आज मित्राबरोबर तडजोड या विषयी चर्चा झाली. ६० वर्षाच्या या गृहस्थाने चक्क सांगितले की आतापर्यंत रोज तडजोड करत आलोय आणि जोपर्यंत राहील तोपर्यंत ती करावीच लागेल. तडजोड ही एक निरोगी व आनंदी नात्यांमध्ये असणारी कडी असते हे मला त्यांना समजावे लागले. कारण तडजोड ही आपल्या मानसिकतेचा भाग असतो. त्या विषयाबद्दल आपण माझ्या YouTube चॅनेलवर अधिक पाहू शकता. पण काय होते जेंव्हा आपण तडजोड करतो?
१. चांगली तडजोड नाते सुधारण्यास मदत करते. एकसंघ भावना निर्माण होते.
२. वाईट तडजोड (त्याग) नात्यांमध्ये कटुता आणि असंतोष निर्माण करते.
३. कुठलीही तडजोड विचार करून केली तर कौटुंबिक व आर्थिक नियोजनचा आधार भक्कम बनतो.
४. आपल्या नात्यात एक विश्वास, जबाबदारी, सुसंगतता आणि सुरक्षितता वाढवतात.
५. तडजोड एकत्रितपणे केली तर लक्ष्य गाठण्यासाठी मदत करते.
६. तडजोड स्वार्थी नसते म्हणून आनंद सर्वांनाच होतो.
तडजोड ही कित्येकदा कुटुंबातील एखाद्याला करावी लागते. ती तडजोड कुठे व कशी किंवा किती असावी हे व्यक्तींवर व वेळेवर अवलंबून असते. तडजोड करणाऱ्या व्यक्तीची मानसिकता वेगळी असते.
१. तडजोड करणारी व्यक्ती जबाबदाऱ्या स्वीकारते. कित्येकदा सकारात्मतेने, परंतु कुटुंबीयांनी नकारात्मक राहुन त्याची अवहेलना केली तर मानसिक त्रास होतो.
२. सगळ्या मानसिक त्रासातून जाऊन इतरांना मदत करतात त्याचे समाधान वाटते.
३. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ते करायचं असतात.अपेक्षा असते ती इतरांनी त्याची जाणीव ठेवण्याची.
माझ्या या मित्राला हीच खंत होती का ते माहीत नव्हतं. परंतु स्वतःच्या गरजा व तडजोड यांचं संतुलन कसे करू शकतो?
१. संसारात भांडण करताना, एक जण टोकाची भूमिका घेत दुसऱ्याने तडजोड करणे अपेक्षित.
२. आर्थिक तडजोड- खरंच वस्तूंची गरज आहे का किंवा व्यवस्थापन नीट करण्यासाठी काळजीपूर्वक लक्ष दिल्यास फरक पडतो.
३. छंद- कुटुंबात, मैत्रीत छंद वेगेवेगळे असतात परंतु त्याचे होणारे परिणाम नातेसंबंध डिस्टर्ब तर करत नाहीत ना, वेळेचे व्यवस्थापन व तडजोड पुन्हा आलीच.
४. शिक्षणाबाबत तडजोड- आवड असेल तर योग्य निर्णय घेऊन पुढे जाता येते. मनाविरूद्ध घेतलेले निर्णय कित्येकदा आर्थिक व मानसिदृष्ट्या त्रासदायक तडजोडीचे असतात.
५. घरातील मुलांशी वागणूक ही सुद्धा तडजोड असते.
६. नातेसंबंधांची पुनर्बांधणी करण्यासाठी तडजोड महत्वाची.
शेवटी आयुष्यात आनंद अत्यंत महत्वाचा.तडजोड म्हणजे माणुसकीचे आणि आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, मित्रांसाठी, स्वसमाधान मिळवन्यासाठी केले तर ती विकलांगता ठरत नाही. परंतु त्याचवेळेस, तडजोडीला कुणी बळजबरीने किंवा एखाद्याच्या फायद्यासाठी, एखाद्याच्या चांगल्या मनाचा गैरवापर केला तर मात्र तडजोडीला अर्थ राहत नाही. म्हणून काळजी घेतली तर खूप छान.
@श्रीकांत कुलांगे
9890420209