टाळुया घटस्फोट!
पती पत्नी मधील संभाषण अती महत्वाचे असतात. प्रेम, सुख या शब्दांचा लग्नाच्या संदर्भातील अर्थ फार थोडय़ा मंडळींना कळलेला असतो. अनेकांना कथा-कादंबऱ्यांत वाचलेला किंवा नाटक-सिनेमात पाहिलेला काल्पनिक, रोमँटिक अर्थ अभिप्रेत असतो. पण वास्तव अगदी वेगळे आहे, हे जेव्हा त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्यांचा भ्रमनिरास होतो. जॉन गोटमन या मानसशास्त्रज्ञाने एका प्रयोगात क्षुल्लक ते गंभीर कारणांवरून पति-पत्नीत …