पाळीव प्राणी घरात असतील तर ते काहींना तणावाचे कारण बनतात तर काहीना चिंता दूर करण्याचे. आकाशने न सांगता, विचारता दोन सुंदर अशी मांजरांची पिल्ले आणली व नाव ठेवले, बूनबून आणि मुनमुन. घरात आणल्या बरोबर राग, लोभ सगळ्यांच्या चेहऱ्यावर साफ दिसला..आता यांचं करणार कोण..काही दिवसात बुनबून, मुनमुन मुळे सगळ्यांना एक प्रकारची तरतरी आली अन covid ची भीती विसरून सगळी मंडळी शांत झाली. पाळीव प्राणी आपल्या घरात शांती ( तात्पुरती का होईना ) आणतात यावर शिक्कमोर्तब झाले. काल अचानक शेजारच्या कुत्र्याने बुनबूनचा बळी घेतला आणि प्रत्येकाला यामुळे वाईट वाटले.
पाळीव प्राण्यांची कुटुंबाला सवय झाली की बऱ्याच चिंता कमी झाल्याचे दिसले. असे का होते?
१. मेडीटेशन, योगा, मित्रांच्या भेटीगाठी यासारखे मानसिक व शारिरीक स्वास्थ्य टिकवण्यासाठी पाळीव प्राण्यांचा उपयोग होतो.
२. मूड बदलासाठी उपयुक्त. कितीही खराब मूड असेल तर मांजर, कुत्रा यांच्या जवळपास असण्याने आपल्यात कमालीचा फरक पडतो.
३. रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी उपाय. चिंता आणि तणाव कमी झाल्याने मदत होते.
४. त्यांच्या बरोबर खेळावे लागते म्हणून आपण नाईलाजाने का होईना पण आपली शारीरिक हालचाल होते.
५. पाळीव प्राणी असल्याने अनेक अनोळखी व्यक्तीशी आपला परिचय होतो, ते थांबतात, विचारपूस करतात, थोडावेळ का होईना विरंगुळा.
६. सभोवताली लोक नसतात अशा ठिकाणी पाळीव प्राणी आपल्यासाठी असू शकतात. ते प्रेम आणि सोबत देतात. आरामदायक शांतता, गुपिते ठेवू शकतात आणि उत्कृष्ट स्नॅगलर आहेत.
७. एकाकीपणासाठी सर्वोत्तम औषध असू शकतात.
८. येणारे धोके ओळखून आपल्याला वाचवतात.
९. श्वासोच्छ्वास अधिक नियमित होतो. स्नायूंचा त्रास कमी होण्यास मदत. मानसिक आजारातून बरे होण्यास साथ देतात.
१०. पाळीव प्राणी आपला आत्मविश्वास आणि चांगला स्वभाव होण्यास मनोबल वाढवतात
११. नातेसंबंध सुधार होण्यास मनात इच्छा जागृत करणे. प्राण्यावर प्रेम केले की माणसावर सुध्दा होते.
१२. लहान मुलांचे ते मित्र बनतात. त्यांना खेळते ठेवतात.
१३. आपलं ऐकतात…हे महत्वाचं.
आज पाळीव प्राण्यावर एवढं का लिहितोय म्हणून मी विचार केला की खरंच covid १९ छा स्ट्रेस मनमोहक मुनमुन मुळे कमी झाल्याचे मला स्पष्ट जाणवल. आयुष्यात येणाऱ्या अप्रिय गोष्टींना आपण रोखू नाही शकत पण मनाला आनंद देणाऱ्या अनेक गोष्टी आहेत त्यांना मी आपलेसे करू शकतो.
मानसशास्त्रात पाळीव प्राण्यांचा थेरपी साठी उपयोग करून घेण्यात येतो. एकाकीपणा, उद्विग्नता, कंटाळा, उदासीनता यासाठी हा काहींसाठी रामबाण उपाय आहे. अर्थात पाळीव प्राणी व त्यांची निगा, ट्रेनिंग, औषधोपचार घेतल्यास वेळ व नित्य जीवन अत्यंत सुखकर होण्यास नक्कीच मदत होते.
©श्रीकांत कुलांगे
9890420209