शिस्त आणि विवाह

वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक कुटुंब आजही समुपदेशन घेण्यासाठी येत आहेत. एक जाते दुसरे येते. कुठपर्यंत समाज प्रबोधन कोण करू शकतो?

तुमचं चारित्र्य आणि व्यक्तिमत्त्व, ह्याचं एक महत्त्वाचं मोजमाप म्हणजे दीर्घकाळच्या, प्रेमळ नातेसंबंधात रहाण्याची तुमची क्षमता. विश्वास आणि आदर, ह्या वैवाहिक आयुष्य आणि नातेसंबंध ह्यांच्यासाठी पायाभूत गुण आहेत. एकत्र वैवाहिक जीवनात, पुरुष आणि स्त्रीमध्ये बरेच मतभेद असू शकतील, पण जोपर्यंत दोघांतील विश्वास आणि आदर टिकून असतो, तोपर्यंत तो विवाह अनंत काळासाठी पुढे चालू राहातो. जर कधी दोघांतला एक जोडीदार दुसऱ्यावर विश्वास ठेवत नाही किंवा त्याचा आदर ठेवत नाही, त्यावेळी तो नातेसंबंध संपतो.

बरेच विवाह घटस्फोटात संपतात आणि बरेच घटस्फोटित लोक बरीच लग्नं करतात. तरीही काही लोक एकदाच लग्न करतात आणि समाधानाने आयुष्यभर विवाहित रहातात. हे असं का?

१. अनुरूपता. परिपूर्ण समतोल सुखाने एकमेकांत जोडला जाण्यासाठी, दोन्ही लोक एकमेकांशी आदर्शवत तोल सांभाळतात, आणि प्रत्येकाकडे एकमेकांना पूरक गुण आणि गुणवैशिष्ट्यं असतात.

२. एखादं जोडपं जेव्हा एकमेकांबरोबर खरोखरच आनंदी असतं, तेव्हा कुटुंब, पैसा, नीतिमत्ता, काम, मुलं, राजकारण, धर्म आणि लोक ह्यांच्याबद्दलची त्यांची मूल्यं बरीच सारखीच असलेली दिसतात.

३. एका आनंदी वैवाहिक जीवनासाठी प्रचंड स्वयंशिस्त आणि स्वनियंत्रण ह्यांची गरज असते. स्वत:ला मागे ठेवणं आणि त्याग, ह्यांची प्रेमासाठी नेहमी तत्परता असते.

४. दुसऱ्या व्यक्तीच्या भावना, विचार आणि मतं, तुम्ही न चिडता किंवा न रागावता स्पष्टपणे ऐकणं, अशी स्वयंशिस्त आणि प्रामाणिकपणाची तयारी असते.

५. स्त्रिया नातेसंबंधात तज्ज्ञ असतात. इतर लोकांबद्दल त्या अतिशय संवेदनशील असतात. हे तिच्या जोडीदाराला माहिती असते.

६. वेगवेगळया परिस्थितीत सहनशीलता आणि समजूतदारपणाची समज असते.

एका प्रेमळ नात्यात जेव्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीबरोबर एकत्र येता आणि कित्येक प्रकारे तुम्ही एकमेकांना अनुरूप आहात असंही असलं, तरीही मतभेदाचे मुद्दे, असमाधान आणि अतृप्तता असतेच. हे सर्वसाधारण आणि नैसर्गिक आहे. आणि जेव्हा कधी हे मतभेद आढळतील, तेव्हा स्वयंशिस्त, स्वनियंत्रण ह्यांच्या आचरणाने त्यांचा विचार करावा लागेल.

प्रत्येक प्रेम करणारी जोडपी कधीही या गोष्टी करत नाही.

१. सुड घेत नाहीत.

२. अपमान करत नाहीत.

३. अशोभनीय वर्तणूक करत नाही.

४. स्वतःचा स्वार्थ बघत नाही.

५. सहजपणे डिवचलं जात नाही,

६. दुष्ट विचार करत नाही.

७. असत्यामध्ये आनंद मानत नाही, तर सत्यामध्ये आनंद मानतं.

८. सगळ्या गोष्टी सहन करतं,

९. सगळ्या गोष्टींत विश्वास ठेवतं.

१०. सगळ्या गोष्टींची आशा करतं.

११. सगळ्या गोष्टींतून निभावून जातं.

१२. प्रेम कधीही अपयशी होत नाही.

संबंध प्रस्थापित करायला प्रयत्न लागतात. कसे करणार? त्यासाठी काही शिस्त आपल्याला पाळाव्या लागतील.

१. ऐकण्याची शिस्त – लक्षपूर्वक ऐका. मध्ये खंड न पाडता लक्षपूर्वक ऐकणं ही पहिली शिस्त आहे.

२. उत्तर देण्यापूर्वी क्षणभर थांबा. ऐकण्याची दुसरी शिस्त आहे, उत्तर देण्यापूर्वी क्षणभर थांबणं – तिने किंवा त्याने काय म्हटलंय ह्याचा काळजीपूर्वक विचार करण्यासाठी काही सेकंद घ्या.

३. खुलासा विचारा. परिणामकारक ऐकण्याची तिसरी शिस्त आहे, स्पष्टतेसाठी प्रश्न विचारणं. दुसरी व्यक्ती काय विचार करतेय किंवा तिला काय वाटतंय, हे तुम्हाला आपसूकच कळतं, असं कधीही गृहीत धरू नका.

४. अभिप्राय देणं. परिणामकारक ऐकण्याची चौथी शिस्त म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने जे सांगितलं, त्याच्यावर अभिप्राय देणं, आणि ते तुमच्या स्वत:च्या शब्दांत मांडणं.

आपल्या जोडीदाराशी बोलण्याची एक भावनिक गरज प्रत्येक व्यक्तीला असते. विशिष्ट प्रमाणात ऐकण्याचीही प्रत्येक व्यक्तीला भावनिक गरज असते. एकमेकांशी बोलणं आणि ऐकणं ह्या इच्छांचा एकमेकांशी समतोल राखलेला असतात, अशी जोडपी एकमेकांना सर्वाधिक अनुरूप असतात. संभाषणाची एक सहज भरती आणि प्रवाह, मध्येमध्ये सुखावह शांततेची विरामचिन्हं, असा तो संवाद असतो. दोन्हीही बाजू समाधानी असतात. कारण प्रत्येक व्यक्तीला, त्याची किंवा तिची, बोलण्याची आणि ऐकण्याची दोन्ही गरजा पूर्ण करण्याची संधी मिळते. जरा स्वतःमध्ये झाकून बघा मग सांगा की खरंच मला घटस्फोट हवाय का? किंवा तत्सम भांडणं हवेत का?

 

 

 

 

3 thoughts on “ शिस्त आणि विवाह”

  1. Ashwini T. Jathar

    विश्वास, तडजोड, पारदर्शकता आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांना पुरेशी स्पेस देणे या गोष्टी सुखी आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या सहजीवनाचा पाया आहे..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *