संभाषण व मानसिकता

संभाषण योग्य पद्धतीने कसे करावे याबाबत बऱ्याच जणांना अडचणी येतात. मुलं असोत की तरुण, वृध्द, कित्येकजण यावर उपाय शोधण्यासाठी माझ्याशी बोलली. उपाय कुणालाही सुचेल, परंतु हे असे का होते, ते शोधले की उत्तरं पटकन मिळतात. अशा कुठल्या चुका आपण करतो? ज्याणेकरून आपला संवाद व्यवस्थित होत नाही….

१. न ऐकणे. अशा व्यक्तींशी बोलणारा काय बोलणार?
२. वेळ – काळ विसरून दुसऱ्याचे न ऐकता फक्त आपले प्रश्न विचारणे.
३. अचानक नर्व्हस होणे. काही कारणं नसताना.
४. आपले म्हणणे व्यवस्थित न मांडता येणे. आत्मविश्वास कमी.
५. फक्त स्वतःची स्तुती करणे.
६. मीच खरा, म्हणून बोलत राहणे व आपलेच विचार पुढे रेटणे.
७. चुकीचा संदेश किंवा हावभाव करून बोलणे.
८. एकदम बोअरिंग संभाषण.
९. संभाषणात समोरच्या व्यक्तीचा आदर न करणे.

जेंव्हा संभाषण करायचे तेंव्हा मानसिक तयारी सकरात्मक ठेवली तर मनातून आपण तयार होतो. ही नैसर्गिक क्रिया. संभाषण कौशल्य विकास करायचा झाल्यास खूप बेसिक गोष्टी लक्षात घेतल्या तर सोपे जाते.

१. ऐकायला शिकणे. समोरील व्यक्ती आपल्याला काही विचारत असते किंवा माहिती देत असेल तर त्याला अनुसरून काही जुजबी प्रश्न विचारायला हरकत नाही.
२. संभाषणात विषयाला अनुसरून प्रश्नावली असावी. भलतेच, भरकटणारे प्रश्न नकोत. समोरील व्यक्तींना बोलण्यासाठी वेळ द्यायला हवा.
३. आपल्यात कित्येकदा समोरील व्यक्ती त्याच्या आत्मविश्वास आणि मानसिकतेच्या जोरावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतो व आपण नर्व्हस होतो. अशा वेळेस, शांतपणे ऐकून संभाषण आटोपते घेतले तर छान.
४. संभाषण विषयाशी सुसंगत असावे. त्यासाठी आपल्याला सगळ्याच गोष्टी माहीत असतात असे नाही. म्हणून समोरील व्यक्तींना तसे आपण सांगू शकतो. तर्क आणि अनुभव महत्वाचे, त्यातून संभाषण करताना येते.
५. बोलताना, स्पष्ट, ठराविक शब्द उच्चारण, नेमक्या ठिकाणी थांबून पुढे चालणे, हावभाव, हातांची हालचाल, आवाजातील चढ उतार, योग्य तो चेहऱ्यावरील भाव गरजेचे असतात.
६. नकारात्मक संभाषण, भांडण करणे ही एक कला असते. भांडण करणं क्लेशदायक, तणावपूर्ण. त्यासाठी अनुभव असावा. शक्यतो टाळावे. ना दुखावता संवाद करू शकतो.
७. संवाद कसा दिलखुलापणे, दाद देऊन समोरील व्यक्तीला बोलके करणारा हवा. प्रसन्न वातावरण निर्माण झाले की संवाद दुहेरी होतो.

फटकळ स्वभावाची माणसं संवाद एकतर्फी करतात. संभाषण करण्यासाठी हेतू किंवा विषय काय, गांभीर्य किती, कुणाशी बोलत आहोत याचे भान, विषयाशी सुसंगत माहिती नसून सुद्धा संभाषणात भाग घेऊन मस्तपैकी ऐकणारे व बोलणारे महाभाग सभोवताली दिसतात. संवाद कशासाठी?
१. संवाद माणसांना जवळ आणतो.
२. माहितीची देवाणघेवाण होते.
३. आदर करणे शिकवतो.
४. समाजात, कुटुंबात सकारात्मकता आणि बंधुभाव आणतो.
५. भौतिक सिमांच्या पलीकडं जाऊन माणसं एकमेकांशी जोडले जातात.
६. परिपूर्ण मनुष्य बनतो.

म्हणून प्रत्येक संभाषण आत्मविश्वासाने करता आले पाहिजे व तो कितेयकजणात लवकर तर काहीना वेळ लागतो. घाबरून न जाता संवादातून काहीतरी शिकून, शिकवून पुढे जाता येतं. संभाषण कला शालेय अवस्थेत शिकायला सुरूवात होते. मुद्देसूद आणि विषयाला अनुसरून संभाषण गोड भाषेत करायचं आणि समोरच्या व्यक्तीच्या मनावर राज्य करायचं, त्यांच्यातील विश्वास व उत्कंठा वाढवायची, एकमेकांना सहकार्य केले तर संभाषण सुसह्य बनते. तर चला मग संवादाला आजपासून एक नवं स्वरूप देऊया.

©श्रीकांत कुलांगे
989042029

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *