मूड स्विंग

आपल्या मनःस्थितीत अचानक होणारे बदल हा अनेकांना धक्का देऊन जातात. काही वेळा हा बदल ध्यानात येत नाही. अशा अचानक बदलांमुळे आपल्या कामावर, नात्यांमध्ये, परिणाम होतो.  अशाच प्रकारची केस हाताळताना त्या व्यक्तीला ठराविक घटनांचा काही संबंध आहे का यावर चर्चा करावी लागली. कारण असे बदल काही कारणास्तव होतात. त्यातल्या त्यात लहान मुले, तरुणाई यांच्या मध्ये ही वृत्ती जास्त आढळून येते.
प्रत्येकास वेळोवेळी मूड स्विंग्जचा अनुभव येत असतो, परंतु अशा गोष्टी वारंवार होत असल्यास किंवा त्या झपाट्याने वाढल्यास आपल्याला उपचाराची आवश्यकता आहे असे समजून घेणे आवश्यक. काय कारणे आहेत मग मूड स्विंग चे:

१. आजार आणि दुखापत – इतर वैद्यकीय परिस्थिती, विशेषत: न्यूरोलॉजिकल परिस्थिती देखील मूड स्विंग साठी कारणीभूत ठरू शकते, मेंदूवर परिणाम करणारे आजार किंवा तीव्र जखमांशी संबंधित असू शकतात, जसे की वेड, स्ट्रोक.
२. विकासात्मक टप्पे – लहानपणापासून तर मोठे होईपर्यंत अनेक टप्पे आपण बदलतो व त्याचा परिणाम आपल्या मनोवृत्तीवर होतो.
३. ऍलर्जी – सतत शिंका येणे, डोळे पाणवणे, नाक गळणे आणि खाज सुटणे यामुळेही थकवा येऊ शकतो, विशेषत: हि आपल्या झोपेत अडथळा आणते.
४. औषधे – अनेक औषधी आपल्या रोजच्या जीवनात ढवळाढवळ करत असतात. त्यातून एक म्हणजे मूड स्विंग.
५. हार्मोन मधील होणारे बदल.
६. आयुष्यातील घडलेल्या घटना ज्यामध्ये स्वकीय सोडून जाणे, त्यांची कमी जाणवत राहणे अशा व्यक्तीसुद्धा यामध्ये येऊ शकतात.

मूड स्विंग्स जरी अनेकदा नॉर्मल समजला जात असले तरी देखील त्यांचा आणि मानसिक आजाराचा जवळचा संबंध आहे.

१. उदासीनतेमुळे मूड स्विंग होणं स्वाभाविक आहे, विशेषत: जर उपचार न केले तर. दु: खी, हताश आणि आपण नालायक आहोत असे वाटते. आवडत्या गोष्टी करण्यात आनंद घेण्यात अयशस्वी. झोपायला त्रास होतो. नेहमीपेक्षा जास्त खाणे किंवा पुरेसे न खाणे. थकवा जाणवतो. लक्ष केंद्रित करण्यात आणि / किंवा निर्णय घेण्यात अडचण येते. मृत्यू किंवा आत्महत्येचे विचार मनात येणे.
२. बायपोलार डिसऑर्डर – यामध्ये अनेक भावनांचे मिश्रण आढळून येते. यामध्ये खूप किंवा अतिवेगाने बोलणे, जास्त उर्जा असणे,
रिस्की वर्तन, चिडचिडे दिसणे, झोप कमी घेण्याकडे कल, इत्यादी. याचबरोबर निरुपयोगी किंवा निराश वाटणे, उदास वाटणे, बर्‍याचदा रडणे किंवा अश्रू अनावर होणे, उर्जा नाही, दमलेले आहेत, असे वाटते की ते लक्ष केंद्रित करू शकत नाहीत, विचार / कार्ये करू शकत नाहीत, नेहमीपेक्षा जास्त झोप / झोप ना येणं. ते सामान्यत: पेक्षा कमी किंवा जास्त खाणे, मरणार किंवा मृत्यूचे विचार, आत्महत्येचे नियोजन / प्रयत्न अशा अनेक गोष्टी आढळून येतात.
३. बॉर्डरलाइन पर्सनालिटी डिसऑर्डर (बीपीडी) ही आणखी एक मानसिक आरोग्य डिसऑर्डर आहे ज्यामुळे सतत मनःस्थिती बदलू शकते. यामध्ये भावना कंट्रोल न होणं, बेपर्वाईक ड्रायव्हिंग आणि उत्तेजक पदार्थांचा वापर,धोकादायक वर्तन, अस्वस्थ वाटणे, स्वत: ला इजा करणे, धमकी देणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे, इतरांशी भावनिक आणि प्रखर संबंध, चिडचिडेपणा, अयोग्य राग आणि स्वभाव नियंत्रित करण्यास असमर्थता यासारखे निराशाजनक लक्षणे दिसतात.

