आपली वर्तणूक आणि आपण

आपली वैचारिक अपरिपक्वता कित्येकदा आपल्या वागण्यातून दिसून येते. घरात, ऑफिसमध्ये, कुठेही आपल्याला अशा व्यक्ती दिसतात ज्या त्यांच्या वर्तनातून काहीतरी वेगळेपण सिद्ध करतात. या वागणुकीचा सभोवतालच्या वातावरणावर परिणाम होत असतो. काल एक मित्र सांगत होता घर बदलायच आहे कारण मुलं घरात शिव्या द्यायला लागलेत. मग या ठिकाणी दोन वेगवेगळ्या गोष्टी परस्पर संबंध दाखवतात, समाज आपल्यात बदल करतो व आपण समाजात. आपले पंचेद्रिय लहानपापासूनच आपल्यात त्यांचा वापर करून बदल करत असतात. कुठल्या गोष्टी आपल्या वर्तनावर बदल घडवत असतात?

१. जेनेटिक- आपल्या आईवडिलांकडून वारसा आपल्यात येतो.
२. समाजातून- सामाजिक रूढी, बहुतेक वेळा एखाद्या गटाचे नियम केवळ आपल्या आचरणांनाच नव्हे तर आपल्या वृत्तीलाही आकार देतात.
३. सर्जनशीलता – (क्रियेटीव्हीटी) हा एक मानवीय गुणधर्म आहे. यातून आपले आचार बदलतो.
४. धर्म आणि अध्यात्म- जगभरातील बर्‍याच लोकांच्या जीवनात धर्म मोठी भूमिका बजावतो आणि त्याचा इतरांप्रती असलेल्या वागण्यावर त्याचा परिणाम होतो.
५. वृत्ती- एखादी वृत्ती ही एखाद्या व्यक्तीची, ठिकाण, वस्तूबद्दल किंवा घटनेबद्दल आपले विचार ठरवत असते.
६. हवामान- हवामानाचा मानवी वर्तनावर महत्त्वपूर्ण प्रभाव आहे. देशाचे सरासरी तापमान त्याच्या परंपरा आणि लोकांच्या दैनंदिन गोष्टींवर परिणाम करते.
७. COVID १९ प्रकारच्या नैसर्गिक संकट- अशा वेळी मनुष्याच्या जीवनात अनेक बदल दिसून येतात.covid १९ मूळे आपल्या वागण्यात बदल करावा लागला. तो कदाचित कायम स्वरूपाचा असेल.
८. जागतिकीकरण – जग आता एक होते आहे आणि वेग वेगळे लोक एकत्र येऊन काम करतात. त्यामुळे आपल्या वागण्यात बदल नाही केला तर व्यक्ती एकटी पडते.

अनेक परिवर्तनशील कारणे आहेत जे आपल्या वर्तनावर परिणाम करतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गरजेनुसार वागण्यात बदल करावे लागतात. जसे की

१. नेतृत्व – नेतृत्व करणारी व्यक्ती घरात, काम करण्याच्या खेळात, समाजात, पॉलिटिक्स, इत्यादी ठिकाणी आपल्यामध्ये शारीरिक व मानसिक बदल करत असतात.
२. कामगार वर्ग – लागणारे स्किल कशाप्रकारे वापरायचे, व त्यातून कंपनी चे फायदे यासाठी चांगले वर्तन अपेक्षित असते. त्यासाठी प्रत्येकाला चांगली वागणूक ठेवण्यास प्रोत्साहित केले जाते.
३. विद्यार्थी – अभ्यास करण्यासाठी मानसिकता तयार करणे व ती तशीच राहावी म्हणून त्यांच्या वागणुकीत बदल घडवावे लागतात.

असे अनेक बदल घडले तरच आयुष्य सुरळीत सुरू रहाते. त्याचे विश्लेषण वेळोवेळी करून सकारात्मकता टिकवता येईल.

आता सभोताली रोज नवीन पाहायला भेटते. भांडण, आदरातिथ्य, एकोपा, गमती जमती, खेळीमेळीच्या गप्पा यातून व्यक्तिरेखा दिसतात. कुणी मजा घेतो तर कुणी रडत बसतो, कुणी कुंपणावर बसतो तर कुणी भाग घेतो…या आपल्या ओळखी असतात. आपणच आपले मार्ग शोधायचे. आता मित्राचा मुलगा घरात बेजबाबदार वर्तन करतो म्हणून आपण किती घरं बदलणार? त्यासाठी मानसिकता, शिक्षण, आपण स्वतः प्रयत्न करून, समजाऊन सांगून, समुपदेशन घेऊन वर्तन बदल करू शकतो.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *