निंदा: आपली विचारसरणी

निंदा नालस्ती काळानुरुप व्यवस्थित चालू आहे आणि आपण त्याबाबत काय करू शकतो किंवा याला कसं हाताळू शकतो याबाबत निताचा प्रश्न सुध्दा यथारुप होता. मजेची गोष्ट म्हणजे हा प्रकार जगभर अगदी मस्तपैकी चालू असतो. त्याचं स्वरूप फक्त बदलत असतं.  

शंभरपैकी नव्वद टक्के लोक कधीही स्वत:ला दोष देत नाहीत असा एक अभ्यास सांगतो. त्यांनी कितीही चुका केल्या असल्या तरीही त्यांना काही आपल्या चुका दिसत नाहीत. ते कधीही स्वत:ची निंदा करीत नाहीत.

थोर मनोविश्लेषक हैंस सेल्वनेही म्हटले आहे, ‘प्रत्येक व्यक्ती कौतुक आणि प्रेमाची भुकेली असते’.. अर्थातच आपण सर्व हे मान्यही करतो. निंदेबाबत वेगवेगळी तथ्य आहेत.

१. प्रत्येक जण निंदेला घाबरत असतो.

२. निंदा किंवा टीका केल्यामुळे कुटुंबातील सदस्य, मित्र, कर्मचारी, सहकारी अशा सर्वांचे मनोबल कमी होते.

३. त्यांच्या स्थितीत काहीही सुधारणा होत नाही.

४. निंदा केल्यामुळे खरं तर कोणालाही काहीही लाभ होत नाही कारण त्यामुळे समोरची व्यक्ती आपला बचाव करायला लागते. कारणे सांगून तर्क द्यायला लागते.

५. निंदा अतिशय धोकादायकही असते कारण त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या आत्मसन्मानास ठेच पोहोचते.

६. त्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल वाईट भावना भरली जाते.

७. निंदा केल्यामुळे कोणतीही सुधारणा होत नाही. उलट निंदेमुळे त्या व्यक्तीशी असलेले आपले संबंध बिघडतात.

८. निंदा किंवा टीका केल्यामुळे कोणत्याही समस्येवर उत्तर काढले जाऊ शकत नाही,

९. काही लोक निंदेला एक फिडबॅक म्हणून घेतात.

१०. निंदा करणारी मंडळी बहुतांशी महिला वर्गात मोडतात. पुरुष आजकाल त्या बरोबरच स्पर्धेत आहेत.

११. कायम निंदा करणाऱ्या व्यक्ती निराशावादी असतात.

१२. काहीजण परिस्थितीनुसार निंदा करतात.

१३. निंदा करणारे कित्येकदा मानसिक रोगाचे बळी असतात. त्यांच्या असणाऱ्या वेदना ते इतरांची निंदा करून जगासमोर मांडत असतात.

१४. असे लोक तोंडावर एक व मागे दुसरे बोलायला कचरत नाहीत.

आपले ग्रंथ हेच सांगतात की चुकूनसुद्धा कोणाचीही निंदा करू नका. कारण त्यामुळे तुम्हालाही निंदेचा सामना करावा लागू शकतो आणि ही वस्तुस्थिती आहे.

आपल्यापैकी कोणाच्याही मनात एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार किंवा द्वेषाची भावना जोपासत असेल, तर ही भावना मनात अनेक दशके घर करून राहते. इतकेच नाही तर संबंधिक व्यक्ती मेली तरीही ही भावना काही मरत नाही. मग आपण याला कसं सामोरं जायचं?

१. निंदा करणाऱ्या व्यक्तीची कुंडली समजून घेणे गरजेचे. खरंच ती व्यक्ती जबाबदार असेल तर गंभीर रित्या घेणं अन्यथा सोडून देणं.

२. कित्येकदा निंदा करणारी व्यक्ती नकळत आपलं भलं करत असते. आपल्या चुका जाणीवपूर्वक लक्ष घालून आपल्याला कळवते, त्यात फायदा आपलाच. म्हणून ऐकून घेऊन प्रेरणा घ्या.

३. बचाव करताना उगीच भांडणं सुरू करण्यात अर्थ नाही.

४. वैयक्तिकरित्या घेऊ नका.

५. प्रत्येकजण चुका करतोच. पण त्यातून स्वतः ला त्रास करून घेऊ नये.

६. स्वतःला या बोलण्यामुळे आलीप्त करून घेऊ नये. इतर आपल्याबद्दल चांगलंच बोलतील याची गॅरंटी देव पण देत नाही.

७. कधी कधी खमकी भूमिका घेणं आवश्यक. त्यात सुध्दा एक ताळमेळ असावा. अनावश्यक गोष्टी सोडून फक्त त्याच विषयावर चर्चा अपेक्षित.

८. या विषयावर ध्यान न देता आपले कर्म करत राहणे. आपले आचरण चांगले असेल तर निंदा टोमणे गेले हवेवर उडत.

९. कुणीतरी आपली दखल घेतय हेही नसे थोडके.

१०. समोरील व्यक्ती त्यांचे संस्कार कळत नकळत दाखवत असते.

११. स्वतःची नवी ओळख होते, आपल्यातील न समजलेले गुण, अवगुण समजतात.

कोणाबद्दल वाईट बोलणे, निंदा करणे, टीका करणे, तक्रार करणे असे सर्व काही करणे खूप सोपे असते. अर्थात लोकांना समजून घेण्यासाठी आणि त्यांना क्षमा करण्यासाठी व्यक्तीकडे खूप मोठ्या समजूतदारपणाची आणि संयमाची आवश्यकता असते. थोर व्यक्ती लहान माणसांसोबत वागताना आपल्या थोर पणाचा परिचय करून देत असतात.

ज्याला निंदा करायची त्यांनी इतकेच करायला हवे की अतिशय मोजक्या आणि शेलक्या शब्दात त्याची निंदा करावी. मग आपली ही निंदा तर्कसंगत असो की अतार्किक.

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *