मुलांची घुसमट

मी आईवर का इतका चीड चीड करतो म्हणून समीर विचारत होता. त्याचे त्यालाच कळत नव्हते की काय कारण असावं. अर्थात मागील आठवड्यात असे अनेक विद्यार्थी याच संबंधी चर्चा करत होते. त्यातल्या त्यात सणावाराला आईने काम सांगितले की चीड आलीच. 

जगभरातील काही मुलांचा आपल्या पालकांविषयी इतका राग का असावा याचा अभ्यास केला गेला व काही तथ्य समोर आले.

१. पालकांचं आपापसातील मतभेद, भांडणं.

२. पालकांनी मुलांशी संवाद न ठेवणं, त्यांना वेळ ना देणं.

३. शारीरिक व मानसिक आरोग्य खराब असणं.

४. मुलांचा बचाव करण्यास पालकांचे असमर्थन.

५. पालकांच्या मुलांकडून असणाऱ्या अवास्तव अपेक्षा.

६. भावनिकदृष्ट्या संवेदनशील मुलांना लहानपणापासून समस्या म्हणून पहाणे.

७. पालक सतत मुलावर टीका करत असतात.

८. मुलांचा अयोग्य आहार, विचार, संगोपन.

९. जनरेशन गॅप.

 

जेंव्हा अशी मुलं वाढत जातात तशी त्यांच्यात एक वेगळी भावना निर्माण होते. त्याचे परिणाम विनाशकारी असू शकतात. कळत नकळत काही गोष्टी त्यांच्या कडून होतात. आणि म्हणून या रागाला आवर घालणं महत्वाचं आहे. काय करावं माहीत असूनही मुलं या गोष्टी करत नाही. कारण,

१. अपरिपक्व भावना व विचार.

२. माहितीचा अभाव.

३. अयोग्य गुरु व मित्र मंडळी.

४. सातत्त्याची कमी. मुडी स्वभाव.

५. आत्मविश्वास नसणे.

६. संवाद कुठून व कसा सुरू करायचा याचा ताळमेळ न बसणे.

७. आई वडिलांच्या भावना समजून न घेणं, किंबहुना समजून घेण्याची वृत्ती न बनणे.

८. नाविन्याचा व स्वतःची ओळख निर्माण करण्याचा ध्यास धरणे. प्रसंगी आई वडिलांचा धाक न जुमानने.

९. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात न घेणं.

१०. सोशल मीडियाचा अतिवापर व प्रभाव.

 

प्रत्येकाचं नातं आणि व्यक्तित्व भिन्न आहे आणि विचारांची जडणघडण आपल्यावर सभोवतालच्या वातावरणातून होत असते. तरीही यातून बाहेर पडायचे झाले तर आई वडील आणि मुलांनी रस्ता शोधणं सोपं होऊ शकतं.

 

१. आपल्यावर असणाऱ्या जुन्या आठवणींना तिलांजली देणे.

२. आईवडिलांनी मुलांना दोष देणं बंद करावं.

३. त्यांची तुलना करणे सोडा.

४. मुलांना समजून सांगा की तुमच्या विचारांचं महत्त्व काय आहे.

५. पालकांनी आपली भाषा, शब्दांची निवड योग्य ठेवणं आवश्यक.

६. मुलं कितेकदा बाहेरच्या तणावाखाली असतात आणि ते नीट व्यवस्थापन नाही करू शकत म्हणून त्यांना मानसिक आधार देऊन बोलकं कारण गरजेचं आहे.

७. प्रसंगी समुपदेशन घ्या.

८. आपले स्वतःचे मानसिक व शारीरिक आजार चेक करा. जर काही व्याधी असतील तर त्याचे होणारे परिणाम मुलांना समजाऊन सांगा.

९. मुलांनी सुद्धा आपल्या कृतीतून दाखवून दिले पाहिजे की मी घरचा सदस्य आहे व माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या कुटुंबाचे नियम म्हणून पाळलेच पाहिजेत.

१०. नेमकी काय व्यथा आहे याबाबत चर्चा सकारात्मकने व्हावी.

११. मुलांचे मित्र मैत्रीण वाईट आहेत हा पूर्वग्रह नको.

१२. मुलांनी व पालकांनी आपल्याला राग नक्की कशाचा हे ओळखणे गरजेचे.

 

वय जसजसे वाढते तशी मुले बदलताना आढळतात. मानसिक कुचंबणा कुठेही वेळेवर थांबवणं आवश्यक असते. पालक काळजी करतात परंतु ती अती नसावी अन्यथा मुलं धाडसी कशी बनणार हा ही विचार करावा. त्यांनाही त्यांचे विचार व्यक्त करण्याची गरज असते म्हणून ऐकून घेतल्यास व करू दिल्यास एखादा शास्त्रज्ञ घरात तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *