नात्यात शंका

 

लग्नानंतर आपण काय बोलतो आणि करतो यावर पुढील आयुष्य अवलंबून असते. सोहम नेहमी आपल्या बायकोला काहीतरी सांगत असतो ज्याला काही तथ्य नसते तरीही शुभाला शंका येण्यास हे कारण पुरेसं असतं. म्हणून शुभाचा समुपदेशन साठी फोन होता. शंका घेणे गरजेचे नाही आणि असे प्रकार घडू नयेत म्हणून काळजी दोघांनी घेणे आवश्यक आहे. फक्त शुभा ला नाहीतर सोहम ला सुध्दा समुपदेशनाची गरज आहे असे सांगून दोघांना भेटायला सांगितले.
शंकेचा उगम शोधणे आवश्यक असते. आपण ज्यावर प्रेम करतो त्यावर आपण शंका का घेतो?

१. चुकीची बोलण्याची पद्धत. अर्थ बदलतो.
२. विश्वासाची कमी. एकमेकांवर कुरघोडी.
३. एखाद्या गोष्टीची पुन्हा पुन्हा उजळणी शंकेला आमंत्रित करते.
४. जोडीदाराचा किंवा त्यांच्या विचारांचा आदर न ठेवणे.
५. अतीप्रेम. मत्सर.
६. विनाकारण कामावरून उशिरा घरी येणं, फोन न घेणे.
७. फोनवर जास्त वेळ बोलणे किंवा त्याचा अतीवापर.
८. जोडीदाराची खोटे बोलण्याची वृत्ती.
९. मानसिक आजार.

अर्थात सर्व माहिती असूनसुद्धा जोडपी यात अडकतात आणि शांती भंग करतात. जर या गोष्टी हेतुपूर्वक असतील तर तसे बोलून मोकळे झालेले चांगले. काही जोडीदार काडीमोड करण्यासाठी अशा गोष्टींचा विचार करताना आढळतात. जर असे नसेल तर मात्र काहीतरी करता येईल.

१. आपली भीती सांगा. जे काय घडतंय त्याबाबत मन मोकळे करून भीती स्पष्ट सांगितली तर कदाचित शंकेला वाव राहणार नाही.
२. आपल्या जोडीदारास समर्थन आणि आश्वासनासाठी विचारा.
३. उपाय शोधण्यासाठी  एकत्र येऊन काम केल्यास योग्य.
४. संबंध आणि जिव्हाळ्यासाठी अधिक वेळ घालविण्यामुळे या शंका दूर होण्यास मदत होते.
५. एकमेकांना समजून घेऊन अप्रिय गोष्टींची उजळणी होऊ दिली नाही तर उत्तम.
६. समुपेदशन महत्वाचे. दोघांनीही मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेणे आवश्यक. ज्यामुळे नात्यात जिव्हाळा निर्माण होतो.
७. शंका येत असेल तर ती विचार पद्धती थांबवण्याचा प्रयत्न.
८. कठोर शंकांचे समर्थन करणारे पुरावे आहेत का असा प्रश्न.
९. काही शंका नॉर्मल असतात. परंतु त्या जास्तच झाल्या तर मात्र प्रॉब्लेम येतो.
१०. सकारात्मक विचारसरणीचा स्वीकार.दोघांनीही नमते घेऊन एकदुसऱ्याला मदत केल्यास योग्य.
११. नकारात्मक लोकांपासून दूर राहिलेलं चांगले. इगो दूर ठेवावा लागतो.
१२. सर्वात महत्त्वाचं, हसून गोष्टींना सहजासहजी दूर करणे. कित्येकदा बोलण्यात तथ्य नसते. विरंगुळा म्हणून पाहिले तर जमतं.

जेंव्हा नात्यामध्ये शंका येतात, तेंव्हा असंख्य घडामोडी आपल्या मेंदूत आणि मनात होतात.त्याचे परिणाम धोकादायक असतात.

१. मानसिक आरोग्य धोक्यात तर येतेच, शारीरिक व्याधी सुध्दा मागे लागतात.
२. त्यातून व्यसन लागण्याची शक्यता असते.
३. घटस्फोट पुढची पायरी.
४. कुटुंब विस्कळीत होऊन विभाजनाची शक्यता.जोडीदाराची डोकेदुखी तर वाढतेच परंतु घरातील अन्य सभासदांना त्रास होतो.
५. समाजात नाव खराब होते ते वेगळेच.
६. पुढील आयुष्याची चिंता.बऱ्याचदा पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त त्रास होतो.

नातेसंबंधांमध्ये शंका अतिशय सामान्य आणि नियमित घडणाऱ्या आहेत, विशेषत: जर आपले नविन नाते असेल किंवा अलीकडे काही प्रकारचे बदल अनुभवले असतील. काही गोष्टींना नजरांदाज करणे आवश्यक असते. जग झपाट्याने बदलत आहे. आपणही बदला आणि फालतू गोष्टी करून जोडीदाराचा मन दुखावणे, उगीच वायफळ बडबड करणे बंद करून भावनिक नाते मनापासून ठेवले तर मनःस्ताप होणार नाही.

©श्रीकांत कुलांगे
9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *