भीती आणि चिंता बहुतेकदा एकत्र येतात, परंतु या वेगवेगळ्या आहेत. सामान्यत: लक्षणे ओव्हरलॅप होत असली तरीही, या भावनांचा एखाद्या व्यक्तीचा अनुभव त्यांच्या संदर्भानुसार भिन्न असतो. भीती एखाद्या ज्ञात किंवा समजल्या गेलेल्या धोक्यांशी संबंधित असते, तर चिंता अज्ञात, अनपेक्षित धोके कळल्यानंतर येते.
भीती आणि चिंता दोघेही समान ताणतणाव निर्माण करतात. परंतु बर्याच तज्ञांचा असा विश्वास आहे की या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहेत. हे आपण आपल्या वातावरणात विविध तणावांना कसे प्रतिक्रिया / प्रतिसाद देतो यावर अवलंबून आहे.
चिंता म्हणजे काहीतरी वाईट घडणार अशा प्रकारची अस्वस्थ करणारी भावना निर्माण होते. चिंता अनेकदा अनेक अस्वस्थ करणाऱ्या शारीरिक संवेदनांसह येते. चिंतेच्या सर्वसामान्य शारीरिक लक्षणांपैकी काही यांचा समावेश आहे:
१. हृदयाची गती वाढणे. छाती दुखणे
२. थंडी वाजून येणे किंवा उष्णता जाणवणे.
३. चक्कर येणे किंवा अशक्त वाटणे.
४. जास्त घाम येणे. धाप लागणे
५. आपल्याला वेड लागेल कि काय अशी जाणीव होणे.
६. डोकेदुखी
७. स्नायू वेदना आणि तणाव – थरथरणे
८. स्तब्ध होणे किंवा मुंग्या येणे
९. कानात विशिष्ट्य प्रकारचा आवाज ऐकू येणे.
१०. झोपेचा त्रास
११. संपूर्ण शरीरात, विशेषत: डोके, मान, जबडा आणि चेहऱ्यावर कडकपणा जाणवणे.
१२. अस्वस्थ पोट किंवा मळमळ
मग चिंतेची काय करणे आहेत?
१. जेनेटिक – काहींना पारंपरिक ठेवा मिळतो ज्यांच्या घरात मोठ्यांना अँक्सिएटी डिसऑर्डर आहे.
२. वैयक्तिक संबंध, नोकरी, शाळा किंवा आर्थिक दुर्दशामुळे येणारा ताण चिंताग्रस्त विकारांना मोठा हातभार लावू शकतो.
३. औषधांचे साईड इफेक्ट.
४. सभोवतालचे वातावरण.
५. मेंदूतील संसर्ग / मानसिक विचार.
६. दैनंदिन व्यवहारातील घटना ज्या व्यवस्थापित होत नाहीत, तेंव्हा.
७. हार्मोनमधील बदल, व्हिटॅमिनची कमतरता (अयोग्य आहार), कमी झोप.
भीती ही ज्ञात किंवा निश्चित असणारा धोका याला भावनिक प्रतिसाद आहे. या ठिकाणी धोका हा समोर आहे व दिसतो, त्यातून भीती निर्माण होते व आपण घाबरतो किंवा प्रतिसाद देतो. परंतु कित्तेकदा हीच भीती विनाकारण जाणवते व त्यातूनसुद्धा चिंतेसारखे शारीरिक प्रतिसाद दिसून येतात. भीती चिंतेला जन्म देते आणि चिंता भीतीला.
भीतीचे काही प्रकार:
१. उंचीची भीती
२. पाण्याची भीती
३. अंधाराची
४. बोगद्याची
५. कमी हवेची.
६. वेगाची भीती.
७. आणि आता मला कोव्हीड होईल कि काय याची भीती.
भीती आणि चिंता अनेक मानसिक आरोग्याशी संबंधित आहेत. या भावना बहुधा चिंताग्रस्त विकारांशी संबंधित असतात जसे की ;
१. विशिष्ट फोबिया, सामाजिक चिंता डिसऑर्डर आणि पॅनीक डिसऑर्डर इत्यादी.
२. बहुतांशी महिलांचा समावेश जास्त आहे.
३. लहानपणच्या भीतीदायक गोष्टीमुळे मुलांमध्ये दिसून येतो.
४. मानसिक धक्क्यामुळे काहींना तो जास्त जाणवतो.
जर भय आणि चिंतेची लक्षणे असतील आणि त्यांना हाताळता येत नसेल तर मात्र डॉक्टर किंवा मानसोपचार तज्ज्ञाला भेटणे आवश्यक असते. चिंता रोग बरा होण्यासारखा नाही, तो नियंत्रणात ठेवावा लागतो. परंतु ही एक मोठी समस्या होण्यापासून वाचण्याचे अनेक मार्ग आहेत.
१. आपले भय आणि चिंता करण्याचे संभाव्य कारण निश्चित करण्यासाठी डॉक्टर आपल्यामधील सद्य परिस्थितील लक्षणे आणि आपल्या वैद्यकीय इतिहासाचा विचार करतील.
२. मानसशास्त्रीय समुपदेशन सुद्धा कामी येते.
३. लक्षणे कुठून व कशी निर्माण होतात हे प्रत्येकाला जाणवत असते परंतु त्याचा आपण जास्त विचार करत नाही.
४. चिंता किंवा भीती यावर काही औषधी – होमिओपॅथी किंवा न्याचरोपॅथी चा उपयोग जास्त केला जातो.
५. विनाकारण चिंता किंवा भीती असेल तर मानसोपचार तज्ज्ञ ठराविक थेरपीचा वापर करून त्यांना आटोक्यात आणू शकतात.
६. काही चिंता वैवाहिक, आर्थिक, शारीरिक असतील तर त्यासाठी ठराविक एक्स्पर्ट तज्ज्ञाकडून मार्गदर्शन घेऊ शकता.
७. “मन चित्तीं ते वैरी न चिंती” म्हणून मनाला आवरा. त्यासाठी श्वास घ्या, मेडिटेशन करा, परमार्थ, व्यायाम, शक्ती आणि तोंड द्यायला शिकणे.
८. दारू, सिगारेट इत्यादी व्यसने दूर ठेवणे. योग्य आहार, झोप व श्वासोश्वास.
थोडक्यात भीती चिंता येत राहतील त्यांना किती जवळ करायचे ते आपण ठरवावे. प्रत्येक गोष्टीला उतारा आहे. सभोवतालच्या वातावरणातून चांगले घ्यायचे कि वाईट ते ठरवल्यास आयुष्य सहज सुलभ होईल यात शंका नाही.
श्रीकांत कुलांगे
मानसोपचार तज्ज्ञ
Nice to think and will be used to avoid tension
Very useful article in this pandemic.
Every point is to be noted for healthy life