आपल्या बोलण्याचा बऱ्याच वेळा इतरांना त्रास होतो असे आपल्याला जाणवते. साधे बोलणे सुद्धा सुधाला कुणीतरी टोचून बोलते असे वाटायचे. सुधाला प्रत्येकवेळी अशा व्यक्ती तिच्या सभोवताली आल्या कि त्रास व्हायचा. समुपदेशन करताना तिला तिच्या आयुष्यातील घटना जबाबदार होत्या हे कुणीही सांगू शकले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे मुळातच विचार करून व्हायला हवे. कुणाला दुखावेल असे बेजबाबदार वक्तव्य करणे हे आता जरी सगळीकडे दिसून येत असले तरी थोडे तारतम्य आणि विचारपूर्वक केले तर समाजात स्थर्य येईल. अफवा – टाईमपास – वेळ घालवायला केलेला वार्तालाप अशातून बेजबाबदार वक्तव्य बाहेर येतात – नेमका सुधाबाबत हाच एक प्रॉब्लेम होता. आपण कळत नकळत कुणाबाबत त्यांच्या मागे अनावश्यक बोलत असतो हे थांबवायला हवे.
उगीच अनावश्यक बोलल्यामुळे काही तोटे आहेत :
१. अंतर्गत जीवन तसेच बाह्य जीवनातही त्रास होऊ शकतो.
२. वाळीत टाकणे – इतर आपल्याशी बोलणे टाळतात. इतरांकडून होणारी हेटाळणी.
३. निराशामय वातावरणाची निर्मिती.
४. प्रगती होण्यापेक्षा अधोगती जास्त – ध्येय सध्या करताना असंख्य अडथळे.
५. कुटुंब व्यवस्था ढासळणे.
जर थांबवायचे असेल तर अगोदर योग्य व अयोग्य बोलणे काय असते याचा विचार हवा. गॉसिप चांगले आणि वाईट. चांगले असतील तर फायदा होतो पण तो तात्पुरत्या स्वरूपात असेल छान. आपण अनावश्यक गोष्टी – गॉसिप थांबवू शकतो पण त्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतील:
१. आपल्या बोलण्यातून देणारी माहिती – चांगली कि वाईट याबद्दल विचार. चांगली असेल तर विचारपूर्वक कुठे व कशी द्यायची ते ठरवा.
२. प्रसार थांबवा: हानिकारक संभाषण आणि ते कसे टाळावे हे समजायला हवे. जबाबदार व्यक्ती बना.
३. अशा सवयींना लाथ मारा – आपली संभाषणे योग्य तेवढीच असतील तर समाज त्याला मान्यता देतो अन्यथा दूर पळतो.
४. गॉसिप – एक किंवा दोन जबाबदार व्यक्तींमध्ये होत असेल तर ठीक पण उगीच उहापोह नको. (काहींना त्याच्याशिवाय जमत नाही )
५. आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावले गेले असेल तर लगेच माफी मागणे – कदाचित समोरील व्यक्ती शांत होईल.
६. प्रत्येक ऐकीव माहिती खरीच असते असे नाही. शहानिशा करा.
७. एक दिवस गॉसिप करणार नाही असा उपवास केला तर फायदा आहे.
८. नाही म्हणायला शिका – चुकीचे गॉसिप करणारे – उगीच काहीतरी बरळणारे – यांना दूर ठेवले तर अतिसुंदर.
देवाने विचार करायला डोके दिलेय. जरा विचार करून – जाणीवपूर्वक आपली वक्तव्य असतील तर आपली मानसिकता सकारत्मक राहायला मदत होते. कलह, उगीच कुरापती काढणारी मंडळी तुमच्या पासून दूर राहते. याचा फायदा आर्थिक तर आहेच परंतु तो कौटुंबिक आणि सामाजिक अस्तित्वासाठी नक्कीच चांगला आहे. मौन सर्वार्थ साधनांम असे म्हणतात ते उगीच नाही. नसेल जमत तर आनंद वाटेल असेच बोलले तर तुम्ही आवडती व्यक्ती नक्कीच होऊ शकता.
जर तुमचे डोळे सकारात्मक असतील, तर तुम्ही जगावर प्रेम कराल.
जर तुमची जीभ सकारात्मक असेल, तर जग तुमच्यावर प्रेम करेल.
@श्रीकांत कुलांगे
9890420209