सवय आणि मानसिकता

वाईट सवयी कदाचित आपल्या जीवनातून आनंद शोषून घेत असतील तर ते काय जगणं? त्यातून काय मार्ग काढावा यासाठी चर्चासत्र घेतलं गेलं. वाईट सवयी जीवनाचा एक अविभाज्य गट आहे का, यावर सुध्दा चर्चा केली. या वाईट सवयींचा आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. किंबहुना दोन्ही गोष्टी हातात हात घेऊन चालणाऱ्या आहेत. आम्ही सर्वांनी अशा कुठल्या वाईट सवयी आहेत ज्या कदाचित आपल्या मानसिक आरोग्यास धोकादायक ठरू शकतात यावर उहापोह केला:

१. परिपूर्णता, जर ती काही ठराविक सीमेपर्यंत असेल तर सकारात्मक, पण परफेक्ट असायलाच हवं आणि ते सुध्दा आवाक्याबाहेर, तर मात्र त्रासदायक.
२. खराब बसण्या, चालण्याच्या पद्धती. चांगली मुद्रा सकारात्मक मनोवृत्ती वाढवते, थकवा कमी करते. आपल्या चालण्या, उठण्या, बसण्याच्या रिती समजून घेतल्या तर उपाय करणं शक्य.
३. अपराधीपणा. अपराधीपणाचे समाजात मर्यादित स्थान आहे – एखाद्या चुकीबद्दल केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केल्यामुळे एखाद्या व्यक्तीस तो पुन्हा अपराध करण्यास प्रतिबंध करते.
४. व्यायामाचा अभाव. COVID सुरू झाला आणि व्यायाम करायला सुरुवात झाली खरी, परंतु कितीजण त्याला आपली सवय बनऊ शकले हा संशोधनाचा विषय.
५. अयशस्वी मानसिकता. मोठ्या प्रमाणात घडणारे प्रसंग असतील तर ते मानसिक आरोग्याला हानिकारक. त्यात नकारात्मक मानसिकता तेल ओतण्याचे काम करते.
६. सोशल मीडियाचा अतिवापर.
७. स्मार्टफोनचा जास्त वापर. स्मार्टफोनचा सक्तीने किंवा जास्त वापर केल्याने नैराश्य, चिंता, तीव्र ताणतणाव आणि / किंवा कमी आत्म-सन्मान याची लक्षणे बिघडू शकतात.
८. दुःखी राहणं. दु: ख करण्याची सवय नैराश्य, चिंता, झोपेच्या समस्या आणि एकाग्र होण्यास अडचण निर्माण करते.
९. दुसऱ्यांवर अवलंबून राहणे. अपेक्षांचे ओझे पेलवत नाही.
१०. खराब झोप.

वरील सवयी निश्चित आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. म्हणून काय करावं?

१. नियमितपणे सवयी चेक करणं.
२. सवयी घातक असतील तर त्याचे दुष्परिणाम दिसतात. त्या बदलण्यासाठी समुपदेशन.
३. मित्र संगती आपल्या सवयी बदलत आहेत का? वाईट सवयी पेक्षा मित्र बदलणे योग्य.
४. सवय संपवता येत नाही पण बदलता येते. त्यासाठी मनापासून इच्छा हवी.
५. चांगला गुरु नक्कीच सापडेल. शोधा.
६. अहंकाराला तिलांजली.
७. नम्रता असेल तर सकारात्मक विचार निर्माण होतो.

जेव्हा मानसिक आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा या सवयी आणि विचारांचे नमुने आपले सर्वात वाईट शत्रू असू शकतात. वाईट सवयी मोडीत काढणे खूप काम आणि वेळ घेते परंतु सराव आणि दृढनिश्चयाने आपण नवीन सवयी शिकू शकता ज्यामुळे आपले मानसिक आरोग्य सुधारेल.

असे चर्चासत्र वारंवार घेतले गेले पाहिजेत. यामुळे सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत मिळते. परंतु प्रश्न हा आहे की अशा चर्चेत बऱ्याचदा नकारात्मक मानसिकता असणारे सहभाग घेत नाहीत. आणि हाच एक कळीचा मुद्दा आहे.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *