न बोलता अत्यंत पद्धतशीररित्या संवाद करता येतो याबाबत मित्रांबरोबर गप्पा चाललेल्या. खूप गमतीशीर उदाहरण म्हणजे डोळ्यांनी बोलणे….त्यातल्या त्यात नवीन लग्न झालेली किंवा प्रेमात पडलेल्या जोडप्यांची. चहा पिताना हे आम्ही सर्व मनातल्या मनात हसून एकमेकांच्या डोळ्यानी एकमेकांशी बोलत होतो. अर्थात अशा संवादाचा अनेक पिढ्यांपासून वापर केला जातो. काही हेतुपूर्वक तर काही नकळत. काही ठराविक पद्धती संशोधकांनी अभ्यासल्या आहेत.
१. चेहऱ्यावरील हावभाव-आनंद, दुःख, राग आणि भीती स्पष्ट दाखवता येते.
२. सूचक कृती- हात, पाय, डोके, बोटं, अंग हलवत केलेले इशारे खूप बोलून जातात.
३. भाषाविज्ञान- देहबोली, हावभाव, चेहर्याचे हावभाव, टोन आणि आवाजाचा आवाज ही सर्व भाषाविशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. न बोलता अपेक्षित संवाद होतो.
४. देहबोली आणि पद्धती- आपले व्यक्तिमत्व बोलते.
५. वैयक्तिक जागा-ठराविक जागेवर, व्यक्ती सर्वसामान्य व्यक्तीशी थोडे दूर राहून संवाद करते. हे अंतर अनोळखी व्यक्तीशी संवाद साधताना जास्त असते म्हणून त्या व्यक्ती बाबत खूप सांगुन जाते.
६. डोळ्यांचा संवाद – दुसर्या व्यक्तीकडे पाहणे शत्रुत्व, स्वारस्य आणि आकर्षण यासह अनेक भावना दाखवतात. सामान्यतः डोळे स्थिर असतील तर ती व्यक्ती विश्वासू असते आणि अस्थिर, विचलीत डोळे कित्येकदा खोटारडे व्यक्तिमत्त्व दाखवते.
७. स्पर्श- लहानपण ते म्हातारपण, स्पर्शाने मनुष्य खूप काही बोलतो flower. घोडेबाजार कधी पाहिला नसेल तर जरूर बघा!!! हातात हात देऊन फक्त स्पर्षावरून भाव ठरले जातात.
८. स्वरूप-कपड्यांचे रंग, निवड, केशरचना, एकूणच स्वरूप चांगले असेल तर न बोलता तुमचा संवाद होऊन जातो.
९. वस्तू आणि चित्र-ही साधने आहेत जी संवाद साधण्यासाठी वापरली जाऊ शकतात.
आपण इतरांना अर्थपूर्ण माहिती कशी पुरवितो हे सर्वस्वी आपल्या सवयी, भौगोलिक परिस्थिती, शिक्षण व्यवस्था, आणि सांस्कृतिक वारसा यावर अवलंबून असते. योग्य ठिकाणी, योग्य शारीरिक हालचाली न बोलता व्यवस्थित संवाद करतात आणि आपल्या जवळपास सर्रास दिसतात. त्यातून कित्येकदा भांडणे होतात किंवा सकारात्मक संदेश दिला जातो. मिलिटरी, दिव्यांग यासाठी स्पेशल संकेत मुद्दाम बनवले गेलेज्यामुळे संवाद शक्य झाला.
मानसशास्त्रीय भावनेतून या देहबोलीला अत्यंत महत्त्व आहे कारण यातून बऱ्याच गोष्टी तज्ञ समुपदेशकाला समोरच्या व्यक्ती बाबत सांगून जात असतात.
मजा आहे ना? मित्र, कुटुंबीय, सामाजिक बैठका, या समवेत तुम्ही असाल तर फक्त निरीक्षण करा…खूप काही समजून जाईल…
©श्रीकांत कुलांगे
9890420209