कालच्या चिंता मंथन कार्यक्रमात लोक काय म्हणतील यावर बरीच चर्चा झाली. अगदी जुनाट विषयाला हात घालण्यात काहीच अर्थ नव्हता तरीसुद्धा आम्ही इतरांना या चर्चेत सामावून घेऊन त्यांच्या अनुषंगाने विविध प्रश्न विचारून माहिती घेतली व त्यांना या समस्येला काय म्हणतात याबाबत माहिती पुरवली. यालाच आपण सामाजिक चिंता विकार म्हणतो व असं का होतं यामागे कारणे आहेत.
१. कौटुंबिक पार्श्वभूमी, कुटुंबातून अशा विकाराची सुरुवात.
२. मेंदूचे अनेक भाग भीती आणि चिंता मध्ये गुंतलेले असतात, त्याचा परिणाम.
३. इतरांच्या वर्तनाचा गैरसमज करून घेतल्याने सामाजिक चिंता उद्भवू शकते. उदा.विनाकारण शंका घेणं.
४. अविकसित सामाजिक कौशल्ये हे सामाजिक चिंतेत आणखी एक संभाव्य कारण आहे.
५. लहानपणापासून इतर लोकांची काय रिअँक्शन असेल अशी चिंता करणं व अशीच वृत्ती बनणे.
६. काही सामाजिक घटनांमुळे न्यूनगंड निर्माण होतो की लोकं माझ्याबाबत काहीतरी बोलत आहेत.
७. आर्थिक, मानसिक व शारिरीक परिस्थिती.
अर्थात या विकारावर अनेक प्रकारचे संशोधन झाले असून उपचार उपलब्ध आहेत याची कल्पना मंथन कार्यक्रमात दिली. संपूर्ण सफलता प्राप्त करण्यात सर्वांत मुख्य अडथळा म्हणजे ‘भय…’ ‘लोक काय म्हणतील’ याची भीती. या भीतीमुळे माणूस मोकळेपणानं जीवन जगू शकत नाही. काय उपाय असू शकतात याबद्दल चर्चा झाली.
१. लोक काहीतरी म्हणतच राहतील, तरीदेखील आपले कार्य चालू ठेवायचा प्रयत्न.
२. लोक तर बोलतीलच पण तरी आपण या भीतीला सामोरं जाणं. समुपदेशन याठिकाणी कमी येतं.
३. दररोज रात्री झोपताना स्वतःला काही सूचना द्या. या स्वयंसूचना तुमच्या मनात दडलेली भीती दूर करण्यासाठी मदत करतील. जसं की ३ इडियट वाला अमीर खान. All is well.
४. ‘मी अपयशी झालो तर… किती नुकसान होईल… मग लोकांना तोंड कसं दाखवणार?’ पण अशा प्रकारच्या अज्ञानामुळेच बऱ्याचदा अनेकदा अपयश मिळतं.
५. जर आजपर्यंत अपयशच मिळालं असेल, तर यापुढेही अपयशच पदरी येईल, हा भ्रम मनातून पूर्णपणे काढून टाकणं.
६. जर एखाद्या कार्यात अपयश मिळालं असेल, तर तुमची कार्यशैली त्वरित बदला.
७. ‘होकारात्मक’ ही भावना इतकी सामर्थ्यशाली आहे, ज्यामुळे अनेक प्रकारचं भय आपल्यापासून चार हात दूर पळतं.
८. वायफळ लोकांपासून व चर्चेला रामराम ठोकावा.
९. शिक्षणाचा वापर.
समाजात वायफळ बडबड करणारे अनेक लोक आहेत. हे तथाकथित ज्ञानी, काम कमी आणि बडबडच जास्त करतात. कारण ते स्वतःही काही करत नाहीत आणि दुसरा एखादा चांगलं काही करत असेल,तर ‘हे अशक्य आहे… खूप कठीण आहे… हे होऊ शकणार नाही…’ असं म्हणून मनोबल खच्ची करतात.जणू लोकांना भयभीत करणं हेच यांचं काम असतं. आपण अशा लोकांच्या मताला किंमत देऊ नये. निर्भय भविष्याकडे वाटचाल सुरू करून स्वतला आत्मनिर्भर करुया.
©श्रीकांत कुलांगे
9890420209