आपण सर्व काही कारणास्तव सतत विचार करत असतो कारण ती एक मानसिक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया जर निरोगी भावनेतून झाली नाही तर मात्र त्याचा मानसिक त्रास व्हायला लागतो. आज बरेचजण या अवस्थेतून जात आहेत. म्हणून याबाबत आज काही मित्रांशी बोलताना त्यांना सांगितले की विचार कौशल्य आपल्यात असणे गरजेचे. पण असे का होतं की आपण विचार करायची पद्धत चुकीची वापरतो.
१. कधी विचार कौशल्य शिकवली नाहीत किंवा माहित नसणे
२. विचार करताना लागणाऱ्या माहितीचा अभाव.
३. टेक्नॉलॉजीचा अवास्तव वापर.
४. प्रॅक्टिकल अभ्यास किंवा कामाचा अनुभव कमी.
५. मन विचलित असणे. त्यामुळे विचार करताना साखळी तुटते.
६. बराच वेळ केलेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी व्यस्त होणे.
७. विचार कौशल्यांचा फायदा माहीत नसणे.
८. एकाच वेळी अनेक गोष्टी करणे.
विचार करण्याचे कौशल्य नसल्याने आपले बरेच नुकसान होते जसे कि,
१. वेळेचा व पैशाचा अपव्यय.
२. गोंधळाची व अनिश्चिततेची परिस्थिती.
३. मानसिक आरोग्यावर परिणाम.
४. कौटुंबिक अस्थर्य.
५. नकारात्मक भावना विचारावर प्रभाव टाकतात त्यामुळे निर्णय चुकीचे घेतले जातात.
६. ध्येपूर्तीसाठी वेळ लागतो.
७. संपूर्ण निर्णयप्रक्रियेत आत्मविश्वास कमी दिसून येतो व त्याचा परिणाम कामावर होतो.
जर आपल्या विचार प्रक्रियेमध्ये एवढा विश्वास नसेल तर समजायचे की माझ्यात कौशल्यांची कमी आहे व ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे. कसे करायचे किंवा काय करायचे हे काही रॉकेट सायन्स नाही. तरीपण काही गोष्टी लक्षात ठेवल्यास फरक पडेल.
१. लक्षात ठेवणे व आठवणे – माहिती आपल्या मेंदूत शाबूत असते व योग्य वेळी त्याचा उपयोग विचार करताना होतो.
२. माहितीचे विश्लेषण, आकलन, समज व वापर.
३. जी माहिती घेतली त्याचा उपयोग योग्य ठिकाणी करण्याची वृत्ती. विचार करताना, माहितीचा अभाव नसावा.
४. विचार करताना माहितीचा वापर अवाजवी नको.
५. खात्रीलायक माहिती संकलन. चुकीच्या माहितीमुळे विचार करताना त्रास होतो, निर्णय चुकतात.
६. सकारात्मक विचार कायम असतील तर विचार प्रकिया सुलभ होते.
७. काही चुकल्यास नोंदी ठेवणे. दुरुस्ती करणे. एका वेळी एकच काम करण्याची सवय ठेवल्यास विचार प्रक्रिया चांगली होईल
असे अनेक कौशल्ये आत्मसात करायची इच्छा असेल तर त्याबाबत मोठ्या प्रमाणात वाचन, भेटीगाठी, निरीक्षण, आणि मानसिक संतुलन ठेवणे गरजेचे. विचार कौशल्यांचा विकास करणे आज काळाची गरज आहे. वेळ आणि पैसा महत्वाचा म्हणून विचार प्रक्रिया सुदृढ हवी. नातेसंबंध व समाज आपल्याकडून चांगल्या कामाची अपेक्षा करत असतो व त्यासाठी विचार करण्याची पद्धती बदलून आयुष्यातील अंधार नष्ट होऊ शकतो.
© श्रीकांत कुलांगे
9890420209