दृढनिश्चय आणि मानसिक पैलू

दृढ निश्चय हे एक वैयक्तिक वर्तन कौशल्य आहे आपल्याला इतरांच्या हक्कांचे उल्लंघन न करता किंवा नकार न देता योग्य वेळी आपली मते, विचार आणि भावना व्यक्त करण्यास आणि त्यांना ठामपणे सांगण्यास मदत करते. हे कौशल्य साध्य करण्यासाठी पुढील गोष्टींवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

१. भावना आणि इच्छा प्रभावीपणे कसे व्यक्त कराव्यात हे जाणून घेणे, सकारात्मक किंवा नकारात्मक, लाज न वाटता आणि इतरांच्या अधिकारांकडे दुर्लक्ष न करता.
२. ठामपणा, आक्रमकता आणि उत्कटतेमध्ये भेदभाव आणि फरक जाणणे.
३. वेळ ओळखुन भावना व्यक्त करणे.
४. इतरांच्या आक्रमक आणि असह्य वागणुकीच्या वेळी, आक्रमकता न दाखवता आपला बचाव कसा करावा हे जाणून घेणे.
त्यामुळे फायदे नक्कीच होतात जसे की आत्मविश्वास आणि वयक्तिक समाधान, समाजात मान, आदर मिळतो. दृढनिश्चयी व्यक्तीमध्ये काही वैशष्ट्ये असावीत.

१. स्पष्ट वक्तेपणा.
२. समयसूचकता.
३. विषयावर अभ्यास. अवांतर वाचन.
४. विपुल शब्द संग्रह.
५. हक्कांची जाणीव.
६. इतरांना आदर युक्त परंतु ठोस पुरावे देण्यास सक्षम.
७. सकारात्मक देहबोली आणि संतुलित मानसिकता.
८. बरोबर आणि चूक यातील समज.
९. मत प्रदर्शन करताना सहजता.
१०. योग्य ठिकाणी हो आणि नाही म्हणायची पद्धत.
११. कुणाला कमी लेखणे हा हेतू नसणे.
१२. सुदृढ भावनिक नियंत्रण.
अशा अनेक पैलूंचे दर्शन दृढनिश्चयी व्यक्तींच्या स्वरूपात दिसतात. याव्यतिरिक्त काही गोष्टी न बोलता सुध्दा करून दाखविल्या जातात ज्यामध्ये भावनिक संदेशाची देवाणघेवाण होते.

१. डोळ्यात बघून बोलणे. हे फक्त दृढनिश्चयी व्यक्तीच करते.
२. चेहऱ्यावरील हावभाव आपला मूड आणि वर्तणूक यांचे प्रतीक असते.
३. उभे राहणे, बसणे, चालणे इ. शरीराची हालचाल आपल्या दृढतेचे स्तर प्रकट करते. त्यातून आत्मविशवासपूर्वक मनस्थिती दिसते.
४. एकंदर हावभाव, हातांच्या हालचाली, आपण सहजतेने इतरांशी संवाद साधण्यासाठी वापरतो, त्यातून परिपक्वता दिसून येते.
५. वैश्विक घटक म्हणजे आपण स्पष्टपणे व्यक्त करताना भाषा, उच्चार, आवाजाचा चढ उतार यांचा ताळमेळ.

 

जर आपल्याला जीवनाची गुणवत्ता आणि इतरांशी असलेल्या संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण, चांगल्या प्रतीने करू इच्छित असल्यास आपल्या दृढतेची पातळी वाढवने आवश्यक. मानसोपचारात, रुग्णांची दृढता वाढविणे हे एक शक्तिशाली उपचारात्मक साधन आहे जे त्यांना सकारात्मकतेने सुधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. लहापणापासूनच अशा सुंदर सवयी सहजतेने लावल्यास अनेक विवेकानंद, रामदास स्वामी तयार होतील जे आज समाजाला योग्य प्रगतीपथावर ठेऊ शकतील.

 

©श्रीकांत कुलांगे

9890420209

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *