मित्र व त्याच्या बायकोचे भांडण होऊन दीड वर्ष झाले तरी मनाने अथवा शरीराने एकत्र आले नव्हते. लग्नानंतर झालेल्या अनेक कारणांवरून आलेले वितुष्ट संपत नव्हते. अनेक मानसशास्त्रीय चाचण्या घेऊनसुद्धा मुळ कारण शोधण्यात अडचण येत होती. शेवटी एकच पर्याय, म्हणजेच क्षमा. क्षमा करणे आणि भूतकाळातील त्रास टाळणे हे वैवाहिक जीवनातील एक महत्त्वपूर्ण साधन आहे. याव्यतिरिक्त, क्षमा केल्याने किंवा मागितल्याने आपण भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वत: ला निरोगी ठेवण्याचा एक मार्ग आहे असे. याबाबत चर्चा करणे अत्यंत गरजेचे वाटते. सर्वात प्रथम परिवारात असं का घडत की आपण टोकाची पावलं उचलतो?
१. एकमेकांचा आदर न करणे. कुटुंब व्यवस्था ही नैसर्गिक क्रिया आहे. आदर हा पाया. हाच पाया भक्कम असेल तर संसार रुपी मंदिर दीर्घ काळ टिकते.
२. मानसिक असंतुलन. कामाचा ताण,
३. आपल्या विवाहपूर्व सवयी,
४. शिक्षण घेताना झालेल्या चुका,
५. आई वडिलांचा लाड, लुडबुड अथवा परिस्थिती,
६. Adjustment ची कमी, माघार घेण्यास नकार.
७. मोबाईल फोनचा अती वापर.
८. संसारात जोडीदाराशिवाय इतरांना अती महत्त्व.
९. विजोड – काही दिवसात लग्नानंतर विचारांच्या पातळ्या न जुळणे.
स्वभावाला औषध नसते परंतु सद्सद्विवेक बुध्दीचा वापर आवश्यक असतो. जाणते, अजाणतेपणे केलेल्या चुका आणि क्षमापणा यांची गल्लत तरुण वयात होते. म्हणून शिक्षण महत्वाचे. त्याचा वापर करून एकमेकांना माफ केले तर होणारी हानी टाळता येईल. जसे की,
१. आरोग्याचे फायदे. क्षमा मागितल्याने किंवा केल्याने हृदयविकाराचा झटका, कोलेस्टेरॉलची पातळी कमी, झोप सुधारणे, वेदना कमी होणे, रक्तदाब कमी होणे. चिंता, नैराश्य आणि तणाव यांचे प्रमाण कमी होते.
२. नातेसंबंध सुधार व मनःशांती.
३. वैचारिक आणि आर्थिक अडचणींवर मात.
४. मुलांवर होणारा परिणाम.
५. व्यसनाधीनता.
क्षमा मागितल्याने किंवा केल्याने अहं मध्ये आला तर मात्र कठीण. त्यासाठी परस्पर व्यक्तीमध्ये विश्वासाचे नाते तयार होणे महत्वाचे. माफी कशी मागायची किंवा त्यासाठी मानसिक भावना कशी असावी? या गोष्टी दोन्ही जोडीदारांना करणे अपेक्षित.
१. मनापासून वेदनांची तीव्रता जाणून घेऊन अहं विसरून पुढे चालण्याची तयारी.
२. मोठे मन एकाने दाखवले तर दुसऱ्याने त्याला कमकुवतपणा न समजले तर विश्वास पुन्हा एकदा निर्माण होतो.
३. चुकांपासून शिकून आवश्यक बदल दोघात करणे अपेक्षित.
४. समुपदेशन स्थिती सामान्य ठेवण्यास मदत करते म्हणून मानसशा्त्रज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी जरूर करा.
५. नित्य व्यायाम व नको त्या व्यक्ती व अनावश्यक फोन वापर यापासून दूर राहिल्यास पुन्हा चुका होणार नाहीत.
६. विश्वास टिकवणे प्रथम कर्तव्य हे प्रत्येक पालकाने मुलांना सांगणे अतिशय महत्वाचे.
७. संसारात होणारा इतरांचा सुळसुळाट कमी होणे आवश्यक. ते आपल्याला मदत करतात म्हणून किती ऐकायचे याची रेषा आखणे जरुरी.
कित्येकदा एवढे करून सुध्दा लग्न टिकत नाहीत व पुन्हा भांडण सुरू राहिले तर मात्र संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येतो. मानसिक आजार व सभोवतालची परिस्थिती कारणीभूत असली तरी शेवटी समाजात होणारी मानहानी ही डोकेदुखी ठरते. घटस्फोट घेतला तरी त्यानंतर होणारी कुचंबना किंवा मनःशांती याला सकारात्मतेने तोंड देणे जमायला हवे.
©श्रीकांत कुलांगे
9890420209