मी ब्लॉग लिहायला लागल्यापासून, ज्यांना मी माहित नाही त्यांनी विचारले कि सर तुम्हाला प्रेरणा कुठून भेटते. माझं सरळ आणि साधं उत्तर ऐकून, मग मनातूनच का? इतरांकडून का नाही? असे एक ना अनेक प्रश्न पुढे आले. माझा एक मित्र आहे प्रमोद जाधव, अलिबाग चा आणि त्याला सतत नवीन वनस्पती शोधायचा नाद आहे. तो माझे अनेकांपैकी एक प्रेरणा उगम आणि हे एकदा मनात बसले कि मनातून आपण विचार करायला लागतो कि माझ्यात काय आहे जे मी करू शकतो. प्रत्येकाचे मोटिवेशन वेगवेगळे असते, कामगार, विद्यार्थी, तरुण वर्ग, मध्यम वयीन वर्ग, ऑफिस, औद्योगिक इत्यादी.
तसे प्रेरणेचे दोन प्रकार सर्वसाधारण आहेत – आंतरिक आणि बाह्य. यामध्ये जास्त विचार करण्यापेक्षा आपल्या नेमके काय प्रेरित करते हे पहाणे महत्वाचे आहे. मानसशात्रीय अभ्यासानुसार तीन गोष्टी प्रवृत्त करतात:
१. कित्येकदा प्रेरणा स्वतः होऊन नाही होत पण काही वाचनातून, फोटो पाहून, पुस्तकातून, कवितेतून, व्यक्तींपासून, विचारातुन मिळते.
२. जेव्हा कोणी प्रेरणा घेऊन पुढे जातो, तेव्हा त्यांना नवीन शक्यतांची पुढे जाणीव होते.
३. एकदा प्रेरित झाल्यावर ते नवीन व्हिजन, स्वप्न यावर कार्य करण्यास प्रवृत्त होतात. यालाच आपण प्रेरणा (मोटिवेशन) म्हणतो.
प्रेरणा मिळण्याची स्रोत एकूण चार आहेत.
१. गरज भासणे – शरीराच्या आवश्यकता तणाव निर्माण करतात . तहान ,भूक ,काम क्रोध,मलमूत्र. या शारीरिक आणि स्वाभाविक अभिप्रेरणा.
२. स्वतः प्रयत्न करणे ,
३. प्रोत्साहन व
४. ध्येय – विशिष्ट उद्दिष्ट ठरवून मार्गस्थ होणे.
एखाद्या मुलामध्ये सद्यस्थितित कोणताही गुण अथवा आंतरिक प्रेरणा दिसत नसल्यास काही गोष्टी करावयास हव्यात ..
१. बाह्य प्रेरणा म्हणजेच प्रोत्साहन, बक्षिसे, प्रशंसा करावी .
२. मोकळ्या ,निसर्गरम्य वातावरणात पाल्यास ठेवून मूल कोणत्या गोष्टीकडे आकर्षित होते ते निरीक्षण करणे .
३. कुठले छंद मुलामध्ये दिसून येतात, त्यांना काय करायला आवडते, यांचे निरीक्षण करणे व लिहून ठेवणे.
प्रेरणेचे फायदे भरपूर आहेत – जसे कि
१. आत्मसमाधान. २. मेंदूला चालना ३. आयुष्यात काहीतरी करण्याची व ठरवलेय ते प्राप्त करण्याची वृत्ती तयार होणे, ४. नाविन्याची आवड. ५. वेळेवर काम संपवण्याची सवय. अशा खूप काही…
आंतरिक प्रेरणा (स्वाभाविक) ही जन्मजात असते तर काहींना बाह्य प्रेरणेची (कृत्रिम) चावी दिल्यानंतर यशाच्या वाटेवर सुसाट पळू लागतात.
प्रत्येक सजीवात एखादा बुद्धीचा घटक म्हणजेच एखादी कला ,कौशल्य असतेच… फक्त त्याला ओळखण्याची गरज आहे . एकदा का हे कलागुण ओळखले गेले मग बाह्य प्रेरणेची गरज भासत नाही.
@श्रीकांत कुलांगे
9890420209