मागील आठवड्यात काही ठिकाणी भेटी दिल्या आणि काही अविस्मणीय व्यक्तींशी संपर्क आला. भावनिक जागरूकता याबाबत चर्चा झाली. त्यातून खुश राहणं काही लोकांना का जमत नाही किंवा का राहावं यावरून मस्तपैकी गप्पा रंगल्या.
सर्वात पहिले एक वयस्कर गृहस्थ म्हणाले की काही लोकांना खुशी का मिळत नाही. अर्थात हसून आम्ही सर्वांनी त्या कारणांना समर्थन दिले.
१. खुषीची अॅलर्जी. कितीही सुंदर क्षण आले तरी त्यांना त्यातून त्रास दिसतो.
२. अतिरेकी विचार. फक्त छळ करण्याची वृत्ती.
३. बेरकी स्वभाव. चांगलं सहन न होणे.
४. औषधांचा, अमली पदार्थांचा मनावर झालेला परिणाम.
५. मानसिक रोगी. विचित्र मनोवृत्ती.
६. स्वतःचे विचार लादण्याचा प्रयत्न.
७. घरातील वातावरण.
८. लहानपणी झालेले चुकीचे संस्कार आणि तदनंतर झालेली वाढ. त्यातून खुषीला दुय्यम स्थान.
९. चुकीचे सल्लागार व मित्रमंडळ किंवा गुरु.
१०. दुसऱ्यांना समजून न घेण्याची क्षमता आणि बचपना.
११. असहनशीलता व असुरक्षितता.
१२. चांगले नातेसंबंध नसणे.
१३. मेंदूवर अनावश्यक विचारांचा प्रभाव.
आम्ही अगदी हसून त्यांच्या विचारांचा आदर करीत यावर काय उपाय असू शकतात ज्याणेकरून अशा व्यक्ती आयुष्यात स्वतः व इतरांना सुखी व खुश/आनंदी ठेऊ शकतात.
१. सर्वात प्रथम, मनाची वैचारिकता बदल अपेक्षित. सुख या शब्दाची व्याख्या समजणं. त्यासाठी गुरु बदलण्याचा विचार आवश्यक.
२. आपल्याकडे असलेले आशीर्वाद आणि मिळालेल्या संधी याबद्दल नेहमी आभारी राहणं.
३. स्वत: ला जाणून घेण्याचा आणि समजण्याचा प्रयत्न करणे.
४. आपल्यासाठी सुंदर आयुष्य काय आहे यावर कार्य करण्याचा प्रयत्न.
५. आपले सुंदर जीवन जगण्याच्या दिशेने बदल करणे सुरू करणं शक्य आहे यावर विश्वास.
६. गरजूंना मदत केल्याने आनंद मिळतो व तो निरंतर ठेवल्यास छान झोप येते. यातून खुशीचा मार्ग नक्कीच निघेल.
७. क्षमा करण्याचा सराव. खरंच निराश व्हायचं नसेल तर हा मार्ग नक्कीच फॉलो करायला हरकत नाही.
८. गोष्टींकडे नव्या दृष्टीकोनातून पाहिल्यास मनस्ताप होणार नाही.
९. आपल्या विचारात अधिक लवचिकता ठेवल्यास इतरांना दुःख देण्याचा विचार निर्माण होत नाही.
१०. वाईटपेक्षा चांगली अपेक्षा ठेवल्यास छान.
११. जेंव्हा आपण खुश राहतो तेंव्हा जग सुंदर दिसते. त्यातून वैफल्य, उदासीनता, चिंता दूर पळून जातात.
१२. समुपदेशन आणि ध्यान धारणा, नित्य व्यायाम. चांगली संगत व आहार प्रेरणा देते.
१३. अमली पदार्थ आनंद देतात या फसवी जाहिराती आणि वास्तव यातील फरक समजून घेणे.
चांगल्या सवयी अंगी असणे हे आपल्या सभोवतालच्या वातावरण आणि संस्कार यावर अवलंबून असले तरी ते आपण योग्य प्रकारे हाताळू शकतो. नसलेल्या चांगल्या सवयी शोधून त्यांना दोस्त बनवलं तर आयुष्यात खुशी आणि मानसिक शांती कायम राहील हे आपण पाहत आलो आहोत. तर मग नक्की ठरवा की काय हवं आणि त्यानुसार प्राथमिकता दिल्यास अशक्य गोष्टी साध्य व्हायला वेळ लागणार नाही.
©श्रीकांत कुलांगे
9890420209