Blog by Shrikant

गेट टुगेदर

शालेय विद्यार्थी पुढे मोठे होऊन, पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देतात तो इव्हेंट म्हणजे गेट टुगेदर. प्रत्येक गेट टुगेदरच्या संकल्पना वेगवेगळ्या. भरपूर जण या इव्हेंट ची वाट पाहतात तर काहींना याच्याशी दूरदूर संबंध नसतो. आयुष्याला कंटाळलेले, रोजच्या विवंचनेतून वाट काढता काढता नाके नऊ आलेले सह मित्र त्यांच्या अडीअडचणी मुळे येऊ शकत नसल्याचे काहींना शल्य …

गेट टुगेदर Read More »

जनरेशन गॅप आणि आपण

मुलीचे आणि तिच्या आजीचे अजिबात पटत नाही म्हणून पालक मुलीला घेऊन समुपदेशन साठी आले होते. एकूणच ही केस बऱ्याचदा अनेक घरात आढळते. विचार आणि वागणूक यांच्या संघर्षामुळे दोन पिढ्यांमध्ये बहुतांश ताणतणावाचे वातावरण दिसून येते. ‘जनरेशन गॅप’ या नावाने ओळखला जाणारा हा प्रकार. त्यातून आधीच्या आणि नंतरच्या पिढीच्या विचारसरणीत असलेले अंतर दिसून येते. परंतु परिस्थितीमध्ये झपाट्याने …

जनरेशन गॅप आणि आपण Read More »

मानसिक दुरावस्था

मागील आठवड्यात आलेल्या अनेक केसेस पैकी 40% केसेस या “इतरांच्या वागणुकीमुळे मला त्रास होतोय” या कॅटेगरीतील होत्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अशी ठाम समजूत करून घेतलेली असते की, घडलेल्या घटना किंवा इतरांचं वागणं हेच आपल्या भावभावना ठरवित असतात. आपल्या आयुष्यात दु:ख हे अनुभवाला येणारी परिस्थिती आणि इतरांचं वागणं यामुळेच निर्माण होते. यावर बरेच लोक विश्वास ठेवत …

मानसिक दुरावस्था Read More »

भावनिक दुरावस्था

“माझं कुणी ऐकतच नाही म्हणून मला प्रचंड मनस्ताप होतो, घरात कुरबुर वाढली असून जीवन असह्य होतेय,” अशा विषयाशी संबंधित एक व्यक्ती काही आठवड्यांपूर्वी समुपदेशन घ्यायला आली होती. जवळपास सहा सिटिंग मध्ये हा प्रश्न बऱ्यापैकी निकालात निघाला. आपल्या सर्व मागण्या पूर्ण व्हाव्यात, इतरांनी आपले ऐकावे, आपला आदर करावा, भावनांची कदर करावी असा कटाक्ष असणार्‍यांनी वास्तवाकडे डोळसपणे …

भावनिक दुरावस्था Read More »

मुलांची मानसिकता

मुलांचे दैनंदिन प्रश्न वाढलेले दिसतात म्हणून अनेक पालक समुपदेशन घ्यायला येतात. परंतु बऱ्याच पालकांना आपल्या मुलाचे मानसिक आरोग्य ठीक नाही हे समजत सुद्धा नाही. फक्त आपला पाल्य नीट वागत नाही म्हणून त्याला किंवा तिला नको ते बोलत असतात. पालक म्हणून, आपल्या मुलाचे मानसिक आरोग्य दररोज कसे तपासायचे ते जाणून घ्या. जर लहान मूल वेगळं वागत …

मुलांची मानसिकता Read More »

प्रतिकूल परिस्थिती आणि वागणं

अनेक दिवसांपासून मुलांबरोबर काम करताना त्यांच्या मनातील उलघाल जाणवते. त्यांची आजच्या जगात जगायची हिम्मत तुटताना पाहताना मन विषण्ण होऊन जातं. मन स्वस्थ ठेवून, हिंमत न हरता संकटांवर मात करण्याची क्षमता (Adversity Quotient ) कशी विकसित करायची हे मुलांना शिकवण्याची हीच वेळ आहे. या काळात मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं आहे. मनाच्या स्वस्थतेचा आणि शरीर स्वस्थ असण्याचा …

प्रतिकूल परिस्थिती आणि वागणं Read More »

झोप आणि परिणाम

झोपेचे प्रॉब्लेम असलेले अनेकजण आपल्या सहवासात असतात आणि त्यांचे प्रश्नही तसेच अनेक असतात. समुदेशन करताना अशा केसेस आम्ही शक्यतो क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे रेफर करतो कारण त्याचे अनेक शास्त्रीय कारणे असू शकतात आणि त्यांच्या विविध चाचण्या या मागील कारणे शोधण्यासाठी मदत करतात. म्हणून ज्याना असे प्रश्न आहेत त्यांनी जवळील समुपदेशकाकडे जाऊन चेक करणे आवश्यक असते. काहीना झोपेच्या …

झोप आणि परिणाम Read More »

मेंटल हेल्थ डे

मानसिक आरोग्याला शारीरिक आरोग्याच्या बरोबरीने हाताळले जावे म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत. दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी “जागतिक मानसिक आरोग्य दिवस” साजरा केला जातो. मानसिक आरोग्य समस्या आपल्या जीवनात, कुटुंबांमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि समुदायांमध्ये अस्तित्वात आहेत, ज्यामुळे प्रत्येकावर परिणाम होतो. व्यक्ती आणि समाज म्हणून – मानसिक आजार टाळण्यासाठी आपण शक्य तितके केले पाहिजे. लोकांच्या मानसिक …

मेंटल हेल्थ डे Read More »

राग आणि भावनिक बुद्धिमत्ता

आपल्या आयुष्यात भावनांना केवढं महत्त्व असतं. आयुष्य घडवण्याचं आणि बिघडवण्याचं काम अनेक वेळा या भावनांमार्फतच होत असतं. बिघडवण्यात रागाला पहिला नंबर द्यावा लागेल. लहानसहान गोष्टींवरून रागावणारी अन् त्यामुळे परस्परांशी महिने किंवा वर्षानुवर्षं अबोला धरणारी माणसं किंवा कुटुंबं बघितली की वाटतं, हे रुसवेफुगवे खरंच योग्य कारणांसाठी असतात का? छोटी मोठी कारणं हे दोन कुटुंबांत दुरावा निर्माण …

राग आणि भावनिक बुद्धिमत्ता Read More »