लग्नाची पहिली दोन वर्षे इतकी महत्त्वाची का आहेत याबाबत आज मला हे सीमा ला समजून सांगणे गरजेचे होते. गेल्यावर्षी लग्न होऊन सासरी आलेली सीमा वैतागून गेलेली दिसली. विवाहपश्चात कौन्सेलिंग करण्याच्या तिच्या इच्छेबाबत मी तिला धन्यवाद देऊन, तिला ठराविक गोष्टी करायला लावून संसाराची गाडी कशीबशी मार्गस्त केली. पहिल्या दोन वर्षात बऱ्याचदा जोडप्यांमध्ये आपला संसार नीट होईल का याबाबत शंका दिसून येते आणि हे सर्व जगभर होते म्हणून काळजी करण्यासारखे नाही हे सीमाला समजावून सांगितले. मग पहिल्या दोन वर्षात असे काय घडते कि ज्याने करून संसाराची काडीमोड होते कि काय अशी भीती वाटते:
१. हनिमून नंतर ची वास्तवता – नवीन घरी स्थिर होण्याची कसरत व वास्तवता. कुटुंबाची मानसिकता व मतभेद.
२. प्रेम आणि आत्मीयतेचा अभाव – हळूहळू एकमेकांना वेळ देणे कमी होणे.
३. एकत्र फिरण्यास असमर्थता. लग्नाअगोदर व नंतर बराच फरक पडणे.
४. स्वार्थी भावना. जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा.
५. भांडण होण्याची भीती.
६. एकमेकांबाबत आदर नसणे.
७. इतर गोष्टींकडे दिलेला वेळ. अति-वचनबद्धता व न पाळणे.
८. जास्त खर्च त्यामुळे येणार ताण.
९. पालकांवर खूप अवलंबून असणे.
१०. लैंगिक समस्या. एकमेकांना दोष.
११. व्यसन आणि / किंवा पदार्थांचा गैरवापर
१२. भावनिक आणि / किंवा शारीरिक शोषण
१३. खूप तरुणपणी किंवा चुकीच्या कारणांसाठी लग्न केले असेल तर.
बहुतेक विवाहित जोडप्यांना त्यांचे लग्न व नावीन्य याबाबत हळू हळू घट होताना साधारण चौथ्या वर्षी दिसते; सातव्या वर्षाच्या आसपास, तणाव इतका वाढतो की जोडपी एकतर घटस्फोट घेतात किंवा आपल्या जोडीदाराशी जुळवून घेतात.
याव्यतिरिक्त दुसरी जोडपी असतात – नेहमी खुश, ये जिंदगी न मिले दोबारा वाली. येईल त्या प्रसंगांना तोंड देण्याची तयारी. असा का फरक असतो :
१. जबाबदारी घ्यायची सवय.
२. सकारात्मक मानसिकता.
३. लग्न आणि कार्यपद्धती याची माहिती.
४. समाज आणि कुटुंब व्यवस्थेवर विश्वास.
५. स्वतःच्या कुटुंबाकडून मिळालेली शिकवण.
६. जोडीदाराबरोबर समजदार व वैचारिक संवाद.
७. कुटुंबाची साथ.
आजकाल सगळ्या पालकांना, मुले-मुली यांना भीती हीच, कि पुढे काय होईल. सगळे तपासून घेऊन सुद्धा काडीमोड होते. पैसे, इज्जत, मानसिक आघात हे सगळं सोपे नाही. हाडाची काडे, आत्महत्या, भांडणे, मारामाऱ्या, पोलीस आणि शेवटी कोर्ट – मजा वाटते का, कि हा खेळ आहे? पुन्हा नशिबाला दोष देतो. वैवाहिक समायोजन – लग्नानंतर पुढे काय हे घरी मुलं व मुली पाहतात.. मग लग्न झाल्यावर हीच अडजस्टमेन्ट केली तर काही प्रॉब्लेम होत नसतो.
विवाहपूर्व समुपदेशन महत्वाचे आहे त्यामधून येणाऱ्या संभाव्य गोष्टींना तोंड कसे द्यायचे, तुमची मानसिकता कशी आहे व ती आजून चांगली कशी करावी याची माहिती मिळाल्यास संसार नक्कीच राजाराणीचा होईल. पहा पटतंय का?
@श्रीकांत कुलांगे
9890420209