मानसोपचार हवाय?
मानसोपचार तज्ज्ञाकडे कधी जायला हवे म्हणून काही प्रश्न विचारण्यात आले. साहजिकच, भारतामध्ये मानसोपचार करणारे समुपदेशक मोठ्या प्रमाणात असून देखील त्यांच्या कडे जाऊन प्राथमिक मानसोपचार घेणे म्हणजे खूप हिमतीने घेतलेला निर्णय असतो. त्याला खूप करणे आहेत. त्यापैकी एक महत्वाचे कारण म्हणजे माहितीचा अभाव. त्यासाठी मी प्रत्येकाला उत्तर देण्याऐवजी ब्लॉग मार्फत उत्तर देणे पसंद केले.
आपल्या समस्या ठराविक साच्यातील आहेत – आर्थिक, प्रापंचिक, शारीरिक आणि मानसिक. या सर्वाना तोंड देता देता नाकीनऊ आलेले असतात. त्यासाठी आपल्याकडे आजी आजोबा, आई वडील ठिकठिकाणी मदत करतात तरीही प्रश्न सुटले नाहीत तर मात्र वेळ वाया न घालता एखाद्या थेरपिस्ट बरोबर बोलायला हवं.
थेरपीस्टशी बोलण्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकेल अशी काही कारणे खाली दिली आहेत. अर्थातच थेरपिस्ट शोधण्याची ही केवळ कारणे नाहीत, परंतु ही यादी आपल्याला आपला निर्णय घेण्यात मदत करेल.
१. आपले मानसिक आरोग्य व्यवस्थापित करणे.
२. आपल्याला ताण तणाव व्यवस्थापनासाठी मदत हवी आहे.
३. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यात आपणास अडचण येत आहे.
४.आरोग्यास सहकार्य न करणारी (हानिकारक) कौशल्ये तुमच्यामध्ये निर्माण झालेली असतील तर.
५. आपण आपल्या ध्येयांपर्यंत पोहोचण्यासाठी धडपडत आहात किंवा कसे पोहोचायचे ते न समजणे, अडथळे येणे, माईंड क्लीअर नसणे.
६. बिघडलेली नाती पुन्हा सुधारू इच्छिता पण जमत नाही किंवा कसे करायचे ते माहित नाही, गोंधळ असणे.
७. तुम्हाला स्वतःची आत्म-जागरूकता वाढवायची आहे. मी कुठे आहे, माझी मानसिकता माझ्या विचारांवर योग्य प्रभाव का टाकू शकत नाही?
८. आपण बदलामधून जात आहात म्हणजे नवीन कामाच्या ठिकाणी जाणे, लग्न करून सासरी जाणे, किंवा घरात नवीन व्यक्ती कायमस्वरूपी येणे, मग ते बाळ असो व दत्तक धेतलेली व्यक्ती.
९. आपल्याला लहान मुलांचे संगोपन कसे करावे त्यात गोंधळ होतोय का? किंवा त्यापासून होणार ताण – त्याला कसे हाताळायचे, त्यासाठी.
१०. एखाद्या क्लेशकारक घटनेवर प्रक्रिया करण्यात मदत हवी आहे किंवा अशा घटनेला तोंड कसे द्यायचे असा पेच समोर असणे.
११. आपला मूड आपल्या कामावर परिणाम करीत असेल तर.
१२. आपली भावनिक स्थिती आपल्या भूक किंवा झोपेवर परिणाम करीत असेल. त्याचा परिणाम तब्येतीवर आणि विचारांवर होणे.
१३. आपण आनंद घेत होता त्या गोष्टी मध्ये आता आपण रस गमावला आहे. ज्या गोष्टी आवडायच्या त्याच आता आवडेनाशा होत आहेत.
१४. आपले सामाजिक जीवन दु: खदायक आहे. समाजात तुम्हाला मानपान न मिळणे, त्याबद्दल वाईट वाटणे.
१५. आपल्याला असह्य विचारसरणीचे पॅटर्न बदलायचे आहेत. थोडक्यात, नकारात्मक भूमिकेतून बाहेर यायचे आहे.
१६. आपण जेवढे आनंदी व्हायला हवे होते तितके आनंदी न वाटणे.
१७. आपल्याला संशय आहे की स्वतः मध्ये काही मानसिक आजाराची लक्षणे आहेत.
१८. अभ्यासात किंवा कशातही मन न रमणे.
१९. एखाद्या चुकीच्या मार्गाने जायची इच्छा होणे, आत्महत्या करावीशी वाटणे. मद्यपान, ड्रग्स सोडण्याची इच्छा होणे.
आता अधिक लोकांना मानसिक आरोग्य किती महत्वाचे आहे याची जाणीव होत असून त्यावर चर्चा करण्यास तयार होत आहेत. समुपदेशनाच्या सेवा बऱ्यापैकी मोठ्या शहरामध्ये सहज उपलब्ध होतात परंतु लहान शहरामध्ये अजून हि वेगळ्या अर्थाने या समुपदेशकाकडे पहिले जाते. त्यामुळे प्रश्न न सुटता अजून गंभीर होतो. त्यातून सुटका न होता आपले मन, पैसे, परिवार डोळ्यादेखत उध्वस्त होताना पाहावा लागतो.
म्हणून जसे आपल्याकडे एक डॉक्टर चा नंबर असतो त्याच प्रमाणे एखाद्या मानसोपचार तज्ज्ञांचा सुद्धा नुंबर जरूर जवळ ठेवा. तो तुम्हाला सल्ला देणार नाही परंतु झालेला गुंता सोडविण्यात नक्कीच मोलाचा हातभार लावेल याची श्वास्वति नक्कीच आहे.
श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ
चांगला लेख… स्वतः समुपदेशन घेण्यासाठी खूप हिम्मत लागते … अजूनही शिक्षित समाजात मानसोपचार घेणे म्हणजे मनावर परिणाम झाल्यावर च घेतले जातात असा मोठ्ठा गैरसमज आहे,तथापि ही भावना आता हळूहळू बदलत आहे .. योग्य वेळेत योग्य समुपदेशन घेतल्यास होणारे संभाव्य परिणाम टाळू शकतात…
Yes. It is rightly said that as we have family doctor’s number saved in our mobile , we should have one psychologist number too. It is a necessity due to the increasing complexity in life.