स्वयंशिस्त आणि मैत्री

जहाजावर एक माल्टा देशातील व्यक्ती आहे. कधीच कुणाशी जास्त बोलत नाही. चिडचिड त्याची मैत्रीण, आणि हताश स्वभाव हा मित्र. याखेरीज त्याला काही समजत नाही. ती केस सध्या बघतोय. त्याच्याशी बोलताना त्याला नात्यातील वीण घट्ट कशी करणार ते शिकवत आहे. हळूहळू माणसात आल्याची लक्षणे दिसू लागली आहेत. त्याच्यावर काही थेरपीचा वापर करावा लागला. असे अनेक जण तुमच्या घरात असू शकतील.

मित्रत्वाचे आणि नात्यागोत्यांचे सुंदर संबंध प्रस्थापित करून ते टिकवण्याचं गुपित सोपं आहे. तुम्हाला जर मित्र पाहिजे असेल, तर तुम्ही स्वतः प्रथम एक मित्र असलं पाहिजे. तुम्हाला जर वाटत असेल की लोकांना तुम्ही आवडावं, तर प्रथम तुम्हाला ते आवडले पाहिजेत. तुम्हाला जर वाटत असेल की लोकांनी तुमचा आदर करावा, तर प्रथम तुम्ही त्याचा आदर केला पाहिजे. तुम्हाला जर इतरांवर छाप पाडायची असेल, तर प्रथम तुमच्यावर त्यांची छाप पडलेली असली पाहिजे.

इतरांबरोबर उत्कृष्ट संबंध असण्याची किल्ली अगदी सोपी आहे. ते महत्त्वाचे आहेत असे त्यांना वाटायला लावा. ज्या प्रमाणात तुम्ही इतर लोकांना ते महत्त्वाचे आहेत असं वाटायला लावता – तुमच्या कुटुंबियांपासून सुरुवात करून ते बाहेरच्या जगातील मित्रमंडळी आणि सहकर्मचारी ह्यांच्यापर्यंत – त्या प्रमाणात तुम्ही जगातील एक सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती व्हाल. काय आहेत ते मार्ग?

१. ठाम मत, मूल्यमापन किंवा टीका, ह्यांना वगळून इतर लोकांकडून स्वीकारलं जावं, ही मनुष्य स्वभावाची एक ओढ आहे. मानसशास्त्रज्ञ ह्या वर्तनाला ‘बिनशर्त सकारात्मक लोभ’ असं म्हणतात. जेव्हा तुम्ही काहीही आडकाठी न ठेवता, दुसऱ्या व्यक्तीला, तो किंवा ती, अगदी जशी आहे तशी पूर्णपणे स्वीकारता.

२. कौतुक व्यक्त करणं, मान हलकेच लववून किंवा स्मितहास्य करून, ते शुभेच्छापत्रं, पत्र आणि देणग्या ह्यामुळे लोकांचा आत्मसन्मान उंचावतो आणि ते स्वत:ला अधिक आवडू लागण्याचं कारण ठरतं.

३. समजूतदार असा : सर्वसाधारणपणे समजूतदार आणि सकारात्मक असलेल्या लोकांचं प्रत्येक प्रसंगात सर्वात अधिक स्वागत होतं.

४. तुम्ही जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या एखाद्या वस्तूची प्रशंसा करता, तेव्हा त्यामुळे त्यांना स्वत:बद्दल आनंद होतो.

५. इतरांकडे लक्ष द्या : एखादी व्यक्ती बोलत असताना ते लक्षपूर्वक ऐकणं, हा कदाचित त्या व्यक्तीचा आत्मसन्मान वाढवण्याचा सर्वात सामर्थ्यवान मार्ग आहे.

६. कधीही टीका करू नका, धुत्कारू नका किंवा तक्रार करू नका.

७. सौजन्यशील, सौहार्दपूर्ण असा, आणि तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकाचा विचार करा.

दुसऱ्यांबद्दल जाणीव ठेवणे आवश्यक. आयुष्यभराची मैत्री आणि सुंदर नातीगोती निर्माण करण्याचा नियम सोपा आहे. त्यासाठी काही सराव करणे गरजेचे असून ठराविक गोष्टी तुम्हाला करायला लागतील. म्हणून वही घ्या आणि सुरू व्हा.

१. तुमच्या कामातील आणि व्यक्तिगत जीवनातील सर्वात महत्त्वाच्या मित्रांची एक यादी बनवा. त्यांच्याबद्दल त्यांना चांगलं वाटावं म्हणून तुम्ही काय करू शकाल?

२. दुसऱ्या व्यक्तीला महत्त्वाचं असल्याचं वाटावं म्हणून त्यांच्याबरोबरच्या प्रत्येक भेटीत तुम्ही पहिली गोष्ट काय कराल ते शोधून काढा.

३. तुमच्याशी संभाषण केलं त्या प्रत्येक माणसाला अधिक मौल्यवान आणि लायक असल्याचं वाटावं, असं वागण्याचा निश्चय करा.

४. तुमच्या सगळ्या नातेसंबंधात न्यायनिवाडा न करण्याचा सराव करा. दुसऱ्यांचे विचार नेहमी सर्वात चांगलेच आहेत, असेच गृहीत धरा.

५. तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे जगायला फार थोडा वेळ आहे अशी कल्पना करा, आणि हे माहीत असलेलं फक्त तुम्हीच आहात, अशीही कल्पना करा.

६. प्रत्येक व्यक्तीबद्दल तुमच्यावर छाप पाडणारं काहीतरी शोधून काढून नंतर त्या व्यक्तीला तुम्ही किती प्रभावित झाला आहात, ते सांगा.

७. इतर लोकांशी होत असलेली तुमची वागणूक टिपणारा एक छुपा कॅमेरा आणि मायक्रोफोन आहे, अशी कल्पना करा. तुम्ही वेगळे कसे वागाल?

वरील करायच्या गोष्टी वेळ मिळेल तेंव्हा जरूर करा. हा टाइमपास नसून मानसशास्त्रीय थेरपीचा एक भाग म्हणून पहा. मैत्री आणि शिस्त हातात हात चालणारी गोष्ट आहे. स्वत:च्या पलीकडे जाऊन विचार करण्यासाठी प्रचंड स्वयंशिस्त आणि स्वनियंत्रण लागतं. ते साध्य करण्यासाठी व मैत्री, नातेसंबंध टिकवण्यासाठी वरील सांगितलेल्या गोष्टी तत्वज्ञान म्हणून न बघता एक मार्ग म्हणून जरूर बघा.

श्रीकांत कुलांगे

मानसोपचार तज्ञ

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *