ज्या ठिकाणी मी काम करतो तिथे बऱ्याच देशांचे कामगार असतात. त्यातून काही तरी कारण काढून काम टाळू इच्छिणारे आणि कसेही करून दिलेले काम पूर्ण करणारी मंडळी आहेत. अशीच परिस्थिती आपल्या कडे सुद्धा दिसते. चायनिज किंवा जपानी कामगारांचे निरीक्षण केल्यास समजेल कि त्यांच्याजवळ दृढनिश्चय असतो टार्गेट पूर्ण करण्याचा. आपल्या कडे थोडा वेगळा वर्ग आहे तो म्हणजे “इतर काम करणाऱ्यांचे काम बघणणारांचा ! थोडक्यात “बघे”. हा वर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असं का होत कि या वर्गाला काही करावेसे वाटत नाही?
काही लोकांना काम करण्यास का आवडत नाही याबाबत कित्येकदा अळशीपणाला जबाबदार धरले जाते. याव्यतिरिक्त इतर अनेक कारणे आहेत जसे कि:
१. स्वतःवर नियंत्रण नसणे. असे लोक सहसा काहीतरी सुरू करतात आणि ते करताना काही अप्रीय अनुभव आल्यास त्यातील इच्छाशक्ती गमावतात. आपण या लायकीचे नाहीत असा न्यूनगंड तयार होणे.
२. आत्मविश्वासाचा अभाव किंवा शंका. कुटुंबातील लहान व्यक्तीला कित्येकदा मोठ्यांशी तुलना केल्याने हा प्रॉब्लेम दिसतो.
३. महत्वाकांक्षी नसणे. काय गरज आहे, किंवा काय होणार हे करून ते करून असे नकारात्मक विचार डोक्यात असणे.
४. जबाबदारीची भीती – स्वतः काम करू शकू कि नाही असे वाटून नेहमी दुसऱ्यांना पुढे करणे.
५. माहितीचा अभाव- शिक्षण घेताना माहितीचा वापर / उपयोग कुठे व कसा करावा हे ना समजणे. स्किल्सची उणीव.
६. इतरांच्या कल्पना चोरी करणे- स्वनिर्मित आयडिया नसतील तर त्यात नवीन करण्याची वृत्ती नाहीशी होते.
७. आर्थिक मदत नाही किंवा शारीरिक व्याधी, काम मिळत नाही असे कारणे पुढे करणे.
८. काम आपल्या लायकीचे नाही म्हणून न करणे.
९. प्रेमभंग, उपेक्षा, निराशा. अल्कोहोल, ड्रग्स, तंबाकू, गुटखा सेवन.
काहीतरी काम करायचे, मग काय करावे हे माहित असून सुद्धा जर त्यासाठी आवश्यक कौशल्य योग्य प्रकारे वापरली तर कदाचित आपली काम करण्याची इच्छा जागृत व्हायला मदत होईल :
१. सर्वात महत्वाचे बिनकामाचे मित्रसंगती कमी करणे, ते एक अडथळा ठरतात.
२. सकारात्मक मानसिकता वाढविण्यासाठी समुपदेशन घेणे -त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली तर फायदा होऊ शकेल.
३. स्वतःची कल्पकता सिद्ध करण्यासाठी मोटिवेशन लागते. आईवडील, भाऊ बहीण, आत्मसम्मान, आजी आजोबा हे सगळ्यात चांगले मोटिवेटर्स असतात.
४. काम करण्याची इच्छा न होण्यामागे काही मानसशास्त्रीय कारणे असतील तर तसे समुपदेशन घेणे.
५. आपल्या शक्तीचा अंदाज घेतला कि कुठले काम आपण करून शकू ते समजेल.
६. अमली पदार्थांचा हळूहळू नायनाट केला तर आपली कामाची पद्धत बदलण्यात आपण यशस्वी होतो.
७. डोक्यात किंवा आपल्या विचारांत सकारात्मकता ठेवली तर आपल्याला रस्ता सापडतोच. कारण तुमची तीच इच्छा असते.
८. स्किल्स नसतील तर शासनाच्या अनेक स्कीम्स आहेत त्याची माहिती घेऊन जॉईन व्हा व शिका. स्वयंपूर्ती ने शिकण्यासाठी, कुणाच्याही हाताखाली काम करून प्रेरणा घेता येते.
९. शारीरिक व्यायामाने आपली मानसिकता काम करण्यास तयार करणे.
अनेक प्रयत्न आपण आपले आयुष्य सुधारण्याकरीता करू शकतो परंतु त्यासाठी मनाची तयारी करावी. जर कुणी तयार होत नसेल तर त्या व्यक्तीला समुपदेशनाची गरज आहे असे समजा. ठराविक थेरपी वापरून समुपदेशक त्या व्यक्तीला पुन्हा मूळ प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करू शकतो. स्वतःसाठी प्रथम मग कुटुंबासाठी प्रयत्न आवश्यक.. प्रयत्नांती परमेश्वर हे खरे आहे. शून्यातून विश्वनिर्मिती करणारे खूप आहेत – बघा प्रयत्न करून….
©श्रीकांत कुलांगे
९८९०४२०२०९
( हा ब्लॉग लेखकाच्या नावासह शेअर करायला हरकत नाही.)
Excellant सर , खरच प्रत्येकाची मानसिकता अशीच झालि आहे. फक्त नौकरी लागे पर्यंत प्रामाणिक, नंतर सोयी नुसार कण करणे ही प्रवृत्ती आहे, आपल्या devotion to वर्क या प्रमाणे सुविधा मिळाल्या पाहिजे याचा विचारच नाही , आपले उत्तरदायित्व , प्रामाणिकपणा हे सगळे लोक विसरून जातात आणि आपले न8इ work place वर लागू करतात,
Thanks for such wonderful write up
Have a nice day