अपेक्षांचे ओझे
आई, वडील, पालक, मुलं, नातेवाईक व शेजारी यांच्याकडून प्रत्येकाच्या काही ना काही अपेक्षा परस्परांबाबत असतात. लॉकडाऊन मधील काळात हि गोष्ट घरोघरी प्रकर्षाने दिसत आहे. नको त्यापेक्षा जास्त वेळ एकमेकांबरोबर राहिल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. प्रत्येकाच्या आदर्श वागण्याच्या काही चौकटी बनवलेल्या असतात व ते सर्व त्यानुसार वागत असतात; पण साऱ्यांनी तसेच वागले …