पती-पत्नी यांच्यातील प्रेमळ नातेसंबंधांसमोरील सर्वांत मोठे आव्हान म्हणजे त्यांच्यातील वेगळेपणा आणि मतभेद हाताळणे. अनेकदा जोडपी जेव्हा चर्चा करतात, तेव्हा थोड्याच वेळात त्याचे रुपांतर वादावादीत होते आणि मग त्या दोघांनाही काही समजायच्या आत युद्धासाठी शंख फुंकतात! त्यानंतरची पायरी म्हणजे जोडप्यात अबोला सुरु होतो. आपोआपच एकमेकांना दुखावणे, दूषणे देणे, तक्रारी करणे, आरोप करणे, हट्ट धरणे, रागावणे, संतापणे आणि संशय घेणे, अशी सगळी वावटळ येते.
अशा प्रकारे भांडण करणारे स्त्री आणि पुरुष आपल्या फक्त भावनाच दुखावतात, असे नव्हे, तर आपल्या नातेसंबंधांनाही इजा पोहोचवतात. ज्याप्रमाणे नातेसंबंधांमध्ये सुसंवाद साधणे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, त्याचप्रमाणे वादविवाद घालणे ही सगळ्यात विनाशकारी गोष्ट असते. कारण जितकी आपण अधिक जवळीक करु, तितके आपण दुसऱ्याला अधिक दुखवू किंवा स्वत:ला दुखावून घेऊ.
एक मूलभूत माग॔दश॔क तत्त्व – वादविवाद घालूच नका, त्याऐवजी एखाद्या गोष्टीचे फायदे-तोटे तपासून पाहा. न भांडता, प्रामाणिक राहूनसुद्धा स्वत:च्या नकारात्मक भावना व्यक्त करता येतात.
आपण भांडतो तेव्हा काय घडते?
१. फक्त आपल्या जोडीदारालाच मानसिक त्रास होतो असे नव्हे, तर आपल्यालासुद्धा होतो.
२. स्त्री आणि पुरुषा एखाद्या मुद्यावरुन वाद घालायला सुरुवात करतात आणि फक्त पाच मिनिटांच्या आतच तो मुद्दा सोडून ते बोलण्याच्या पद्धतीवरुन भांडू लागतात.
३. नकळतपणे ते एकमेकांना दुखवायला सुरुवात करतात;
४. आपल्या जोडीदाराच्या बोलण्यातील मूळ गाभा काय आहे, हे समजून घेण्यास व त्याचा स्वीकार करण्यास दोघेही नकार देतात. कारण त्यांची संवाद साधण्याची पद्धतच चुकीची असते.
वादविवाद टाळण्यासाठी आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की,
१. जोडीदाराचा विरोध आपण जे म्हणत आहोत त्याला नसून आपल्या सांगण्याच्या पद्धतीला आहे.
२. वादविवाद करण्यासाठी दोन व्यक्तींची गरज असते, पण तो थांबवण्याठी केवळ एक व्यक्ती पुरते.
३. वादविवाद थांबवण्याचा सर्वांत उत्तम माग॔ हाच की, तो सुरुवातीच्या टप्प्यावर थांबवला पाहिजे;
४. मतभेदाचे रुपांतर वादविवादामध्ये आणि नंतर भांडणामध्ये कधी होते, त्याकडे लक्षा ठेवून त्याची जबाबदारी स्वत:वर घ्या.
५. अशा वेळी तात्काळ बोलणे थांबवा आणि सरळ थोड्या वेळासाठी बाहेर निघून जा.
६. आपण आपल्या जोडीदाराबरोबर कोणत्या पद्धतीने बोलतो, याचे जरा आत्मपरीक्षाण करा.
७. तुमच्या जोडीदाराला जे हवे आहे ते तुम्ही देऊ शकत नाही, हे समजून घ्या!
८. थोडा वेळ मध्ये गेल्यानंतर पुन्हा परत या आणि प्रेमळ आणि आदरयुक्त स्वरात बोलणी सुरु करा, काही वेळासाठी बाहेर गेल्यामुळे तुम्हीसुद्दा शांत व्हाल आणि आपल्या दुखावलेल्या मनावर फुंकर घालाल आणि पुन्हा संवाद साधण्यापूर्वी स्वत:ला स्थिरस्थावर कराल.
पुरुष वाद घालतात त्यामागची छुपी कारणे काही वैचारिक मंथन करून समोर आलेली आहेत.:
१. मी एखादी छोटीशी गोष्ट केली किंवा नाही केली, तर ती भावनिक पातळीवर इतकी प्रमाणापेक्षा जास्त अस्वस्थ होते, ते मला आवडत नाही. अशा वेळी ती मला नाकारते किंवा माझा अस्वीकार करते असे मला वाटते.
२. जेव्हा मी एखादी गोष्ट कशी करावी हे ती सांगू लागते, तेव्हा मला ते अजिबात आवडत नाही. ती माझे कौतुक तर करत नाहीच, उलट एखाद्या लहान मुलाला वागवावे तसे ती मला वागवते असे मला वाटते.
३. तिच्या दु:खासाठी ती मला दोषा देते हे मला अजिबात आवडत नाही; त्यामुळे मी तिचे रक्षाण करणारा तेजस्वी, वीर पुरुषा आहे असे मला वाटत नाही.
४. जेव्हा ती म्हणते की, ती कुटुंबासाठी किती खस्ता खाते, परंतु तिच्या कामाचे चीज होत नाही. तेव्हा हे मला मुळीच आवडत नाही, त्यामुळे मीसुद्धा तिच्यासाठी जे काही करतो त्याबद्दलची कृतज्ञता मला न मिळाल्यासारखी वाटते.
५. ती प्रत्येक समस्येच्या वेळी काळजी व्यक्त करते की गोष्टी बिघडणारच आहेत, त्यामुळे ती माझ्यावर अविश्वास दाखवत आहे असे मला वाटते, जे मला अजिबात आवडत नाही.
६. तिला जेव्हा हवे तेव्हाच आणि तसेच मी बोलावे किंवा काही करावे असे जे तिला वाटते, ते मला बिलकूल आवडत नाही, त्यामुळे ती माझा स्वीकार किंवा माझा आदर करत नाहीये, असे मला वाटते.
७. मी काही बोलल्यावर ती दुखावली जाते, तेव्हा ते मला आवडत नाही. कारण त्यामुळे मला माझ्यावर अविश्वास दाखवल्यासारखे वाटते. माझ्याबद्दल गैरसमजूत करुन घेतल्यासारखे आणि मला दूर ढकलल्यासारखे वाटते.
८. ती जेव्हा मला तिच्या मनातले ओळखायला सांगते, असली कोडी घालते, तेव्हा मला ते आवडत नाही. मला असल्या गोष्टी जमत नाहीत, त्यामुळे मला मी नालायक आहे किंवा अपुरा आहे असे वाटते.
पुरुषाच्या प्राथमिक भावनिक गरजा जर पुरवल्या गेल्या, तर समोरच्याला दुखावणारे वादविवाद करण्याची त्याची प्रवृत्ती कमी होते. आपोआपच तो समोरच्याचे बोलणे लक्षापूव॔क ऐकू लागतो आणि अधिक जास्त आदराने, सामंजस्याने आणि काळजीपूव॔क बोलू लागतो. अशा प्रकारे वादविवाद, मतभेद आणि नकारात्मक भावनांचा संभाषाणाद्वारा निचरा होतो. एकमेकांना दुखावणारे भांडणाचे मुद्दे सौम्य होतात, त्यांच्यात तडजोड होते व अशा प्रकारे सुसंवाद घडून येतो.