अधिक प्रभावी शिकणारा कसं व्हावं यासाठी काही विद्यार्थी कार्यक्रमात विचारत होती आणि हा त्यांचा प्रश्न अतिशय गहन व सुरेख होता. किती जण असा विचार करू शकतात? आपले शिकणे प्रभावी व्हावे याबद्दल खूप कमी जागरूकता आहे.
एक प्रभावी आणि कार्यक्षम विद्यार्थी बनणे ही एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही, परंतु काही बदल रोजच्या सरावात ठेवल्याने अभ्यासाच्या वेळेचा अधिकाधिक फायदा होईल.
१.मेमरी वाढविण्यासाठी मूलभूत गोष्टींचा वापर करणे. आपले लक्ष सुधारणे, पाठांतर टाळणे आणि आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक ही सुरुवात आहे. परंतु याव्यतिरिक्त अनेक बेसिक गोष्टी आहेत.
२.नवीन गोष्टी शिकणे (आणि सराव करणे) सुरू ठेवल्यास प्रभावी उपाय.
३.एकापेक्षा अधिक मार्गांनी माहिती जाणून घेतल्यास लक्ष केंद्रित होण्यास मदत.
४.दुसर्या व्यक्तीला आपण काय शिकलात ते शिकवने, ग्रुप मध्ये चर्चा कारणे.
५.नवीन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी मागील शिक्षणाचा उपयोग केल्यास कुठलीही माहिती प्रभावीपणे समजते. थोडक्यात जुनी व नवीन माहितीचे विश्लेषण.
६.व्यवहारिक अनुभव मिळवल्यास जे शिकलो त्याचा वापर कुठे व कसा होतो हे समजते
७.लक्षात ठेवण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा उत्तरे शोधल्यास चांगले. समजून घेऊन लक्षात घेऊन फायदा.
८.आपण उत्कृष्ट कसे शिकता ते समजून घेऊन तोच मार्ग पुढे वापरणे.
९.वेळोवेळी चाचण्या, परीक्षा दिल्या तर लक्षात ठेवण्यास मदत होते.
१०.एकाच वेळेस अनेक विषयांवर काम करणे टाळल्यास उपयोग होतो.
११.स्वच्छता, उपयुक्त अभ्यासिका, वातावरण आणि ध्यान धारणा प्रभावीपणे शिकण्यास प्रवृत्त करतात.
१२.जे शिकलो त्याबाबत आई बाबांशी चर्चा.
अधिक प्रभावी शिकायला शिकण्यास वेळ लागू शकतो आणि नवीन सवयी प्रस्थापित करण्यासाठी नेहमीच सराव आणि निश्चय करावा लागतो. त्यात सातत्य आणि आवड निर्मिती महत्वाची. अनेक संशोधनं याबाबत झाले आहेत. फक्त चांगले शिक्षक, शाळा, क्लासेस, इत्यादी महत्वाचे नसून आपला दृष्टीकोन शिक्षण घेण्यासाठी कसा आहे, तो महत्वाचा. तो सकारात्मतेने ठेवला तर प्रभावी शिक्षण प्रणाली विकसित होते.
©श्रीकांत कुलांगे
9890420209