सुमनचा प्रश्न तसा पाहिला तर सोपा होता. मला मानसिक आजार झालाय हे कसे समजणार?
अपेक्षित वर्तन काय आहे आणि मानसिक आजाराची लक्षणे काय असू शकतात यामधील फरक सांगण्याचा प्रयत्न करणे नेहमीच सोपे नसते. अशी कुठली सोपी चाचणी नाही जे असे काही सिद्ध करू शकेल. कारण वागणूक आणि विचारधारा अनेकदा वेगळ्या असतात, राहणीमान, भौगोलीक परिस्थिती, आपली विचारसरणी ठरविते.
प्रत्येक आजाराची स्वतःची लक्षणे असतात, परंतु प्रौढ आणि किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आजाराची सामान्य चिन्हे खालील प्रमाणे असू शकतात:
१. जास्त चिंता किंवा भीती
२. जास्त दु: खी किंवा काहीतरी कमी असल्याची भावना.
३. संभ्रमित विचार किंवा लक्ष केंद्रित करणे आणि शिकण्यात समस्या
४. मूड किंवा मनःस्थिती अचानक बदलणे.
५. चिडचिड किंवा रागाची प्रदीर्घ किंवा तीव्र भावना.
६. मित्र आणि सामाजिक कार्यक्रमात सहभागी न होणे.
७. इतर लोकांना समजून घेण्यात समस्या. संशयास्पदपणा, वेडसर कल्पना किंवा इतरांबरोबर राहण्यात अस्वस्थता.
८. झोपेच्या सवयी बदलणे किंवा थकल्यासारखे आणि कमी उत्साह वाटणे.
९. भूक वाढणे किंवा भूक न लागणे यासारख्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल
१०. सेक्स ड्राइव्हमधील बदल
११. आत्महत्या बद्दल विचार.
१२. दैनंदिन कार्य करण्यास असमर्थता किंवा दैनंदिन समस्या आणि तणाव हाताळणे कठीण जाते.
१३. स्पष्ट कारणांशिवाय अनेक शारीरिक आजार (जसे की डोकेदुखी, पोटदुखी, अस्पष्ट आणि वेदना).
१४. वास्तव समजून घेण्यात अडचण.
१५. ग्रेड किंवा नोकरीच्या कामगिरीमध्ये चिंताजनक घसरण.
लहान मुलांमध्ये मानसिक आरोग्याचे प्रश्न दिसून येतात. कारण मुलं या वयात सभोवतालच्या वातावरणातून कसं वागावं हे शिकत असतात. त्यांच्यात काही लक्षणं दिसू शकतात.
१. शाळेच्या कामगिरीत बदल
२. अत्यधिक काळजी किंवा चिंता, उदाहरणार्थ वेळेवर झोपणे किंवा शाळा टाळण्यासाठी टाळाटाळ.
३. हायपरॅक्टिव वर्तन.
४. वारंवार स्वप्ने पडणे.
५. वारंवार नियमांचे उल्लंघन किंवा आक्रमकता
६. वारंवार स्वभाव बदल.
अशी अनेक लक्षणं जी सामान्यतः दिसल्यास मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतली जाऊ शकते. काही लक्षणं आपल्याला आहेत हे ध्यानात येत नाहीत परंतु घरातील अन्य व्यक्ती त्या पाहू शकत असतील, किंवा मित्र सांगत असतील तर नक्कीच कुछ तो गडबड हैं अस समजून घ्या. ठराविक लक्षणे दिसल्यास काही गोष्टी करू शकतो.
१. मानसोपचारतज्ज्ञ निदान करू शकेल म्हणून भेटून उपाय करणे.
२. खोल श्वासाचे व्यायाम, योगाभ्यास.
३. काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतात. शक्य असेल तर छान.
४. प्रत्येक गोष्टीला नकाराचा चष्मा नको.
५. हास्यविनोद बुध्दी.
६. Sharing is caring. बोला मनातल्या भावना जवळच्या माणसाबरोबर.
७. आवडत्या गोष्टीत मन हलके होते. बाईक राईड, निसर्गरम्य ठिकाण हमी देते मानसिकता बदलण्याची.
८. काही लक्षणं ढगासारखी सारखी असतात. येतील आणि जातील.
९. मला आज जगायचंय, बाकी गेले उडत असा काहींचा बिनधास्त स्वभाव मला कधीतरी भावतो.
आपले विचार कुठेही सकारात्मक असतील तर मुलं, शेजारी, मित्रपरिवार आणि शेवटी समाजाकडे पाहण्याची दृष्टी नेहमीच चांगली असते, हे ज्यांच्या ध्यानात आले, त्यांना मानसिक आजार जडण्याची शक्यता नाही. म्हणून मस्त जगा आणि मानसिक आजाराला कायमचा बायबाय करा.
©श्रीकांत कुलांगे
9890420209