प्रभावी संभाषण

प्रभावी संभाषण

 

आई माझा रोज माझ्या पत्नी समोर अपमान करते, काम करत नाही म्हणून हिनवते, आणि मला प्रचंड मानसिक त्रास होतोय म्हणून नितीन खूपच त्रासलेल्या अवस्थेत सांगत होता. अर्थात अशा गोष्टी बहुतांश घरात पाहायला भेटतात. असं का होतं हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही. त्या बाबत आम्ही चर्चा केली आणि मुळ कारण समजलं ते म्हणजे संभाषण कौशल्याची कमी. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
कमकुवत संभाषण कौशल्ये, मतभेद आणि गैरसमज, राग यांचे मुळ असू शकतात.
सर्वात प्रथम आई आणि मुलामधील संबंध खराब होण्या मागील इतर कारणेही तितकेच महत्त्वाचे आहेत.

१. संवादाची भाषा, पद्धत चुकीची.
२. संशयी वृत्ती. (आई, पत्नी, व स्वतःची)
३. मागील नकारात्मक अनुभव पुन्हा पुन्हा चघळणे.
४. मुलाने काम न केल्याने संसारात येणारी आर्थिक चणचण.
५. आईचा प्रेमापोटी असलेला संताप जो मुलाला समजत नाही.
६. मुलाची भूमिका स्पष्ट समजून घेण्यात चूक.
७. मुलाचे प्रश्न विचारत न घेणे व त्याला दुय्यम वागणूक देणे. त्यावर विश्वास न ठेवणे.
८. मुलाचे पत्निवरील प्रेम व झुकाव. त्यामुळे आईला मुलगा दूर जातोय असं वाटणे.
९. मानसिक व शारिरीक व्याधी.

अनन्य कारणे आहेत अनेक नात्यामध्ये वितुष्य आणणारी. परंतु प्रभावी संभाषण कौशल्य वापरून आपले संबंध सुधारू शकतो.

१. आजच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करणे. त्या सारख्या मागील घटनांना मध्ये आणुच नये.
२. काळजी पूर्वक ऐकणे. चुकीचे ऐकल्याने गैरसमज होतात. (समोरच्याचा, स्वतःचा).
३. त्यांचा दृष्टिकोन पाहण्याचा / समजण्याचा प्रयत्न केल्यास, मुळ कारण समजण्यास मदत होते.
४. सहानुभूतीसह टीकेला प्रतिसाद दिल्यास वाद निर्माण होत नाहीत. रागावल्यामुळे संवाद होत नाहीत.
५. हे समजून घ्या की वैयक्तिक जबाबदारी एक शक्ती आहे, कमकुवतपणा नाही. आपण चुकीचे असल्यास संभाषणात कबूल करणे जरुरी.
६. समोरच्या व्यक्तीला दोष देण्या पेक्षा, मी शब्द वापरून समजदारी दाखविण्यात समजूतदारपणा आहे.
७. युक्तिवाद “जिंकण्याचा” प्रयत्न करण्याऐवजी प्रत्येकाच्या गरजा भागविणारी निराकरणे शोधल्यास संवाद साधला जातो.
८. काही गोष्टींना लगेच उत्तर नसते. तेंव्हा छोटा ब्रेक घेणं गरजेचं.
९. भांडणं व्हायला लागली की थोडं थांबलेलं बरं. विचार करून पुढे बोलता येते.
१०. जरुरी असल्यास तज्ज्ञांची मदत होते.
११. दुसर्‍या व्यक्तीची कृती आपल्याला आवडत नसली तरीही त्यांचा आदर ठेवणे महत्वाचे आहे हे लक्षात असूद्या.

प्रभावी संभाषण कौशल्याचे उद्दीष्ट हे परस्परांना समजून घेणे होय, एक युक्तिवाद जिंकणे किंवा “बरोबरी करणे” नव्हे तर दोन्ही बाजूंना अनुकूल करणारा तोडगा शोधणे असा आहे. अर्थात हे नेहमीच शक्य होतं असे नाही. तरीही कुटुंब व्यवस्था विस्कळीत न होऊ देण्याची मानसिकता मनात ठेवल्यास शक्य होते. आई आणि मुलांमधील नाते हे अत्यंत महत्वाचं आहे. जोडीदार आणि आई यांच्यात सुसंवाद ठेवण्यास प्रभावी संभाषणाचा वापर जरूर करा, आनंद मिळेल.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *