आवड आणि उपयोग

UPSC परीक्षेमध्ये प्रतीक ठुबे (आय. पी. एस.) याने आपली आवड ‘जगणे’ अशी लिहीली होती. त्याचे म्हणणे होते की त्याला जगायला, जगण्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला आवडते. त्याने दिल्लीत जेव्हा मुलाखती दिल्या तेव्हा काहींनी त्याला वेड्यात काढले. आम्ही काय जगत नाही काय? त्यांनी उपहासाने विचारले. तुम्ही काय करता व कसे जगता हा तुमचा प्रश्न आहे, मला जगायला आवडते हे त्यावर प्रतीकचे सरळ उत्तर. अशा प्रकारचा जगावेगळा दावा करणे तसे धोक्याचे असते. परंतु मुलाखतीत प्रतीक आपले म्हणणे पटवून देऊ शकला हे महत्त्वाचे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला हेच विचारात असतो कि तुझी आवड काय व तू ती कशी वाढवतोस. कित्येकांना माहितीच नाही ती कुठली आहे व कसा वापर करायचा.

आपली आवड कशी शोधायची आणि परिपूर्ण जीवन कसे जगावे?

१. स्वतःला विचारा: असे काही आहे जे आपल्याला आधीपासून करण्यास आवडते?
२. आपण कशाबाबत / काय वाचत आहात – जी गोष्ट आपण नेहमी वाचतो कदाचित तोच टॉपिक तुमची आवड असू शकते. …
३. मंथन – बऱ्याचदा आपण आपल्याला माहित असलेल्या विषयावर चर्चा करतो, त्यातून काई मिळते का?
४. विचारा आणि अजून संभाव्य गोष्टी असू शकतात …
५. प्रथम प्रयत्न करा. …
६. शक्य तितके संशोधन करा. …
७. सराव, आणि सराव आणि आणखी काही सराव करा.

काहींना सही किंवा हस्ताक्षरावरून, देहबोलीवरून व्यक्तिमत्वाचा अभ्यास करायला आवडतो तर काहींना मातीपासून वस्तू बनवायला. असे एक ना अनेक आवडी आपल्याला विकसित करत असतात. आपल्या आवडीचे आपण वापर करताना होणारे उपयोग सौदाहरण पटवून देणे, सादरीकरण करणे महत्वाचे.

आपणास आवडते ते करण्यासाठी वेळ देणे, दिल्यास प्रचंड फायदे पुढे होतील:
१. आपला तणाव कमी करण्यास, इतर गोष्टी विचलित करत नाहीत. अभ्यासातही उपयुक्त.
२. मनःस्थिती सुधारण्यास. आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारू शकता. मनाला गुंतवून ठेवते.
३. आपले सामाजिक वर्तुळ विस्तृत होते. सकारात्मक सामाजिक संबंध आपल्याला सुखी आणि निरोगी बनवू शकतात. मजबूत सामाजिक संबंध असणारे लोक अगदी लवकर मृत्यूची शक्यता कमीतकमी 50% पर्यंत कमी करू शकतात .
४. आपल्याला असणाऱ्या दुःख व वेदना यांचे व्यवस्थापन करण्यात मदत होते.
५. विचारशक्ती वाढते, बुद्धी चा वापर कसा व कुठे करायचा याचे व्यवस्थापन चांगले होते.
६. आपल्या आयुष्य दर्जेदार बनू शकते. या आवडीचा वापर मुलाखती, चर्चा व दर्जेदार गोष्टी करण्यासाठी होतो.
७. अशक्य ते शक्य करून दाखवले जाते. रिस्क घ्यायला शिकतो.

या आवडीवरून तुम्हाला तुमच्या जगण्याचा मोह तयार होतो व तुम्ही ते जगता. हेच जगणे तुमचे जीवन सुसह्य करते व कुटुंब, समाज, राष्ट्र प्रगत होतं. मागील एका ब्लॉगवरून अनेकांनी आवडीबाबत प्रश्न विचारले होते कि आवडेल ते करायला घरचे करूच देत नाहीत. तुम्हाला तुमच्या मुलाची, घराची, समाजाची प्रगती होऊ द्यायची असेल तर नक्कीच मुलांच्या, सुनांच्या, जोडीदाराच्या आवडी नक्कीच जपा, काय सांगावं हिरा तुम्हाला तिथेच सापडेल.

©श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९
( हा ब्लॉग लेखकाच्या नावासह शेअर करायला हरकत नाही.)

1 thought on “आवड आणि उपयोग”

  1. अर्चना हेंद्रे

    आवड जपलीच पाहिजे, पण पुरुष जसे स्वतःची आवड जपतात, मुक्तपणे, तसे बायका करु शकत नाहीत ,हे वास्तव आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *