मानसिक आरोग्य आणि उन्हाळा
आता जवळपास उन्हाळा संपत आलाय, परंतु मागील काही महिन्यांचे ऊन आणि उष्ण वाऱ्यांचे आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होतात याची पर्वा कुणी करताना दिसत नाहीत. उन्हाळ्यात कडक उन्हाची चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध उष्माघात, अशक्तपणा आणि पाण्याची कमी यांसारख्या शारीरिक समस्यांशी जोडला जातो. उष्माघात टाळण्यासाठी, आपण शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्णतेच्या लाटेपासून वाचवण्यासाठी अनेक मार्ग वापरतो. …