जेव्हापासून हे लॉकडाऊन सुरू झालंय तेव्हापासून विजय आपलं आयुष्य जगण्यासाठी काहीतरी धडपड करताना दिसत होता पण सुर सापडत नव्हता. काय करावं आणि काय करू नये हा पेच त्याच्या डोक्यात. सर्वात मोठा परिणाम आपल्या मानसिकतेत होतोय म्हणून व्यायाम किंवा शारीरिक हालचाली महत्वाच्या हे मी त्याला सांगितले. शारीरिक व्यायामामुळे मानसिक आरोग्य संतुलित राहते आणि विचार प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. म्हणून लॉक डाऊन काळात इतर गोष्टींबरोरच व्यायाम केल्यास फायदे होतील.
१. शारीरिक हालचाली मानसिक आरोग्याच्या समस्या सुरू होण्या पूर्वीच त्यांना दूर ठेवण्यासाठी मदत करते
२. व्यायाम आपला थकवा, तणाव, राग आणि शारीरिक कमजोरी यासारख्या नैराश्याचे लक्षणं कमी करतात. ताणतणाव दूर ठेवते.
३. भीती, चिंता, पॅनिक डिसऑर्डर अशा अनेक गोष्टींमुळे त्रस्त असलेल्या व्यक्ती व्यायामामुळे सुधारलेल्या दिसतात.
४. निर्णय क्षमता सुधारते. नकारात्मक भावना दूर ठेवते. आत्मविश्वास वाढतो. समाजात मान राखला जातो.
५. मन शांत होते. चांगले मित्र जवळ येतात. सकारात्मक वलय आपोआप तयार होते.
६. मेंदूला हवे असणारे प्रोटिन्सची निर्मिती होते. मेंदूत इंडॉर्फिन नावाची चांगली रसायने सोडतो जी आपल्याला चांगलं वाटण्यासाठी कारणीभूत असतात.
७. भावनिक स्थिरता, मनापासून आपण स्वतःला आवडायला लागतो.
मग कुठले व्यायाम करावेत त्याबाबत जास्त बोलण्याची गरज नाही. ठराविक पण नित्य नियमाने केलेल्या कुठल्याही खालील प्रकारच्या व्यायामाचा फायदा होतो.
१. योगामुळे नैराश्य, चिंता, रक्तदाब कमी होतो, श्वसन सुधारते. Covid-19 ला मात देण्याकरता हा पहिला पर्याय अत्यंत चांगला आहे.
२. धावणे, सूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या, मोकळ्या मैदानावर केलेल्या कसरती, चालणे डिप्रेशन कमी करते.
३. हसणे हा सुद्धा व्यायामाचा प्रकार आहे, त्यामुळे शारीरिक वेदना कमी होतात.
४. पोहणे, एरोबिक्स, डान्स, झुंबा अशा अनेक प्रकारचे व्यायाम मेंदूला चालना देतात.
५. रोजचे वेळापत्रक तयार करून मनापासून प्रयत्न हवेत.
६. आपल्या वयोमानानुसार कुठलेही व्यायाम निवडून ध्येय ठेवणे महत्वाचे.
घरात राहून करता येणारे व्यायाम आपले पैसे वाचवते. म्हणून जिमची वाट न पाहता लॉक डाऊन मध्ये पैसे जर मिळत नसतील तर कमीतकमी शरीर संपदा कमावण्यासाठी प्रयत्न करायला हरकत नसावी. फक्त गोळ्या खाऊन व्याधींवर उपचार केले जाऊ शकत नाही, त्याचजोडीला जर मजबुत मानसिकता आणि शरीर प्रकृती असेल तर अतिउत्तम. तर चला मग घ्या एक निर्णय व आजच सुरुवात करुया व्यायामाला..मी १०० पुशअप्स रोज करतोय आणि हळूहळू वाढवत जाणार….
@श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९
Short but very useful Post… great,