शिक्षण असो की कोविड १९, सध्याची परिस्थिती अनिश्चिततेचे वातावरण तयार करत आहे. आता अशा कालावधीत आपण काय विचार करतो ते महत्वाचे आहे. वेगवेगळ्या अनिश्चितता आहेत, वस्तुस्थितीनुरुप व दुसरी भविष्याबाबत ज्या वस्तुस्थितीला अनुसरून नसतात. आणि या दोन्ही अनिश्चितता आपले विचार बदलत असतात. आपण सर्व सध्या या अवस्थेतून जात आहोत. पण शांतपणे विचार केल्यास समजेल की ही आपली एक सवय बनून गेली आहे की भविष्याबाबत शंका घेऊन नसते विचार करणे. इतर काही अनिश्चिततेचे कारणे आहेत जसे की,
१. पूर्ण माहितीचा अभाव.
२. अती जास्त माहिती. ही माहिती अजून कन्फ्युज करते.
३. माहितीचे विवादास्पद स्वरूप.
४. अनेकजण बोलतात म्हणून विश्वास ठेवणे.
५. माहितीचे विश्लेषण नीट न होणे.
६. विषयाचे फक्त मत किंवा एखाद्यानं तयार केलेला भास.
या अनिश्चितता आपल्या शरीरावर व मानसिक आरोग्यावर परिणाम करतात. मूड बदल, नकारात्मक विचार, चिंता, औदासीन्य इत्यादी.
या परिस्थितीत आपण काय करू शकतो ते पाहिले तर विचार पद्धती बदलू शकते.
१. स्वतः वर विश्वास ठेवणे- म्हणजे आपली ओळख काय, काय करू शकतो.
२. भूतकाळातील यश आणि त्याचा “आज” वर झालेला परिणाम, आपण घेतलेल्या निर्णयाबाबत विचार व विश्लेषण केल्यास आत्मविश्वास वाढेल.
३. बातम्यांवर चर्चा व विश्वास किती ठेवायचा ते आपण ठरवायचे.
४. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत त्यावर विचार करण्यापेक्षा पुढील धोरणे आखणे.
५. स्वतःच्या शरीराची, मानसिक आरोग्याची काळजी – मनावर, विचारांवर कंट्रोल. प्रयत्न सुरू ठेवणे.
६. ज्यांच्यावर आपला विश्वास असतो त्याचा सल्ला घेणं गरजेचं.
७. मानसिक सल्लागार समुपदेशन घेणे फायद्याचे.
८. खात्रीलायक बदल करायचे असतील तर, त्यासाठी लागणारे पावलं कसे उचलायचे याबाबत आराखडा तयार करून खंबीरपणे पावले उचलण्याची गरज.
अनेक गोष्टी करू शकतो व त्यासाठी परिपक्व विचारांची साथ हवी. अनिश्चिततेची भीती बाळगायची की तोंड द्यायचे हे वेळेवर अवलंबून असते. यामध्ये पडणार नाही पण म्हणतात की देवावर विश्वास ठेवावा, आणि आपले कर्म करण्यात धन्यता मानली तर नसती डोकेदुखी वाढणार नाही. वेळ एक प्रभावी औषध आहे आणि जेंव्हा COVId सारखी एखादी घटना घडेल तेंव्हा त्यावर उपाय पण सापडतील म्हणून तयारीत रहा पण पॅनिक व्हायची गरज नाही.
© श्रीकांत कुलांगे
9890420209