वर्तणूक आणि आपण

 

कालच्या माझ्या सहकाऱ्याबाबत लिहिलेल्या ब्लॉग वरून मला काहींनी प्रतिक्रिया दिल्या की त्यावर मी काय केले जेणे करून तो त्याची वर्तणूक किंवा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. सर्वप्रथम आपण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत जसे की, मनुष्याचे असे डोके का फिरते. जसजसे आपण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यातून जात असतो तसतसे आपल्या वागणुकीत बदल होतात. हे बदल आपल्या आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेशी संबंधित आहेत , कारण 50% पेक्षा जास्त मानसिक आणि शारीरिक आजार हे आपल्या वर्तनामुळे होतात. एखाद्याच्या वागणुकीत बदल करण्याची प्रक्रिया मूळत: विचार करण्यापेक्षा खूप क्लिष्ट आहे.
त्यातील एक महत्त्वाची समस्या म्हणजे, स्वतःला माहित असून सुद्धा लोक त्यांचे वर्तन बदलत नाहीत.

मग आपल्या वर्तणुकीत नकारात्मक बदल का होतात? अशा काही गोष्टी आहेत की ज्यांचा परिणाम एखाद्या व्यक्तीच्या वर्तनावर होतो.
१. आयुष्यातील प्रमुख घटना.
२. कौटुंबिक परिस्थिती. एखाद्या व्यक्तीचे कौटुंबिक संघर्ष.
३. दारिद्र्याशी लढाई.
४. चिंता वाटणे – आजची, उद्याची, कशाची पण.
५. काही कारणामुळे आलेले डिप्रेशन.
६. कुटुंबात अचानक एखाद्याचा मृत्यू झाला असेल तर.
७. वृद्धावस्थेमध्ये वयोमानामुळे.
८. आयुष्यात काहीच खरे नाही असे विचार नेहमी येणे.
९. दीर्घ शारीरिक आजारपण, औषध इत्यादी
१०.दखल न घेणे – दुर्लक्षित व्यक्ती

माझ्या सहकाऱ्याला फक्त चिंता सतावत होती की मी घरी केंव्हा जाणार आणि त्याचा त्रागा म्हणजे माझी कुणीतरी दखल घ्या. त्याला मी सल्ला दिला की तुझ्या वागणुकीत बदल केला तर हे त्रास जाणवणार नाहीत. त्याने आपल्या वागणुकीत बदल करण्यासाठी प्रयत्न यापूर्वी पण केला पण अपेक्षित बदल न झाल्याने निराश होतं राहिला. आपले मार्ग बदलणे इतके कठीण का आहे? संशोधनात स्पष्ट दाखवले की योग्य समुपदेशन आणि थेरपी द्वारे आपण आपली वर्तवणूक बदलू शकता. ठराविक मार्ग समुपदेशक अवलंबतात जसे की:

१. समस्येचे स्वरुप कसे ओळखावे याचे प्रशिक्षण.
२. एकदा समस्या समजली की त्यावर स्वतः उपचार कसे करावेत.
३. वर्तनाचे विभाजन करून घटकांमध्ये बदलणे: इच्छाशक्ती आणि मार्ग.
४. प्रश्नावली सोडवून अधिक माहिती घेणे. त्याआधारे आपले अवलोकन होते.

सर्वसाधारण वर्तणूक सुधारण्यासाठी खालील पर्याय असतात:
१. आपली आहे ती परिस्थिती स्वीकारा. आपले वर्तन बदलणे सोपे काम नाही, परंतु आपण आपली सद्य परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारून वाटचाल करणे.
२. आपल्या मागे भूतकाळ सोडा. चांगले जुने दिवस आठवण्याचा प्रयत्न हे छान पर्याय आहे.
३. आपल्‍याला आनंद देणार नाही अशा सर्व गोष्टी टाकून द्या. लिस्ट करा आणि त्यांना अक्षरशः टाकून द्या.
४. आपल्या वाईट वर्तनासाठी पर्याय शोधा.
५. फक्त चुकल्यामुळे थांबू नका. वागणूक बदलणे अवघड आहे. लक्षात ठेवा की प्रत्येक दिवस यशस्वी होण्याची नवीन संधी आहे. चिकाटी ठेवा!
६. व्यायाम, आहार, चांगली मित्रसंगत, झोप – सगळं कसं छान ठेवा.

वरील गोष्टी जरी आपल्याला सर्वसाधारण वाटत असल्यातरी बारकाईने लक्ष दिल्यास आपल्याला समजेल की आपण स्वतःला कधी मनाच्या आरशात पाहताच नाही. आपल्या चांगल्या वागणूनिकीमुळे प्रचंड फायदे आहेत हे माहित असूनसुद्धा खडूस सारखे वागून आपली मानहानी करून घेण्यात काय मजा! तेंव्हा मस्तपैकी जगा व इतरांना पण जगूद्या आणि म्हणा….

उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिंग झिंग झिंगाट…

@श्रीकांत कुलांगे
9890420209

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *