आजकाल मुले ऑनलाईन शिकत आहेत म्हणून पालकांना चिंता. मुलांना तर हक्काने मोबाईल बरोबर रहाण्याची सोय म्हणून तेही खुश. ठराविक वेळ असे तंत्रज्ञान वापरणे ठीक पण जर आपण याचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला तर मात्र आपल्या मानसिक आरोग्यावर खोलवर परिणाम होतो. IT इण्डस्ट्री मध्ये हा प्रामुख्याने जास्त आढळतो. मग असे कुठले छुपे परिणाम तंत्रज्ञानाचे आपल्यावर होतात…
१. इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर जास्त अवलंबून राहायला लागलो आहोत. त्यामुळे आपल्या स्मृती (मेमरी) वर परिणाम होतो.
२. चिंता – इंटरनेट बँकिंग विश्वातील धोके, खाजगी माहितीची चोरी चिंता वाढवतात,
३. चाट, सोशीअल मीडिया वर आपल्याला मिळालेले कमी रिस्पॉन्स न्यूनगंड तयार करतो. मग नैराश्य येते.
४. गेम्स खेळायला इच्छा होते व त्याचे आपण गुलाम बनतो. अभ्यास, कुटुंब, शाळा यांच्यापासून दूर जातो. पालक हतबल होतायेत.
५. सोशल मीडियाच्या माध्यमातून येणारे भयानक मेसेजेस डोक्याचे केस गळायला लावतात.प्रसंगी उच्च रक्त दाब.
६. आपल्या माणसांपासून दूर जातो. दुरावा निर्माण होतो.
७. चिडचिडा स्वभाव बनतो.
उद्या जर कधी इंटरनेट बंद झाले तर जगातील २३% जनता आत्महत्या करेल असे मानसशास्त्रीय संशोधक सांगतात. कोविड १९ दरम्यान आपली इंटरनेट वर मदार जास्त वाढली. आपण तंत्रज्ञानाचा वापर प्रमाणापेक्षा जास्त केला तर त्रासदायक होते. मग काय करावं..सोपे नाही पण करू शकतो:
१. सकारात्मकतेने डिजिटल डिटॉक्स प्रामाणिकपणे चालू केला पाहिजे. मोबाईल, लॅपटॉप झोपायच्या आधी एक तास दूर.
२. दिवसातून गरज असेल तेंव्हा फोनला हात लावल्यास रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. फोन holder वापरून पहा.
३. मेडीटेशन चा उपयोग चांगला होतो.
४. चाट ऐवजी फोन करणे. कमी बोलुया.
५. दूरच्या मित्रांऐवजी जवळचे संबंध बरे.
६. लहान मुलांनी फोन वापर करायचा असेल तर ठराविक ऍप्लिकेशन काढलेले बरे. त्यांचा विश्वास संपादन करून मोबाईल चे फायदे व तोटे समजाऊन सांगणे.
खूप चांगल्या गोष्टी होतील कारण कित्येकांना तंत्रज्ञानाचा वाढता वापर डोईजड होतो याची जाणीव व्हायला लागली आहे. त्याचे फायदे बरेच आहेत.
१. मानसिक शांती.
२. डोळे व डोकेदुखी संपली.
३. नित्य व्यायाम व छंद जोपासल्यामुळे प्रकृती स्थिर राहिली.
४. नवीन गुणांची ओळख झाली.
५. ज्या घरामधून तंत्रज्ञानाचा वापर अवाजवी व्हायचा, त्यांनी वेळ ठरवून कामे किंवा अभ्यास सुरू ठेवला.
६. चिंता, नैराश्य, राग दूर झाला कारण इतर छंद त्यांना मदत करत गेले.
एक ना अनेक, असे तंत्रज्ञानाचा उपयोग संतुलित ठेवल्यास, मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही. हे ज्यांना समजले ते सुधरले, ज्यांना नाही ते मानसिक रोगाकडे प्रस्थान करू लागलेत. वेळेवर तंत्रज्ञानाचा वाढता विळखा दूर ठेवला तर कौटुंबिक समस्या कमी होतील.
©श्रीकांत कुलांगे
9890420209