गेट टुगेदर

शालेय विद्यार्थी पुढे मोठे होऊन, पुन्हा एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देतात तो इव्हेंट म्हणजे गेट टुगेदर. प्रत्येक गेट टुगेदरच्या संकल्पना वेगवेगळ्या. भरपूर जण या इव्हेंट ची वाट पाहतात तर काहींना याच्याशी दूरदूर संबंध नसतो. आयुष्याला कंटाळलेले, रोजच्या विवंचनेतून वाट काढता काढता नाके नऊ आलेले सह मित्र त्यांच्या अडीअडचणी मुळे येऊ शकत नसल्याचे काहींना शल्य तर काहींना नो सोयरसुतक.
अनेक दृष्टिकोनातून गेट टुगेदर कसं फायद्याचे हे सोशल मीडिया वर चांगलेच माहीत झालेले किंवा अनुभवलेले. तरीही काही बाल मित्रांना यामध्ये सामील व्हावेसे का वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. जेंव्हा मी अशा अनेक मित्रांशी चर्चा केली तेंव्हा काही विसंगत सत्य समोर आले. जसे की,

१. पैशाचा आणि वेळेचा अपव्यय.
२. इगो आडवा येणे.
३. लग्नकार्य किंवा नियोजित कार्यक्रम. मुलांच्या परीक्षा, office चे काम.
४. पैशाचा अभाव.
५. फक्त दारू प्यायला आणि धांगडधिंगा घालण्यासाठी का जावं.
६. आताच तर आपण सर्व कुठल्यातरी कार्यक्रमात भेटलो होतो. परत भेटण्यात काय मजा.
७. सोशल मीडिया वरून राग.
८. बायकोची, नवऱ्याची, आईवडिलांची परवानगी न मिळणे.
९. Priority नसणे. दुसऱ्या गोष्टीला प्राधान्य.
१०. मुद्दाम अडून बसणे कारण कुणाची तरी जिरवयची असते. बघतो मी नसल्यावर कार्यक्रम कसा होतो ते, अशी विचारसरणी.
११. प्रवासाची दिक्कत.
१२. मागील कार्यक्रमात झालेला मानापमान.
१३. Basic सुविंधा नसणे.
१४. वयोमानानुसार तकलीफ. दुखणे, कौटुंबिक कलह.

एक ना अनेक उत्तरे खुप जणांकडून मिळाली. जवळपास सर्व शाळा, कॉलेजच्या गेट टुगेदरची हीच तऱ्हा. बरं यजमान मंडळी सगळं सोडून हा इव्हेंट कसा सक्सेसफुल होईल याची काळजी करतात. तर काही कुंपणावरून मजा बघताना आढळतात. परंतु काही मंडळींना मात्र या सर्व गोष्टी सकारात्मक वाटतात. त्यांच्या मते;

१. आम्ही एकमेकांच्या कल्पनांना खतपाणी घालतो. चर्चा करतो.
२. आम्ही एकमेकांना नवीन गोष्टी शिकवतो.
३. आम्ही संघर्ष करत असताना एकमेकांना हसवतो. हीच वेळ असते sharing ची.
४. वयोमानानुसार जुन्या मित्रांना समक्ष भेटण्याची संधी सोन्यासारखी वाटते.
५. बिझनेस वाढ होण्यासाठी वातावरण निर्मिती.
६. एकमेकांना मदत मागू शकतो.
७. आम्हाला इतर लोकांच्या यशाचा हेवा वाटत नाही आणि एकमेकांच्या कर्तृत्वाचा सक्रियपणे उत्सव साजरा करतो.
८. आम्ही प्रामाणिक, रचनात्मक टीका करतो.ज्यानेकरून मित्राचे भले व्हावे.
९. मैत्रीचा सार्थ अभिमान दाखवण्याची संधी.
१०. आम्ही एकमेकांचे आवाज ऐकतो. नाचतो, गातो.
११. एकमेकांची मदत कशी करता येईल, सोयरिक जमवण्याची बोलणी.
१२. मदतीची देवाण घेवाण.
१३. धंद्याच्या नवीन संकल्पना आणि त्याबाबत शंका निरसन.
१४. विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी मित्रांची मदत घेणे.
१५. आपण एकमेकांसाठी आहोत त्याची उजळणी होते. नवीन ताकद घेऊन भरारी करण्याची वृत्ती तया होते.

बापरे! किती काय मिळते गेट टुगेदर मधून. मित्रांनो, नका त्या नकारात्मक विचारसरणीच्या जाळ्यात अडकू. मला कुणाची गरज नाही हे जरी मान्य असले तरी इतरांना तुमची गरज असते हे विसरू नका. नाते कुठलेही असो ते वृध्दींगत करून, सर्वांना बरोबर घेऊन चालणे यालाच भावनिक बुद्धिमत्तेचा वापर म्हणतात ना. जर हे स्किल तुमच्यामध्ये नसेल तर मित्रा तुझ्या पैशाचा, अहंचा, वैभवाचा वापर ठराविक काळापर्यंत गोड लागेल व नंतर निर्भेळ मैत्रीसाठी मात्र पोरके झालेलं असाल.
सुदामा आणि कृष्ण आपल्यातच आहेत हे ध्यानात ठेवले तर गेट टुगेदर तुम्ही वर्षातून अनगणीत वेळा एन्जॉय करू शकता.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *