अभ्यासक्रम बदलणार म्हणून बऱ्याच बोलक्या प्रतिक्रिया ऐकायला येत आहेत. लोकशाही मध्ये आपण आपले विचार प्रकट करण्यासाठी आडकाठी नाही परंतु बदल का गरजेचे आहेत हे कुठेतरी चेक करायला हवेत. बदल हा जीवनाचा आवश्यक भाग आहे. परिवर्तनाशिवाय जीवन नाही. आपल्यातील बहुतेकांना स्थिरता हवी असूनही आपल्या जीवनात चांगले व वाईट दोन्ही बदल होतात, काही बदल आपण करतो किंवा काही आपल्यावर थोपवले जातात. सर्वसाधारण समाज बदल स्वीकारायला तयार नसतो असे का होते:
१. राजकारण आणि समाजकारण. दबावतंत्र..
२. नकळत वाटणारी भीती की उद्या काय होणार..
३. नाविन्य स्विकारण्याची मानसिकता नसणे. अविश्वास. नैराश्य.
४. शारीरिक प्रकृतीमुळे विरोध.
५. अहंकार दुखावला म्हणून नकार.
६. पुरेश्या माहितीचा अभाव.
७. बदलामध्ये माझा विचार घेतला नाही म्हणून राग.
अशी अनेक कारणे आहेत आणि ते काही अंशी योग्य म्हटले तरी चालेल. व्यक्ती तितक्या प्रकृती, काही मान्य तर काही अमान्य करणार. तरीही या बदलाकडे सकारात्मकतेने पाहिले तर काय चांगले घडू शकते…
१. करिअर – बदल कदाचित आपल्या करिअर मध्ये चांगले दिवस आणु शकतो. प्रेरणा म्हणून पाहिले तर समजेल.
२. क्षमता – बदल होण्यासाठी आपल्या क्षमता वाढविणे, बदलणे कालानुरूप आलेच. ताकत व मानसिक तयारी गरजेची.
३. बदलाची गरज – गरज लक्षात घेऊन माहिती मिळवली की पुढील स्टेप्स काय असू शकतात म्हणून चाचपणी सुरू करू शकतो. व्यवसायात वाढ.
४. नैसर्गिक गरज- नैसर्गिक म्हणून बदल स्वीकारला तर मानसिक त्रास जाणवत नाही. बदल स्वीकारायला मन तयार होते.
कुठलाही बदल करायचा झाला तर चर्चा आवश्यक. म्हणून शासन, कंपन्या, शाळा, घरातील वडीलधारी मंडळी, सोसायटी, इत्यादी, यांनी करू इच्छिणाऱ्या बदलाबाबत चर्चा करणे अपेक्षित आहे. त्यानुसार बदलामुळे काय चांगले व वाईट घडणार याची माहीत दिली तर विरोध होत नाही. सामंजस्य नेहमी समाजाला चांगल्या प्रतीचे जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. कोरोनामुळे आयुष्यात अनेक बदल वेगाने होत आहेत हे बदल सकारात्मकतेने स्विकारून पुढे चालू या!
© श्रीकांत कुलांगे
9890420209
Very nice Shree…???