भीती बरोबर जगणं

जेंव्हा मित्राने त्याच्या काळजीचे कारण सांगितलं तेंव्हा हसायला आलं. आजकाल केस गळती हे नवीन भीतीचं कारण होतं. किंबहुना फक्त केसच नाही तर अशा अनेक प्रकारच्या भीतीचा (फोबिया) सामना आपण रोज कळत नकळत करत असतो. त्याबाबत काही बोलतात तर काही नेहमीचे आहे म्हणून विचार करत नाहीत. जवळपास १०% लोक या भितीपायी जगभरात आजारी पडतात, हा त्रास स्त्रियांना अधिक होतो. लहानपणाासूनच सुरुवात होऊन या भीती आपल्या मानगुटीवर बसलेल्या असतात. असे का होतं म्हणून शास्त्रज्ञांनी याबाबत काही तथ्य सांगितले.

१. जेनेटिक- आई वडिलांकडून आपल्यात.
२. सांस्कृतिक घटक- काही ठिकाणी आपल्यामध्ये वेगळ्या स्वरूपाच्या भीती निर्माण करत असतात.
३. वर्तणूक आणि पर्यावरणीय घटक – बर्‍याच भीती या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित असतात.

मग इथून सुरुवात होते भीती वाटण्याची. हळूहळू वाढत जातात. अशा कुठल्या भीती आहेत ज्या आपल्याला जाणवतात.

१. कोळी (spider) पाहिला की भीती वाटते. तत्सम वर्गातील कीटक यामध्ये येतात. उदा.झुरळ, उंदीर.
२. काहीना सापाची भीती असते. समोर असो व नसो, कुणी फक्त साप म्हटले तरी टुणकन उडी मारून अंग चोरून इकडे तिकडे पाहतो.
३. उंचीची भीती, 6% पेक्षा जास्त लोकांना प्रभावित करते. कधीही उंचीवर ने गेलेल्यांना सुद्धा भीती जाणवते. ऐकीव घटना किंवा स्वतः वाईट गोष्ट अनुभवल्या नंतर.
४. विमानाचा अपघात प्रत्यक्षात कमी घडून सुद्धा प्रौढांपैकी 10% ते 40% लोक विमानातून प्रवास करायला घाबरतात.
५. कुत्र्यांचा भीती, अनेकदा विशिष्ट वैयक्तिक अनुभवांशी संबंधित असते जसे की बालपणात कुत्रा चावला.
६. मेघगर्जनेसह गडगडाटाची भीती.
७. इंजेक्शन्सची भीती, अशी परिस्थिती जी लोकांना कधीकधी वैद्यकीय उपचार आणि डॉक्टर टाळण्यास कारणीभूत ठरू शकते.
८. सामाजिक भीती. अनेक घटना आपल्याला ही भीती मनात घालुन देण्यासाठी कारणीभूत.
९. एकटेपणाची भीती, मग ती घरात किंवा गर्दीच्या ठिकाणी.
१०. जंतूंचा आणि घाणीची जास्त भीती. लोकांना अत्यधिक स्वच्छता, सक्तीने हाताने धुण्याची सवय जडते. बाहेर कुठे खात नाहीत की गर्दीत जात नाहीत.
११. माणसं, अंधार, भुतं, टक्कल पडायची भीती….

अशा अनेक प्रकारच्या भीती (फोबिया) माझ्या ध्यानात आल्या. हा एक मनोविकारचा अनेक विकारांपैकी एक सामान्य प्रकार आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या कार्य आणि विकासात अडथळा आणू शकतात. त्यासाठी ट्रीटमेंट उपलब्ध आहेत पण त्या घेण्यासाठी आपण प्रवृत्त होत नाहीत. Psychiatrist ला भेटून औषधोपचार आणि तज्ञ समुपदेशकाकडून समुपदेशन व थेरपीचा वापर करून ठीक होऊ शकतो.

© श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *