्वी होऊ शकता.
४. आपण कदाचित नकळत अशा लोकांची निवड करू शकता जे आपल्यासाठी वाईट आहेत किंवा जे तुमचा फायदा घेतात, जसे की टपोरी मित्र किंवा भागीदार.
५. आत्मविश्वास आणि आत्म-सन्मान पुन्हा आणण्यासाठी संघर्ष करावा लागेल.
६. तुम्हाला निर्णय घेताना त्रास होऊ शकतो.
७. आपण दैनंदिन समस्यांविषयी किंवा आपल्या भविष्याबद्दल जास्त चिंता करू शकता.
८. आपल्याबद्दल चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवणे आपणास कठीण वाटायला लागते.
९. आपण आपल्या ध्येय आणि स्वप्नांच्या मागे जाण्यास सक्षम नाही आणि नेहमीच मागे राहिल्यासारखे वाटणार.
१०. आपल्या क्षमता आणि आपण काय साध्य करू शकता याबद्दल आपल्याला शंका उपस्थित होणार.
११. आपण भविष्याप्रती अतिशय अस्पष्ट राहिल्याने कोणत्याही सकारात्मक अपेक्षा रहात नाहीत.
१२ आपल्याला लोकांनी वाळीत टाकले असे वाटणे.
आपण स्वत: ची द्वेषबुद्धी दूर करण्याचा विचार करीत असल्यास, बऱ्याच गोष्टी आहेत. आपले जीवन सुधारण्यासाठी, सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करून पाहावेत.
१. रोजनिशी लिहिणे. त्यात तुम्हाला काय घडल्यानंतर कसे वाटले याची नोंद ठेवणे. यामुळे मानसिक त्रास कमी होईल.
२. जेंव्हा कधी नकारात्मक वाटायला लागेल, तेंव्हा स्वतः ला विचारा कि का वाईट वाटण्यासाठी काय कारण आहे.
३. स्वतःचा द्वेष करण्याऐवजी स्वतःला दया दाखवण्याचा सराव करा.
४. सकारात्मक लोकांबरोबर वेळ घालवा.
५. ध्यान धारणा (मेडिटेशन) – खूप चांगला फरक पडेल.
६. स्वतःला सावरून नीट नेटके कपडे घालणे, काळजी घेणे यामुळे आत्मविश्वास पुन्हा जागरूक होईल.
७. मानसोपचार तज्ज्ञाला भेट द्या.
८. आयुष्यात मला स्वतः साठी किंवा कुटुंबासाठी काही तरी करायचे आहे याचा ध्यास घ्या.
महत्वाचे हेच कि आपण एकटेच असे आहोत असे नाही. खुपजण अशा प्रकारच्या रोगाला बळी पडलेले दिसतील. फक्त मानसिक, अध्यात्मिक,वैचारिक बदल करून पुन्हा आपण मूळ प्रवाहात येऊ शकतो. त्यासाठी सुरुवात करणे गरजेचे. आपण स्वतःचा तिरस्कार करता या विचाराने आपले जीवन जगण्याचे कोणतेही कारण नाही. आज, आपण स्वत: ला द्वेष आणि नकारात्मक विचारांच्या पद्धतींनी जगून फायदा तर काहीच नाही याची जाणीव ठेवून चांगले जीवन मिळवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचलू शकता.
श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ
Very very useful.
Must apply in life.
yes! certainly.
नमस्कार,
माझ नाव, निखिल देशपांडे आहे, मी मुंबई येते, रिलायन्स इंडस्ट्री ltd मध्ये कार्यरत आहे।
तुमचा लेख वाचला व बऱ्याच गोष्टी समजल्या।
मी पण मागील काही वर्षात तणावाचा अनुभव घेतल्या ज्यामध्ये सर्वप्रथम मी विनाकारण रागावू लागलो, मग हळू हळू सर्वांपासून दूर होऊ लागो करण मला वाटू लागलं की सर्व जण फक्त स्वतःपुरता बघतात, दुसऱ्याचे नुकसान चा बद्दल ह्यांना काही पडली नाही। मग मी पण थोडा स्वभावविरूढ स्वार्थी पण करायला लागलो ज्याने मी अजून एकटा झालो।
पण देवकृपेने मला काहींचगले मित्रावर्ग आहे ज्याने मला ढासळू दिले नाही, व जसा टप्या टप्या ने पुढे यायचे हे सुचवले।
आता मला जीवनाचा आनंद। वाटत आहे व सर्व नेगतीवे विचार सोडून द्यायचा प्रयत्न असतो।
आता मी एक्सत्र कॅरिकलर गोष्टी जशा योग, गाणी इत्यादी मध्ये मॅन रामावतो।
ह्या पुढची प्रगती किव्हा स्टेप्स काही असतील तर नक्की सुचवा।
आभारी
Thank you for your views and I am so happy that you have found your way to move forward. Excellent and all the best sir.
shrikant kulange 9890420209