अजूनही covid मुळे झालेल्या एकंदर परिस्थिती आणि तदनंतर झालेला आघात यामुळे झोपेचे नियोजन कोलमडल्याने मानसिक स्वास्थ्य डळमळीत झाल्याचं नुकत्याच घेतलेल्या सर्व्हेतून समोर आले. अर्थात झोप आणि मानसिक आरोग्य एकमेकांशी जवळून जोडलेले आहे. याबाबत अनेक गोष्टींवर चर्चा झालेली आहे व होते ज्यामध्ये होणारे परिणाम सांगण्यात आले.
१. झोपेची हानी आपल्या मानसिक स्थिती आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करते.
२. मानसिक आरोग्याच्या समस्या असलेल्यांना निद्रानाश किंवा झोपेच्या इतर विकारांची शक्यता जास्त असते.
३. कमकुवत किंवा अपुरी झोप यामुळे चिडचिडेपणा आणि तणाव उद्भवू शकतो, तर निरोगी झोपही कल्याण वाढवते.
४. खराब झोप आणि उदासीनता किंवा चिंताग्रस्त भावना यातून होणारा त्रास.
५. वरील कारणांमुळं स्वतःची उपयुक्तता कमी होणे. ठरलेली कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.
६. जर निद्रानाश कायमचा होत असेल तर त्याचे परिणाम सुध्दा तितकेच सर्वांगीण काळजी करण्यासारखे असतात.
७. शारीरिक आजार जसे की मधुमेह, हृदयविकार, डोकेदुखी इत्यादी.
निद्रानाश ही जगभरात एक सामान्य समस्या आहे. अंदाजानुसार जगातील ३०% लोकसंख्या यामुळे त्रासलेली आहे. COVID जरी आताच प्रॉब्लेम असला तरी निद्रानाश कायमचा आजूबाजूला असतो. त्याला जागे करण्यासाठी कारणे नेहमीचीच आहेत.
१. चिंता
२. उदासीनता
३. औदासिन्य
४. बायपोलार समस्या
यामधून होणारा परिणाम मानसिक स्वास्थ्य बिघडून टाकते. म्हणून झोपेच्या समस्येला मानसिक आरोग्य जरी कारणीभूत असलं तरी इतर भौतिक सुविधा सुध्दा काही प्रमाणात सहभाग देतात.
१. वेळीअवेळी आहार घेणं.
२. इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि अतिवापर.
३. कौटुंबिक सुखाची कमी.
४. अतिप्रमाणात आणि चुकीच्या वेळी केलेले मद्यसेवन, चहापान.
५. अनावश्यक जागरण आणि नंतरची सवय.
६. झोपेचं महत्त्व न समजणं.
७. रात्री जास्त अभ्यास होतो अशा ग्रहातून पूर्ण झोप न घेणं.
८. ध्वनी व वायू प्रदुषण.
अशा अनेक कारणांनी आपल्या एकंदर क्वालिटी झोप न होण्या पाठीमागे प्रारंभिक सुरुवात होते व तीच नंतर सवय व स्वभाव बनतो. त्याचे परिणाम लगेच दिसून येत नाही.
मानसिक आरोग्य तपासणी शिबिर हे कायम घेतले जावेत ही माझी नेहमीची इच्छा असते आणि वर्षातून त्याचे आयोजन साधारण ५ महिने तरी नक्कीच होते. त्यामधून सर्वसामान्य मानसिक समस्या निकाली निघतात. म्हणून सर्वांनी सहकार्य केल्यास त्यांच्या स्वभावातील मधील प्रमुख कारणं समजतील व त्यामुळे मानसिक आजार दूर ठेवण्यास मदत होईल. आम्ही कसं निदान करतो?
१. अहंकार किती.
२. अलिप्तता.
३. भावनिक अस्थिरता.
४. अभिव्यक्ती. भावना व्यक्त करण्याचा स्वभाव.
५. सामाजिक दुरावा.
वरील गोष्टी आपल्या मानसिक आरोग्याचे निदान करण्यास व सुधारणा करण्यासाठी उपयोगी ठरतात. मानसिक आजार, त्यामुळे होणारा मनःस्ताप, तिथून सुरुवात होणारा निद्रानाश अशी साखळी लांबलचक होत जाते. ती कुठे तरी ब्रेक करणं गरजेचे आहे. त्यासाठी जवळील मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. शेवटी कितीही पैसा असला तरी मानसिक श्रीमंती अतिशय महत्वाची आहे.
या मानसिक चाचण्या मी स्वतः ऑनलाईन घेत असतो आणि त्या कित्येकदा सामाजिक कार्यासाठी वापरल्या जातात. समाज सुखी तर आपण खुश, आपण खुश तर भारत समृध्द.
ज्यांना कुणाला अशा टेस्ट आणि समुपदेशन मुफ्त घ्यायचे असेल त्यांनी नक्की संवाद साधा.
©श्रीकांत कुलांगे
9890420209