सोनाली आणि प्रदीप लग्न होऊन दीड वर्ष होऊन सुध्दा एकमेकांच्या मनात स्थिर झालेले नव्हते. कळत नकळत बोलल्या गेलेल्या शब्दांना पकडून, त्याचा अनर्थ होऊन संबंध बिघडत चालले होते, म्हणून समुपदेशन घेण्यास त्यांनी सुरुवात केली.
शब्द सामर्थ्यवान असतात आणि त्यांचा उपयोग आश्चर्यकारक चांगले संबंध निर्माण करण्यासाठी किंवा कधीकधी संबंध नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. आपल्या जोडीदारास कधीही काही बोलताना नीट विचार करून बोलावे आणि खालील गोष्टी तर कधीच बोलू/करू नयेत.
१. तू वेडा/वेडी आहेस.
२. अबोला.
३. ही तुझीच चूक आहे.
४. “तु नेहमीच….”किंवा “तू कधीच…”
५. टीका, अस्पष्ट आणि अवास्तव विनंत्या आपल्या जोडीदाराला निराश करून परिस्थिती आणखी तीव्र करू शकतात.
६. आपल्यातील बोलणे कुणाला सांगितले तर मग बघ!!
७. “घटस्फोट” शब्द रागाच्या भरात / भांडणात म्हणणे.
८. आपल्या जोडीदाराची तुलना कोणाशी तरी करणे.
९. मानसिक छळ होईल असे बोलणे
१०. अवास्तव, महत्त्वहिन गोष्टी जोडीदाराला सांगणे.
११. म्हणूनच माझ्या घरातील व्यक्तींना, आईला तू आवडत नाहीस.
नवरा बायकोच्या संबंधांमध्ये योग्य नाते टिकवायचे असतील तर शब्द विचारपूर्वक वापरले नाही तर नाते तुटण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच शब्द जपून वापरा.
१. जोडीदार बोलला तर सांभाळून घ्या. नजरचुकीने तोंडातून शब्द निघतात व ते अनेकदा होतं. दुर्लक्ष केलेले चांगले
२. शांत स्थिती झाल्यावर चर्चा केल्यास सकारात्मक संदेश दिला जातो.
३. धमकी देऊन समोरील व्यक्तीला बोलणे आता चालत नाही. त्यामुळे आदरयुक्त भीती असल्यास फायदा होतो.
४. बोलण्याची पद्धत चुकीची असेल तर माफी मागून मोकळे झालेले बरे.
५. आलिंगन, प्रेमाची थाप नात्यात शास्वत स्थिरता आणते.
६. नाते तोडण्याची भाषा सोपी असते पण नको त्या लहान सहान गोष्टींवरून नको.
७. सून / पत्नी / नवरा/ सासू व सासरे यांना सन्मानाने वागणूक देणे एकमेकांचे कर्तव्य समजले तर घटस्फोट होणार नाहीत.
८. सहनशक्ती संपुष्टात येत असेल तर समुपदेशन घेणे आवश्यक कारण कुटुंब व्यवस्था टिकवण्यात गृहिणीची भूमिका महत्वाची असते.
एक महत्वाची गोष्ट यामध्ये असते ती म्हणजे खरंच का भांडणाचे कारण योग्य आहे? उगीचच टाईमपास मधून एकमेकांना दुखावण्यात काय मजा असते? त्याचा त्रास होतोच…
१. घरातील ज्येष्ठांना विनाकारण त्रास.
२. आर्थिक व भावनिक हानी.
३. कामावर परिणाम.
४. चिंता व आरोग्यावर परिणाम.
५. सामाजिक परिणाम.
६. भविष्याची काळजी.
७. विनाकारण शंका वाढण्यास मदत.
८. मानसिक आजार व त्यातून आत्महत्येचा विचार.
जोडीदार एकमेकांना समजून घेऊ लागल्यास प्रपंच प्रगतीपथावर राहतो. स्वभाव वेगवेगळा असू शकतो म्हणून वैवाहिक जीवनात सहकार्य आलेच. वाईट गुण असतात पण त्यांना सकारात्मकतेने तोंड दिल्यास, वाद निर्माण होत नाही. विश्वास आणि आदर निर्माण करावा लागतो, म्हणून शब्द आणि प्रपंच जपून केल्यास आयुष्य सुरळीत होईल.
©श्रीकांत कुलांगे
9890420209