नातेसंबंध व भावनिक बुद्धिमत्ता

आजकल जोडप्यातील भांडणं गेल्या काही महिन्यांपेक्षा कमी होताना दिसतात असा एक सूर मानसोपचार तज्ज्ञ व्यक्त करतात. असं नेमकं खरंच घडतंय का हा संशोधनाचा भाग. परंतु नित्य नियमाने होणारे जोडप्यांमधील भांडणं कमी होत असतील तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते.

युगानुयुगे टिकणारा नातेसंबंध एका रात्रीत तयार होत नाही. हा एक दूरवरचा प्रवास आणि एक संथ व स्थिर प्रक्रिया आहे. नाते टिकण्यासाठी हे महत्वाचे आहे की तुम्ही एकमेकांशी किती चांगले व योग्य बोलता आणि तुमच्या नातेसंबंधात येणाऱ्या अडथळ्यांमधून आणि कठीण खेळीतून काम करता. अशा काही जोडप्यांबरोबर गप्पा मारताना काही गोष्टी बाहेर आल्या.

१. जे जोडपे आनंदी, निरोगी नातेसंबंधात राहतात ते फक्त प्रभावी संभाषण कौशल्यामुळे. हीच गोष्ट त्यांचे बंध आणि एकमेकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची गुरुकिल्ली आहे.

२. त्यांच्यामधील संभाषण प्रक्रिया बदलली. रोजची कटकट करण्यापेक्षा भाषेचा सूर बदलला.

३. समुपदेशन घेतल्याचा फायदा दिसून आला. समुपदेशनकर्त्याने सांगितलेल्या टीप्स चा योग्य वापर.

४. कुठल्याही कामाचा आनंद घेण्याची क्रिया वाढली. प्रोब्लेम पाहण्यापेक्षा सहकार्य करण्याची भावना जोपासली.

५. स्पोर्ट्समनशिप वाढीला लागली कारण एकमेकातील दोषाकडे लक्ष देण्यापेक्षा समजदारीची भुमिका बजावली. एकमेकांना कंपलिमेंट्स दिल्या.

६. कोविड पश्चात आलेल्या समस्यांनी काहींचे डोळे उघडले. रिॲलिटी समोर आली.

७. कौटुंबिक व सामाजिक समस्यांवर तोडगा काढण्यात आला. त्यासाठी योगाभ्यास, वाचन संस्कृती, अध्यात्म आणि योग्य संगत याचा फायदा झाला.

८. आलेल्या समस्यांना जागेवर तोंड देऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न केले.

९. संवाद साधत आपसातील मतभेदाला वाट करून दिली. मनातील उलघाल कमी होण्यास मदत झाली.

१०. हळूहळू पूर्वपदावर येत असणारी अर्थव्यवस्था संथ जरी असली तरी आजचा दिवस आपला आहे यावर ठाम विश्वास. यातून नवीन कल्पनांचा उगम.

११. एकमेकांना बरोबर घेऊन काम करण्याची प्रक्रिया वाढली. सकारात्मक ॲप्रोच कमी येतो ही सशक्त भूमिका.

१२. झालं गेलं गंगेला मिळालं. मागील इतिहासाला मूठमाती देण्यास प्राधान्य.

१३. मानसिक आरोग्य आणि सौंदर्य किती महत्त्वाचे याची प्रचिती.

वरील गोष्टी फक्त एक छोटा पार्ट आहे नाते जपण्याचा. या मध्ये अनेक पैलूंवर प्रकाश आपण टाकलेला नाही. भावनीक बुद्धिमत्ता आणि तिचा वापर या सर्वांच्या पाठीमागे आपली सद्सद्विवेक बुध्दी शुद्ध करत असते. याची प्रचिती तेंव्हाच येते जेंव्हा आपण आपला इतिहास धुंडाळतो. भावनीक बुद्धिमत्ता कौशल्य आत्मसात करून त्यांचा वापर करणं अवघड नाही. त्यासाठी बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्यास कुणीही आपले हितसंबंध व नाते जपण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकतात. काय आहेत या स्टेप्स:

१. आत्म-जागरूकता.

२. भावनांचे व्यवस्थापन.

३. तणाव व्यवस्थापन.

४. सकारात्मक संवाद.

५. भावनांची जाणीव, संवेदना.

६. रचनात्मक विचार.

७. सबुरी व निर्णय शक्ती.

आपल्या इच्छा इतरांसमोर ठेवल्याने नकारात्मक वृत्ती निर्माण होते. आपणच खरे हा attitude आता विरघळला पाहिजे. थोडक्यात संवाद साधला तर इतर त्रासदायक गोष्टींना फाटा देता येतो. प्रभाव पाडण्यासाठी, एखाद्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी काहीवेळा आपला मुद्दा मांडण्यासाठी तुमच्याकडे फक्त काही मौल्यवान मिनिटे असतात,. कोणाकडेही वेळ नसतो आणि तुम्ही काय म्हणू इच्छित आहात याचा उलगडा करण्यात त्यांना जास्त वेळ वाया घालवण्यात रस नसतो. अशा जगात जिथे खूप चल विचलता, आवाज आणि गोंधळ आहे, आपले संभाषण शक्य तितके सोपे ठेवणे हा सर्वात प्रभावी मार्ग आहे. हाच तर खरा भावनिक बुद्धिमत्तेचा वापर नाही का? शब्द प्रयोग, देहबोली, वाक्याची रचना, देण्याचा भाव, कृतज्ञता, तणाव हाताळणी, रिस्पेक्ट हेच तर खांब आहेत नाते सांभाळायचे. कदाचित हेच त्या जोडप्यांच्या लक्षात आले असावेत. हीच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *