समुपदेशन करताना काही केसेस अशा होत्या की त्याबाबत लिहिणं गरजेचे वाटले. त्यातल्या त्यात शालेय व कॉलेज मध्ये असणारी मुलं आणि त्यांच्या नैराश्येच्या समस्या. मुलांची घुसमट पालकांच्या ध्यानात कित्येकदा न आल्यानं अनेक प्रश्नांना त्यांना सामोरं जावं लागतं पण तो पर्यंत उशीर झालेला असतो.
नैराश्यामुळे शाळेत अडचणी, नातेसंबंधांमधील अडचणी आणि जीवनाचा आनंद कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. सर्वात वाईट बाब म्हणजे, नैराश्य आत्महत्येस कारणीभूत ठरू शकते, जे जगभर किशोरवयीन मुलांसाठी मृत्यूचे मुख्य कारण आहे. आपल्याकडे त्याबाबत जन जागृती म्हणावी तेव्हढी झालेली नाही, समुपदेशक असून सुध्दा त्यांचा वापर करून घेतला जात नाही.
डिप्रेशन हा एक आजार आहे ज्याची अनेक कारणे आणि अनेक प्रकार आहेत. हे मनोचिकित्सा आणि / किंवा औषधोपचारांद्वारे उपचार करण्यायोग्य आहे, म्हणूनच पालक आणि मुलांना या डिसऑर्डरबद्दल शिक्षण देणे महत्वाचे आहे.
पालकांना कधीकधी किशोरवयीन मुलांमधील नैराश्याची लक्षणे ओळखू येत नाहीत कारण ही विकृती प्रौढांपेक्षा अगदी वेगळी दिसू शकते. नैराश्याने ग्रस्त असलेल्या किशोरवयात आजाराची काही किंवा सर्व चिन्हे असू शकतात:
१. दु: खी किंवा उदास मूड
२. नालायकपणा किंवा निराशेची भावना
३. त्यांना आवडत असलेल्या गोष्टींमध्ये रस कमी होणे.
४. मित्र आणि कुटूंबाकडून माघार.
५. रडणे
६. झोप न येणं किंवा जास्त झोपणे.
७. भूक न लागणे किंवा भूक वाढणे
८. अही वेदना उपचारांनी सुध्दा कमी ना होणं.
९. चिडचिड.
१०. पुरेशी झोप घेत असूनही थकल्यासारखे वाटणे.
११. लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता
१२. आत्महत्येविषयी बोलणं किंवा आत्महत्येच्या प्रयत्नांचे विचार करणं.
नैराश्याची अनेक कारणे आहेत. कुणाला नैराश्य येते आणि कुणाला नाही यामागे अनेक कारणे आहेत.
१. एखाद्या प्रिय व्यक्तीचे किंवा पाळीव प्राण्याचे जाणं, घटस्फोट किंवा पुनर्विवाह, जवळील काहीतरी गमावल्यासारखे आघात.
२. सामाजिक / कौटुंबिक परिस्थिती.घरगुती हिंसाचार, अमली पदार्थाचा गैरवापर,
३. दारिद्र्य किंवा कौटुंबिक समस्या यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.
४. अनुवांशिक.
५. वैद्यकीय परिस्थिती.
६. औषधे / ड्रग्स साईड इफेक्ट.
७. आर्थिक, अभ्यास, पालकांचा दबाव.
८. हार्मोन मधील बदल.
९. भांडणं. त्यांची टिंगल टवाळी होणं.
नैराश्याची लक्षणं दिसल्यास काय पालकांनी काय करावं याबाबत माहिती असणं आवश्यक आहे.
१. मुलांना आणि पालकांना उपलब्ध असलेल्या उपचार पर्यायांबद्दल शिक्षित करणे.
२. मुलांच्या सवयी व त्यांची दिनचर्या यांचे निरीक्षण करणं.
३. मुलांना बोलतं करून, प्रश्न पहा व समुपदेशन नक्की घ्या.
४. कदाचित मुलं आपल्या मुळे तर निराशेत नाही ना याची तपासणी करणं गरजेचे.
५. सकारात्मक बोलून त्यांचा विश्वास प्राप्त करणं.
६. मुलांचे डॉक्टरकडून पूर्ण चेक उप करून घेऊन उपचार.
७. स्वतः समुपदेशन घेणे.
नैराश्य मुलांना पुढे जाऊ देत नाही. कित्येकदा त्याचा उपयोग योग्य केल्यास, प्रेरणा म्हणून सकारात्मकतेने पाहता येईल. परंतु नेहमीच घडत असेल तर मात्र वेळीच त्यावर उपाय करणं शक्य आहे.
आता पालक बऱ्यापैकी सजक आहेत आणि मुलांना व्यवस्थित हाताळताना दिसतात परंतु मुलं पुढे जाऊन स्वतः त्रास करून घेतात. म्हणून त्यांच्या कडे लक्ष देणे आवश्यक.
©श्रीकांत कुलांगे
9890420209