आपल्या कुटुंबात चांगले संबंध, संवाद सर्वांना हवेसे असतात. परंतु आजकाल बहुतेक कुटुंबात काहीतरी चुकतंय याची जाणीव मला होतेय. बरेच हेल्पलाइन कॉल कौटुंबिक समस्यावर आहेत. विशेषतः मुलांवर होणारे परिणाम जास्त धोकादायक असतात हे माहीत असून सुद्धा कुटुंबप्रमखाची भूमिका नकारात्मक दिसते. अर्थात तसे कारणे सुध्दा असावीत. परंतु कुटुंबात निरोगी संबंधाचे महत्त्व अधिक हवे. त्यामुळे चांगले परिणाम होतात.
१. हे मुलांच्या आवाजात, भावनिक आणि बौद्धिक विकासास मदत करते. घरातून प्रेम व सुरक्षा यांची जाणिव सुरू होते.
२. शिकणे, खाणे, झोपणे यासारख्या मुलांच्या वर्तनात्मक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होण्यास मदत करते.
३. कुटुंबातील नैसर्गिक बंधनामुळे प्रश्न किंवा विघ्न यांना तोंड देणे आणि त्यावर मात करणे अधिक सोयीस्कर होते.
४. कर्तव्ये पार पाडण्याचे आणि वचनांचे पालन करण्याचे मूल्य शिकवून मुलांना जबाबदारीची भावना वाढविण्यात मदत करते.
५. घरातील वातावरण सुदृढ असेल तर मानसिक व शारिरीक आजार कमी होतात.
६. कुठलेही तणाव व्यवस्थापन व्यवस्थित होते.
७. चांगली संतती होण्यासाठी निरोगी विचार असलेले कुटुंब खूप मोठी भूमिका निभावत असते.
अनेक फायदे असूनही विसंवाद होत असतील तर मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एका सर्व्हेतून काही मुद्दे समोर आले जे कुटुंबातील सदस्यांमधील संवाद सुधारू शकतात.
१. भावनांना सोप्या शब्दात व्यक्त करा जे समजण्यास सोपे असतील आणि गोष्टी स्पष्ट करतात.
२. सर्व परिस्थितीत शंका दूर करण्यासाठी भरवश्यावर जोर दिल्यास शंका निरसन होऊ शकते.
३. प्रामाणिक आणि मोकळेपणा सर्वात महत्त्वाचे आहे. सर्व परिस्थितीत तोडगा शोधण्यात मदत होते.
४. विश्वास टिकवून ठेवण्यासाठी आणि निरोगी नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आपण मनापासून असणे अपेक्षित.
५. सर्वांनी मनापासून, लक्षपूर्वक एकमेकांना ऐकणे महत्वाचं.
६. लहान लहान गोष्टींना अतिमहत्व न देता आपली कामे चालू ठेवली तर लक्ष विचलित होणार नाही.
७. घरातील ज्येष्ठ मंडळी कित्येकदा मनासारखं ऐकत नाही म्हणून न रागावता, सबुरीने घ्यावे लागते हे लहानांना शिकवणं गरजेचे.
८. स्त्रियांना सन्मान व आदर देणे अतिशय सुंदर कारण त्यांनी चांगल्या मनाने जेवण बनवले तर ते अंगी लागते.
९. बाहेरील राग बाहेरच ठेवल्यास इतरांची मनःशांती भंग होत नाही. त्याबाबत इतर वरिष्ठांशी चर्चा शक्य आहे.
१०. एकत्र योगा, मेडीटेशन, व्यायाम केल्यास लहानांना सवय लागेल. छंदांची जोपासना मदत करते.
घरात निरोगी संवाद ठेवणे ही सर्वांचीच जबाबदारी असते. त्यातूनही कुणीतरी एकाने जागरूक राहुन याबाबत पुढाकार घेतला तर गोष्टी सोप्या होतील. घरातील चिडचिडमुळे मानसिक स्वास्थ्य नेहमी बिघडेल. त्याचे दुष्परणामही घातक असतात. आर्थिक व कौटुंबिक समस्या वाढीस लागतात म्हणून वेळ वाया न घालवता, माफी मागून, माफ करून तंटे सोडविल्यास आयुष्यातील नैराश्य दूर पळविण्यासाठी तुमचे प्रयत्न सार्थकी लागतील.
©श्रीकांत कुलांगे
9890420209