वैशाली मुलाखतीला जायच्या अगोदर थोडी चिंताग्रस्त होती. एक तर COVID मुळे जॉब नाहीत आणि त्यात नवीन कॉल म्हणून चिंता. बोलली कि जाम टेन्शन आलेय सर कारण माझा अवतार हा असा – कसा मिळेल मला जॉब. तिला एकच गोष्ट सांगितली कि तुझ्यात चांगली गोष्ट कुठली तिचा वापर कर आणि बघ. मला तिच्यामधील एक स्टुडन्ट म्हणून आत्मविश्वास प्रचंड आवडायचा आणि खात्री होती कि तिला माझा मेसेज नक्कीच समजेल. तिसऱ्या दिवशी खुश खबर कि जॉब मिळाला म्हणून आणि अतिसाधारण दिसणारी मुलगी तिच्या फक्त आत्मविश्वासामुळे आज जिंकली होती. तिच्या सकारात्मक व्यक्तिमत्वाने तिला साथ दिली. वेगळे न्यूनगंड असूनदेखील आपल्याला काय चांगलं येतं त्यावर ठाम विश्वास ठेवणे म्हणजेच सुंदर व्यक्तिमत्व.
व्यक्तिमत्व विकास नेमका कसा करायचा याचे जुजबी ज्ञान असले तरी विशिष्ट वयात येताना प्रत्येकाला व्यक्तिमत्त्व विकासाची भीती वाटते. प्रत्येकाचे स्वतःचे गुण आणि ठराविक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे तो तिला / त्याला इतरांपासून वेगळा बनवितो. व्यक्तिमत्व म्हणजे चांगले आणि आकर्षक दिसणे हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. व्यक्तिमत्व एक अतिशय व्यापक संज्ञा आहे आणि एखाद्या व्यक्तीची शारीरिक तसेच मानसिक स्थिती विचारात घेते. तुम्ही कुठेही जा, एखादी मुलाखत असो किंवा आपले रोजचे काम करण्याचे ठिकाण, आपले एकूण व्यक्तिमत्त्व आपले यश निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असते. कालच्या ब्लॉग मध्ये मी तेच सांगितले कि सकारात्मक व्यक्तिमत्व नेहमीच मनाची सुंदरता दाखवत असते.मन आणि बुद्धिमत्ता यांचा बेमालूम संगम एखाद्याचे आयुष्य घडवत किंवा बिघडवत असतं आणि त्याचे खूप उदाहरणे आहेत. मनातून येणाऱ्या संकल्पना सुंदर असतील तर ती व्यक्ती कधीच चुकीच्या मार्गावर नसते. नकारात्मक व्यक्तिमत्वाला बदलणे सोपे नसते कारण त्याला लागणारा अटीट्युड खूप कष्टाने तयार करावे लागतो. मग तुम्ही म्हणाल हे शक्यच नाही का, उत्तर “आहे”.
काय करावं लागेल ?
१.एखाद्या व्यक्तिमत्व विकास केंद्रावर जाऊन कला शिकणे. परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर आपले दोष आपण एका आठवड्यात बदलणार नाही किंवा कोणतीही जादू होणार नाही. पण काय होईल कि तुमचे दोष व त्याचा स्रोत कसा थांबवायचा ते समजेल. मग आपल्या दोषावर उपाय जो आहे त्याचा प्रयत्न करणे. स्वत: ला कसे हाताळावे आणि चांगले कसे असावे याबाबत मार्गदर्शन करतात. थोड्या मार्गदर्शनानुसार हे नंतर स्वतःच केले जाऊ शकते.
२. कोणालाही कॉपी करू नका. स्वतःची कौशल्ये शोधा.
३. आपली स्वतःची वैयक्तिक शैली तयार करा. प्रयत्न आणि सुसंगतता यश देईल.
४. स्वत: वर संशय घेऊ नका. प्रत्येक दिवशी तुम्हाला तुमच्यात चांगला बदल जाणवेल.
५. चांगले श्रोते व्हा. चांगलं आणि वाईट दोन्ही गोष्टी ऐकायच्या आहेत – सुरवातीला त्रास जो नंतर कमी होत जाईल.
६. संयम ठेवण्यास आणि आपल्या संभाषण कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यास शिका.
७. वेषभूषेकडे लक्ष द्या. साधीच पण विस्कळीत नको. नित्य व्यायाम किंवा योग शारीरिक बांधणी नीट ठेवतो.
८. ओरडू नका किंवा आक्रमक होऊ नका. ध्यान भावनेने मनात शांतता येते. मन शांत झाले तर विवेकावर मात होते.
कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत. प्रत्येकजण अशा व्यक्तीची संगती घेतो जो त्याला हसवतो, उल्हसित ठेवतो. इतरांना हसवण्यासाठी नैसर्गिक संभाषण ठेवले कि अजून सोपे. संभाषण करीत असताना ते तुम्ही मनापासून एन्जॉय करा,त्यामुळे मित्र,परिवार, शत्रू नैसर्गिकरित्या आपल्याकडे आकर्षित होतील. मनाची सुंदरता कुणाला आवडत नाही? त्याला जोड व्यक्तिमत्वाची दिली तर ते अजून सुंदर होते, परिवाराला बांधून ठेवते, समाजाला सकारत्मक ठेवते.
जन्म सुंदर, जगणे सुंदर
या दुनियेत असणे हेही सुंदर
मंद मंद हसेल तोही मग
जेंव्हा आपले मनही असेल सुंदर.
श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९
Nice sir