याचबरोबरोर मनःस्थिती (मूड स्विंग) बदलण्यासाठी आजची आपली जीवनशैली सुद्धा तितकीच कारणीभूत आहे.

१. आहार – आपण काय आणि कसे खातो, वेळेत जेवतो का, आहार परिपूर्ण नसणे.
२. झोपेचा असमतोल. मूड स्विंग साठी हा सुद्धा मोठे कारण आहे. झोप किती वेळ, क्वालिटी कशी यावर सर्व अवलंबून.
३. अमली किंवा उत्तेजित पदार्थांचे सेवन.
४. रोज घडणाऱ्या घटनांना आपण कसे हाताळतो. या घटना आपल्या मानसिकतेवर परिणाम करत असतात. त्यातून चिंता आणि उदासीनता येते.

आपण स्वतःहून चिंता कमी करून, सौम्य किंवा अधूनमधून मूड स्विंग्ज व्यवस्थापित करण्यास सक्षम होऊ शकता, विशेषत: जर आपल्याला त्या कशामुळे होतात याची आपल्याला चांगली कल्पना असेल तर. स्रियांप्रमाणचे पुरुषांना सुद्धा या बदलांना सामोरे जावे लागते. आपले मूड स्विंग्स व्यवस्थापित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग शोधण्यासाठी मूलभूत कारण समजून घेणे आवश्यक आहे. एकदा कारण समजले कि त्यावर उपाय उपलब्ध असू शकतात. त्यामध्ये:

१. कारणमीमांसा करून योग्य डॉक्टर कडून औषध घेणे. घेत असलेल्या औषधासंबंधी तक्रार असेल तर ती निदर्शनास आणून देणे.
२. नियमित व्यायाम करणाऱ्यांना मूड स्विंग चा त्रास जाणवत नाही असे संशोधक म्हणतात.
३. मानसशास्त्रीय चाचण्या करून असलेला गुंता सोडविण्यात मानसोपचार तज्ज्ञ मदत करतात. वेगवेगळ्या थेरपीचा वापर यामध्ये केला जातो. ठरविक सेशन्स मध्ये या होतात.
३. लहान मुलांच्या सवयी आणि त्यांचे व्यवस्थापन दुर्लक्षित न करणे.
४. एकमेकांना समजून घेणं, प्रसंगी धीर देऊन संवाद करणे आवश्यक. कित्येकदा प्रेमाचा आलिंगन खूप धीरच असतं.
५. ताणतणाव व्यवस्थापन ही रोजची सवय हवी. हास्य विनोद क्लुप्ती असे अनेक प्रयोग लोक करतात आणि यशस्वी होतात.
६. रोजचेच रडे…म्हणून सोडून देऊ नये. नंतर मोठा प्रश्न बनतो. वेळीच आवार घातलेला चांगला.
७. माहितीचा अभाव – आजकाल इंटरनेट वर बरीच माहिती उपलब्ध आहे. तसेच जवळील सरकारी, NGO किंवा परिवते समुपदेशन केंद्राला जरूर भेट द्या.
8. अध्यात्मिक वाचन चिंतन मनन, सुंदर संगीत, मन शांत करायला मदत करतं, त्यामुळे झोप चांगली होऊ शकते.
९. काही प्रसंग, व्याधी कायमस्वरूपाच्या असतात व त्यांना कित्येकदा लगेच उत्तर नसते – अशा ठिकाणी स्वीकार करून रोजच्या कामात सकारात्मकता ठेवणे एव्हढेच हाती असते. श्रद्धा आणि सबुरी ही नेहमीच कमी येते. प्रार्थना, सेवाभावी स्वभाव यातून मार्ग काढतो.

मूडमध्ये काही प्रमाणात बदल हा जीवनाचा सामान्य भाग आहे, परंतु मूडमध्ये होणारे बदल आपल्या आयुष्याच्या गुणवत्तेत अडथळा आणू नयेत. जर तुमचा मूड बदलत असेल किंवा आणखी वाईट होत असेल तर डॉक्टरांना नक्की कळवा. एकत्रितपणे, आपण मूडमध्ये आपल्या चढउतारांचे कारण काय असू शकते हे ओळखू शकता.
योग्य विचारसरणी, क्षणिक निर्णय शक्ती, अध्यात्मिक धोरण व अंमलबजावणी चांगली असेल तर मानसिक आरोग्य सुंदर राहते म्हणून प्रयत्न करून पाहायला हरकत नाही.

श्रीकांत कुलांगे
मानसोपचारतज्ज्ञ

1 thought on “मूड स्विंग”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *