आता जवळपास उन्हाळा संपत आलाय, परंतु मागील काही महिन्यांचे ऊन आणि उष्ण वाऱ्यांचे आपल्या मानसिकतेवर काय परिणाम होतात याची पर्वा कुणी करताना दिसत नाहीत. उन्हाळ्यात कडक उन्हाची चर्चा होते तेव्हा त्याचा संबंध उष्माघात, अशक्तपणा आणि पाण्याची कमी यांसारख्या शारीरिक समस्यांशी जोडला जातो. उष्माघात टाळण्यासाठी, आपण शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि उष्णतेच्या लाटेपासून वाचवण्यासाठी अनेक मार्ग वापरतो. मात्र उष्माघात हा केवळ शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यालाही धोका आहे, याकडे दुर्लक्ष केले जाते.
या संदर्भात जागतिक लेवल वर काही संशोधन करण्यात आले व त्यातून आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम करतात, ते सांगितले जाते.
१. विचार करण्याची क्षमता कमी होते (Decreased Cognitive Abilities) – उष्णतेची लाट आणि वाढत्या आर्द्रतेमुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतोh. आपल्याला निर्णय घेण्यास त्रास होऊ लागतो कारण मेंदूचा जो भाग समस्या सोडवण्याचे काम करतो तो उष्णतेच्या ताणामुळे प्रभावित होतो. ज्यामुळे लोक विचार करण्यास आणि समजण्यास असमर्थ असतात.
२. आक्रमक वर्तन (Aggressive Behaviour) – उष्णता वाढल्यामुळे, लोकांमध्ये आक्रमक वर्तन देखील त्याच पातळीवर वाढू लागते. जेव्हा लोक उष्णतेमुळे काहीतरी विचार करू आणि समजू शकत नाहीत, तेव्हा ते चिडचिड आणि जास्त आक्रमक होऊ लागतात. त्याच्या या वागण्यामुळे इतर लोकांपासून दुरावा निर्माण होऊ लागतो. लोकांमध्ये मूड स्विंग आणि बायपोलर डिसऑर्डर यांसारख्या समस्यांना अधिक बळी पडतात.
३. हिंसाचारात वाढ (Increase In Violence) – यामध्ये आक्रमक वागणुकीचे वाढते स्वरूप हिंसाचारात रुपांतरित होते, तापमानात फक्त एक किंवा दोन अंश सेल्सिअसच्या वाढीमुले गुन्हेगारी देखील 3-5% वाढू शकते असे संशोधनात आढळून आले आहे.
४. चिंता (Eco-Anxiety) – पर्यावरणाची चिंता हा विषय अनेकदा चघळला जातो. परंतु, भविष्यात यावर बरीच चर्चा होण्याची शक्यता आहे. WEF अहवाल सांगतो की उन्हाळ्याचे दिवस आपल्यासाठी पर्यावरणाची चिंता निर्माण करतात. तापमान जितके जास्त असेल तितके आपण त्याबद्दल ताण घेऊ लागतो आणि परिणामी पर्यावरणाची चिंता आपल्याला घेरते.
५. राइज इन सुसाइड (Rise In Suicide) – वाढत्या तापमानामुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडते. यावरील संशोधनानुसार दर महिन्याला सरासरी तापमानात 1 सेल्सिअसच्या वाढीमागे मानसिक आरोग्याशी संबंधित मृत्यू 2.2% वाढतात. आर्द्रता जितकी जास्त तितकी आत्महत्यांचे प्रमाण अधिक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
अति तापमानाचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? याबाबत आत्मकेंद्रित होऊन विचार करणे क्रमप्राप्त आहे. उन्हाळ्यात भारतातील बहुतेक भागांमध्ये तापमान 38 °C ते 40 °C पर्यंत असते. तर एक सामान्य शरीर 42.3 °C पर्यंत तापमान सहन करू शकते. उन्हाळ्याच्या तापमानापासून ते फार दूर नाही ज्यामुळे अनेक समस्या दिसतात जसे की,
१. मानसिक थकवा
२. विचार करण्याची क्षमता कमी होणे
३. चिडचिड
४. आक्रमक वर्तन
५. स्वभावाच्या लहरी
६. Bipolar विकार
७. चिंता
८. स्किझोफ्रेनिया
थोडक्यात सांगायचे तर, हे सर्व मानसिक त्रास आपल्याला सांगतात की उष्णतेची लाट आणि वाढते तापमान एखाद्याचे मानसिक आरोग्य किती प्रमाणात बिघडवू शकते. उष्णतेच्या लाटेत मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबाबत अधिक माहिती असूनही आपण ती घेत नाहीत.
१. पाणी प्यायला ठेवा, ही सर्वात महत्वाची सवय आहे जी आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फिट राहण्यासाठी अवलंबली पाहिजे. दिवसातून किमान 2.5 ते 3 लिटर पाणी प्या.
२. तापमान तपासल्यानंतर घर सोडा आणि जर ते आवश्यक नसेल तर न सोडणे चांगले.
३. तुमच्या वागण्यावर लक्ष ठेवा आणि तुमच्या स्वतःच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर चिंता किंवा मानसिक थकवा जास्त असेल तर दीर्घ श्वास घ्या आणि ध्यानाला रोजच्या दिनचर्येचा एक भाग बनवा.
४. जर प्रकरण याच्या पलीकडे गेले असेल तर, व्यावसायिक मदत घेण्यास मागे हटू नका कारण बरेचदा लोक तज्ज्ञांची मदत घेण्यास टाळतात.
आता उन्हाळा जावून पावसाळा सुरू होईल. परंतु आपण मागील काही महिन्यात कुठले निर्णय घेतले, त्यातून किती चूक, किती बरोबर ते तपासून पाहायला हवे. त्याच व्यतिरीक्त आपले नातेसंबंध बिघडलेत का याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडील उन आणि पाऊस यांचा खेळ चालूच राहील परंतु मनाचा आणि त्यासोबत असणाऱ्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर आहे यावर विचार करायला हरकत नाही.