अनिल रोजच्या नवनवीन प्रश्नांना तोंड देता देता नाकीनऊ आला होता. एक संपला की दुसरा प्रश्न रोज समोर, म्हणून समुपदेशन घेण्यासाठी येऊन गेला.
आपले आजचे अस्थित्व हे रोजच्या व्यवहारात चालू असलेल्या घडामोडींवर आधारित असते. आपण कितीही ठरवले तरी काहीना काही अडचणी येत असतात ज्या आपल्याला सुखाने जगू देत नाहीत. काही गोष्टी ज्या आपण बाजूला नाही करू शकत…
१. चिंता.
२. औदासिन्य.
३. भारावून गेल्यासारखे वाटणे.
४. मित्र आणि प्रियजनांकडून दूर होणे.
५. प्रेरणा आणि उर्जा यांचा अभाव
६. एकटेपणा
७. व्याकुळ चिंता.
जीवनातील काही प्रमुख घटनांनंतर बहुतेक वेळेस वरील संकट उद्भवत असतात, जसे कीः
१. करिअर किंवा नोकरी बदल.
२. एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू.
३. गंभीर किंवा जीवघेणा आजाराचे निदान.
४. 40, 50 किंवा 65 यासारख्या महत्त्वपूर्ण वयोगटात प्रवेश करणे.
५. एक दुःखद किंवा क्लेशकारक अनुभव अनुभवणे.
६. मुलं व त्यांचे प्रश्न.
७. लग्न किंवा घटस्फोट.
ज्या व्यक्तींना जर आधीपासून काही मानसिक व्याधी असतील जशा की डिप्रेशन, चिंतारोग, बॉर्डरलाइन व्यक्तिमत्व डिसऑर्डर, किंवा जुने विकार, यांना वरील संकटाची जाणिव जास्त होते.
आज अस्तित्वात असलेल्या अशा काही गोष्टी सकारात्मक तर काही नकारात्मक असतात. जे काही आपल्या हातात आहे ते आपण अप्रिय गोष्टींना दूर करण्यासाठी करू शकतो.
१. आलेला प्रॉब्लेम लिहून ठेवणे व त्यासाठी काय कारण असावे, काय उपाय करावेत यासंबंधी विचार विनिमय.
२. मार्गदर्शन, समुपदेशन प्रभावी माध्यम.
३. मेडीटेशन अतिशय जागरूक उपाय. दिवसातून किमान काही वेळा शांत राहून मेंदूला आलेला थकवा दूर करता येतो. ज्यानेकरुन चांगले विचार प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी उपयुक्त ठरतात.
४. रोजच्या अस्तित्वात असलेल्या प्रश्नांना तान म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून गोंडस नाव दिलं तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
५. जर प्रश्न अधिक गहन असतील तर तज्ज्ञांना भेटून औषधोपचार घेतल्यास वेळेत थांबवता येतील.
६. सर्वात महत्त्वाचे, शारीरिक संपत्ती. ती जपली की मानसिक स्वास्थ्य नीट ठेवायला तयार असतो.
अस्तित्वातील चिंतेचा सामना करण्यासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नसले तरी आपल्या मजबुत मानसिक स्वास्थ्य आणि सुदृढता यांच्या जोरावर निभावून नेता येते. अस्तित्वातील चिंता या ढगाप्रमाणे असतात, येत आणि जात राहणार. म्हणून चिंता करण्या ऐवजी त्यांना निकराने तोंड देत मुकाबला करायचा व जीवनातील बारीक, नाजूक आनंद शोधून कस्तुरी सारखा जपायचा. लक्षात ठेवा प्रमाणापेक्षा जास्त आनंद सुद्धा चिंतेचा विषय असू शकतो…
©श्रीकांत कुलांगे
9890420209