मित्रांबरोबर गप्पा मारताना मी सहज विचारले की आपण खरोखर किती वेळा रोज मनापासून स्मितहास्य करतो. सगळेच अवाक! कारण खरेच कुणी त्याकडे ध्यान दिलेच नव्हते. एक सहज क्रिया जी नैसर्गिक आहे आणि ज्यामुळे आपला चेहरा आपल्याला व इतरांना पहावासा वाटतो. हसत हसत वागण्यामुळे आपल्या मनःस्थितीत असंख्य घडामोडी होत असतात. असं असूनही कित्येकजण हसायला का विसरतात?
१. रोजची तकतक अर्थात मीच फक्त काम करतो आणि जगाचा भार माझ्याच डोक्यावर अशी धारणा.
२. सभोवतालचे वातावरण – सध्याच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य नीट नाही.
३. स्वभाव – नैसर्गिक हास्य दुर्मिळ.
४. कठोर जीवनाचे किंवा आतापर्यंत घडलेल्या घटनांचा परिणाम.
५. मी एकटाच हसलो तर विनाकारण गैरसमज होऊ नये म्हणून.
६. विसरणे – हसणे हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे याचा विसर पडणे.
७. मानसिक आजार व शारीरिक व्याधी.
८. माहितीचा अभाव – हसल्यामुळे होणारे फायदे माहिती नाहीत.
हास्याचे कारंजे कसे नकळत फुलले पाहिजेत. कारण जसे दुःख आपल्या पाचवीला पुजलेली असतात तसेच देवाने त्यावर हास्याचा रामबाण उपाय पण दिलाय. दुःखाला आपलेसे करतो पण हस्याला नाही. या नैसर्गिक क्रियेला सांभाळले तर चांगले फायदे होतात.
१. हसण्यामुळे आपण आकर्षित दिसतो. जगभरात वेगळ्या वर्णाची, व्यंगाची माणसे फक्त एक हास्याने आपल्याला एकत्रित आणतात.
२. हसतमुखामुळे ताणतणाव दूर होतो.
३. स्मित हास्य आपल्या मनाची भावना वाढवते किंवा मूड संतुलित करते.
४. हसणे संक्रामक आहे म्हणजे आपल्या हसण्यामुळे इतरांचा मूड बदल होतो, तेही हास्यात सामील होतात. फक्त बाहेरीलच नाही तर शरीरात सुद्धा चांगले बदल घडतात.
५. हसण्याने इम्यून सिस्टम वाढवते. आजकाल खूप गरजेची झालीय!!!
६. जेव्हा आपण हसतो तेव्हा आपला रक्तदाब कमी होतो. बघा चेक करून.
७. अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की हसल्यामुळें मेंदूत एंडोर्फिन, नैसर्गिक पेनकिलर आणि सेरोटोनिन रिलीझ होते. हे तीन न्यूरोट्रांसमीटर एकत्रितपणे आपल्याला डोके ते पायापर्यंत चांगल्या फिलिंग ची अनुभूती देतात.
८. हसण्यामुळे आपण तरुण दिसतो. लेडीज, याकडे लक्ष द्या…
९. जे लोक नियमितपणे स्मित करतात त्यांच्यात अधिक आत्मविश्वास दिसून येतो, त्यांच प्रमोशन होण्याची शक्यता असते व इतर पटकन दोस्ती करतात. तसेही खडूस व्यक्ती सगळीकडे नकोशी असते.
१०. हसण्यामुळे सकारात्मकता येते. एक काम करा, हसता हसता, न थांबता, एखादा नकोसा विषय काढा..नाही ना शक्य?
वरील गोष्टी आपल्या सर्वांना नवीन नाहीत तरीपण चेहऱ्यावर हास्य कमी व उद्याच्या काळज्यांचे ओझे व त्यामुळे पडलेल्या अकाली सुरकुत्या जास्त दिसतील. COVID सारख्या रोगाने तेच सांगितलेय, आज जगा…हसा आणि हसुद्या कारण हेच जीवन आहे. नकारात्मकता ही फसवी असते असे आमचे सर नेहमी सांगायचे आणि मी तरी विश्वास ठेवला. त्यातून एक प्रगल्भता येते व हस्यासमावेत रोजचे जगणे सुसह्य होऊ शकते.
©श्रीकांत कुलांगे
9890420209